PS l आणि ll : काही rants

Submitted by रॉय on 4 May, 2023 - 05:31

PS l आणि ll : काही rants

मी कादंबरी वाचली नाही. त्यामुळे पुढील टिपणे फक्त चित्रपटावरच अवलंबून आहेत. कदाचित तामिळ माणसाला कल्कीकृत पोन्नीयन सेल्वनबद्दल अस्मिता असतील आणि त्यांच्यासाठी चित्रपट एक चांगला अनुभव असेल त्यामुळे मूळ कथेला मी कमी लेखू इच्छित नाही. चित्रपटातून समजलेल्या कथेपुरतेच मी मर्यादित लिहितो. हलक्यात घ्याव्यात.

१. सुंदर चोळ उठून चार पावलं तरी चालेल ही माफक अपेक्षा दुसऱ्या भागात पूर्ण होते. पहिल्या भागातल्या चिनी सुयांनी काम केलं हे पाहून मन भरून आले.
२. हिंदी संवाद लिहिणाऱ्याला सलाम. कुंदवै दुसऱ्या भागात मधुरांतकाला 'चाचाश्री' अशी हाकारते तेव्हा कान तृप्त झाले.
३. परमसुंदरी नंदिनी उर्फ ऐश्वर्या राय पापणी लवताना एक्स्पोनेन्शियली जास्त वेळ का घेते हे गूढ शेवटपर्यंत उलगडत नाही. साधी मान जरी वळवायची तरी तिला पूर्ण अंग वळवावे लागते तेही अर्धातास, हे कसले सौंदर्य जडत्व म्हणायचे? दोन्ही भागांच्या एकूण प्लॉटचे वजन नंदिनीच्याच खांद्यावर आहे हे जाणवून देणे हा अभिनयाचा कळसच म्हणायला हवे.
४. उपपरमसुंदरी कुंदवै रोमान्स करतानासुद्धा चेहऱ्यावरचे मसल्स दोन मिलीमीटरदेखील हलवत नाही. तिच्या डोक्यातले ग्राफिक्स कार्ड अपग्रेड करायची सख्त गरज आहे. चोळांनी अजून ग्राफिक्स प्रोसेसिंगचा शोध न लावल्यामुळे हे राह्यलं असावं.
५. शेवटचा सीन पाहून स्टारवार्स भाग तीनच्या शेवटच्या भागाची आठवण झाली. वंदियदेवन आणि जार जार यांच्यात तसाही फारसा फरक नाही.
६. दोन्ही परमसुंदऱ्या कमी होत्या का काय म्हणून तिसरी एक परमसुंदरी माधुरी मध्येच दाखवली जाते. परंतु तिच्याऐवजी जपानी हलती बाहुली जरी दाखवली असती तरी खपून गेले असते. निदान तिने दोन तीन हलके मुरके तरी घेतले असते. परंतु ठीकच. तसाही मधुरांतकन इकडून तिकडे चालत जाण्याऐवजी काहीच करत नाही त्याला स्टॅटिक माधुरी शोभून दिसते.
७. प्लॉट तर साधाच आहे तरीही पात्रांची एकामागोमाग जंत्री लावल्याने, आणि प्रत्येकाची पूर्ण नाव घेण्याची सक्ती असल्याने माणसांनी टोपण नावे का शोधली असावीत याचा उलगडा होतो. आयला इथे टोपणनावही डबल बॅरल - पोन्नीयन सेल्वन.
८. नंदिनीची आई मुकी आहे हे सुंदरचोळ सोडून इतरांना कसे कळते बुद्ध जाणे. परंतु ती मुकी आणि आंधळीही असावी असं तिचं एकंदरीत वागणं आहे. त्यात ते विपुल पांढरेशुभ्र केस, धवल साडी सांभाळत डीप डाइव्ह मारणे, वरूनमोळी वर्मनाला तीनदा वाचवणे हे खायचे काम नाही. त्या अवतार सारखं हत्तीच्या शेपटाला ती तिचे विपुल केस जुळवून मन की बात स्टाईल सूचना देत असते असं दाखवलं तर पटलं असतं.
९. प्रेयसीला मुद्दाम भेटून तिच्या हाताने सूरी खुपसून घेणे हे टीनएजर मंडळीही करत नाहीत. भेटायचेच आहे तर भर उजेडात नदी काठी विहार वगैरे करत भेटावे. आदित्य करिकालना, तुझ्या नावातच आदित्य आहे की रे. कशाला अंधारात धडपडून मेलास? परमसुंदरीच्या चेहऱ्यावर सुरकुती दिसेल अशी भीती होती का तुला? का आयला, टीनएजमध्ये काळे-तपकिरी डोळे असलेली परमसुंदरी घाऱ्या डोळ्यांची कशी काय झाली हा आश्चर्याचा धक्का बसू नयेस म्हणून रात्री मेणबत्त्या विझवून भेटलास, सांग खरं खरं. एवीतेवी मरणारच होतास की.
१०. स्कॅफोल्डिंगचा शोधही चोळांनी लावलाय हे कळ्ळं मणिरत्नमा. नुकताच अहिंसक बुद्धविहारातून बाहेर आलेला अरुणमौळी भर बाजारात, भर उत्सवात देखील एका माणसाला हत्तीकरवी सोंडेने भिरकावून खलास करतो तेव्हा पब्लिक - "क्या मारा, लमावो" असे करत चिल करते. आयला हे नागपट्टणमचं पब्लिक भलतंच चिल्ड होतं म्हणायचं.
११. चोळ एकंदरीतच - "आप जैसा पांड्या मेरी जिंदगी ले जाए तो बात बन जाए" - या एटीट्युडचे होते हे कळलं.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

Lol

पहिल्या भागात (हिंदी वर्जनमधे) हेर आणि ऐश्वर्या सीन मधे हेर चक्क प्लीज म्हणतो (tone: oh please) तेव्हा माझे कान चेक करायला मी तो सीन ३ वेळा प्ले केला आणि स्पिकरला कान लावून लावून ऐकले. माझ्या निष्पाप मनाला अजूनही तो माझ्या कानाचा आणि स्पिकरचाच दोष निघेल असे वाटत आहे Lol

धमाल लिहिलं आहे Lol

अजून एक -
तमिळ पळूवेट्टर हे नाव हिंदी डबिंगमध्ये त्यांनी चक्क पर्वतेश्वर केलं आहे. कायच्या काय वाटतं ते 'छोटे पर्वतेश्वर' (वरिजनल चिन्न पळूवेट्टर) ऐकताना.

नाही हं, मला कुठेही ‘प्लीज’ ऐकू आलं नाही! काहीही! Lol
पण तुम्ही डब्डं हिंदी का बघता?! किती येडपट्ट वाटतायत ते संवाद आणि संवाद’फेक’ हिंदीत!

पण तुम्ही डब्डं हिंदी का बघता?! किती येडपट्ट वाटतायत ते संवाद आणि संवाद’फेक’ हिंदीत!>> ओरिजीनलमधे प्लीज म्हंटलेय की अजून काही हे कळणार नाही म्हणून Lol

पण खरच आता ओरिजीनलच बघेन परत. हिंदी डब्ड संवाद डब्डा आहेत

तरी परत एकदा ते प्लीज शोधून येईन आज Lol

नाही हं, मला कुठेही ‘प्लीज’ ऐकू आलं नाही! काहीही! Lol
पण तुम्ही डब्डं हिंदी का बघता?! किती येडपट्ट वाटतायत ते संवाद आणि संवाद’फेक’ हिंदीत!

नवीन Submitted by स्वाती_आंबोळे on 4 May, 2023 - 08:1

मग काय तामीळ बगाय्चा?

@स्वाती, माझ्या कानाचं वय झालय किंवा त्याला ऐकायचे आहे तेच ते ऐकतय Lol चुकीची ऐकू आलेल्या गाण्यांसारख चुकीचा ऐकू आलेला डायलॉग झालाय तो thanks Lol

attitude oh thanks ला मॅच आहे म्हणून कान फस गये शायद

पहिल्या भागात (हिंदी वर्जनमधे) हेर आणि ऐश्वर्या सीन मधे हेर चक्क प्लीज म्हणतो (tone: oh please) तेव्हा माझे कान चेक करायला मी तो सीन ३ वेळा प्ले केला आणि स्पिकरला कान लावून लावून ऐकले. माझ्या निष्पाप मनाला अजूनही तो माझ्या कानाचा आणि स्पिकरचाच दोष निघेल असे वाटत आहे Lol
केव्व्हा आहे हा प्रसंग?

मधुरांतकन इकडून तिकडे चालत जाण्याऐवजी काहीच करत नाही त्याला स्टॅटिक माधुरी शोभून दिसते.
>> हा जोक मला पण कळला नाही मधुर गोष्टींचा अंत करणार्याशी माधुरीचे लग्न कशाला?

Lol सॉलिड पिसं काढलीत! मजा आली. मी ऐशवर्याच्या एंट्रीला धीर सोड्ला आणि बंद केला. पण आता परत बघणार आहे.

Lol

नुकताच पीएस-१ बघायला सुरूवात केली आहे. हे परत नीट वाचून लक्षात ठेवायला पाहिजे.

मान वळवायची तर आख्खे अंग वळवावे लागते हे राजघराण्यात कॉमन असावे. पद्मावत मधे दीपिकाही तसेच करते.

असं काही मला वाटलं नाही, पण ते त्यांच्या जड कपड्यां-दागिन्यांमुळे होत असेल का?
(आपला तो बाब्या मोड!) Proud

धमाल लिहिले आहे. Lol

मान वळवायची तर आख्खे अंग वळवावे लागते हे राजघराण्यात कॉमन असावे. >>> तो ग्रेस दाखविण्याच्या अभिनयाचा अभिनय आहे. मंद हालचाली म्हणजे हा बेगडी राजेशाही ग्रेस .

भारीच शैली आहे. आतापर्यंत चित्रपटांची पिसे काढणारे जेव्हढे वाचले त्यात एकदम वेगळे !!
पीएस १ पाहून विसरलो असल्याने पुन्हा पाहिल्यावर पुन्हा वाचून पाहीन. Happy

पण एवढी मोठमोठी देवळं आणि राजवाडे बांधणाऱ्यांना स्कॅफोल्डिंग्ज वापरायची माहीत नसतील असं का वाटतं तुम्हाला?

मंद हालचाली म्हणजे हा बेगडी राजेशाही ग्रेस .>> खरं आहे चायनीज फुट बाइंडिन्ग च्या मागे हीच कल्पना होती. त्या बाईचे पाय इतके लहान करायचे तीन चार इंच की तिला आधाराशिवाय चालताच येउ नये. वर किती का सिल्क किमोनो घालुदे अनेक घड्यांचे. हॉरिबल.

तरूण नंदिनीचे काम कुणी केले आहे? ती मुलगी खरेच चाफ्याच्या फुलासारखी अनाघ्रात सुकुमार कलिका दिसते. हिला फार रोल नाही. पण आवडली बुवा कन्यका. आदित्या तिला घोड्यावर पुढे बसवतो तेव्हाच दोघांनी पळून जाउन लग्न करायला हवे होते. ऐसा प्यार जिंदगीमे एकही बार होता है.

मी म्यूट करुन सब टायटल्स च वाचते. हे त्या डब्ड (डब्डा!) हिंदी पेक्षा बरे नाही का?
म्हणजे मी विचारते आहे सिरीयसली.
की सब टायटल्स तरी योग्य आहेत का?

मंद हालचाली म्हणजे हा बेगडी राजेशाही ग्रेस .>>>>
डोंबलाची ग्रेस. मुगल-ए-आझम बघा.
त्या मानाने मला त्रिशा आवडली, ती चतूर राजकन्या वाटते. आदित्य करिकाला (कळीकाळ?) हिंस्त्र वाटतो.
प्रकाश राज मला प्रकाश राजच वाटला, चोळ पॅट्रीआर्क नाही. ऐश्वर्या रायच्या सौंदर्याचा चांगला उपयोग केलाय ऍट लीस्ट नंदिनीच्या भुमिकेत.

पण या चित्रपटाच्या निमित्ताने लोकांना चोळ, पाण्ड्य वगैरें डायनेस्टीजबद्दल माहिती मिळत असेल तर व्हाय नॉट? सुदूर पूर्व आशियात भारताचा प्रभाव निर्माण करण्यात यांची महत्वाची भूमिका होती.

आता कुणीतरी चेर, नायक, होयसाळ, शिलाहारांबद्दल पण पिक्चर काढा रे…

तिच्या डोक्यातले ग्राफिक्स कार्ड अपग्रेड करायची सख्त गरज आहे.
स्टॅटिक माधुरी
आप जैसा पांड्या मेरी जिंदगी ले जाए तो बात बन जाए

>>>>> Lol

अर्रर्र ...... PS l आहे की पुणे ५२ ????? Rofl

Pages