चित्रपट :- तु. का. पाटील (मेनका उर्वशी) की १९५९ सालचा सांगते ऐका ?

Submitted by नितीनचंद्र on 28 April, 2023 - 08:13

काही जुन्या चित्रपटांचे इतके जबरदस्त गारुड आहे की चित्रपट सुरु असताना जुना चित्रपट आणि त्याची फ्रेम टु फ्रेम कथा झरझर डोळ्यासमोर उतरु लागते.

युट्युब वर काही तरी सर्च करताना मला हा चित्रपट सापडला. खर तर मी शोधत होतो प्रसाद ओक चा चंद्रमुखी आणि हाताला लागला तु.का. पाटील ( मेनका उर्वशी )

हा चित्रपट पहायला सुरवात केला आणि एक जुनाच सिनेमा मला दिसु लागला ज्याचे नाव सांगते ऐका. खर तर इतका चांगला चित्रपट रिमेक करावा का ? असा प्रश्न मला पडला पण या साठी ज्या निर्माते मंडळींनी पैसे गुंतवले त्यांना का प्रश्न पडला नाही याचे आश्चर्य वाटते.

आधी चित्रपट :- तु. का. पाटील (मेनका उर्वशी) ची माहिती जी उपलब्ध आहे ती पाहू मग जाऊ सांगते ऐका कडे

चित्रपट :- तु. का. पाटील (मेनका उर्वशी)
दिग्दर्शक :- मच्छिंद्र चाटे
निर्माता :- भारती नाटेकर, अविनाश चाटे आणि क्रांती चाटे
प्रमुख दिग्दर्शन सहाय्य :- भारती नाटेकर
गीतलेखन :- योगिराज माने
संगीत :- राजेश सरकाटे
छायांकन :- राहुल जनार्दन जाधव
नृत्य :- डॉ. किशु पाल, उमेश जाधव, प्राची शैलेश, सुबोध आरेकर आणि प्रकाश घाडगे.
कला :- सुधीर देवदत्त तारकर
संकलन प्रणय पाटील
वेशभूषा :- क्रांती चाटे
कलाकार :- नागेश भोसले, मैथिली जावकर, प्रिया बेर्डे, भार्गवी चिरमुले, अशोक शिंदे, संजय खापरे, अभय राणे, सुरेखा पुणेकर, स्मिता शेवाळे, मीरा जोशी,

हा सिनेमा युट्युब वर आहे म्हणुन कुणी पाहू नये. आजवर अनेक भ्रष्ट नकला जुन्या गाजलेल्या चित्रपटांच्या झाल्या आहेत त्यात एक भर आहे. सुमार दर्जाची गाणी, सुमार फोटोग्राफी, सुमार दिग्दर्शन आणी सुमार सर्व काही असे वर्णन या सिनेमाचे करावे लागेल. हा सिनेमा आहे ? असा प्रश्न कुणाच्या मनात आला असेल तर तो रास्त आहे.

या चित्रपटाने नागेश भोसले, प्रिया बेर्डे, भार्गवी चिरमुले, सुरेखा पुणेकर यांच्या सोबत आणि पाटलाच्या घरातला नोकर जो सांगते ऐका मधे वसंत शिंदे या गुणी कलाकाराने साकारला आहे ती भुमिका या चित्रपटात संदिप पाठक या गुणी कलाकाराने साकारण्याचा प्रयत्न केला आहे.

आग लागते आणि घर जळते हा सिन १९५९ साली आजचे समृध्द तंत्र नसताना फार उत्तम रितीने घेतला होता. हाच सिन या चित्रपटात इतका सुमार पध्दतीने चित्रीत होतो हे पाहिल्यावर स्कीप केल्याशिवाय पर्याय नव्हता.

ज्यांना कुणाला सांगते ऐका हा अनंत माने दिग्दर्शीत सिनेमा आठवत असेल त्यांनी या निमीत्ताने पुन्हा पहावा. त्यातली सुंदर गाणी ऐकावी. दादा साळवी, सुर्यकांत, चंद्रकांआ, सुलोचना दिदी, ऐन तारुण्यातली जयश्री गडकर यांचा अभिनय पहावा.

https://youtu.be/Ao9Cv2th0n4

हेच या निमीत्ताने सांगणे आहे.

ज्यांच्या कुणाच्याही खिशात जास्तीचा पैसा खुळखुळेल आणि सिनेमा करावा असा मोह होईल त्यांनी तु.का. पाटला सारखा आचरट पणा करु नये.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

चित्रपटच नाव तुका पाटील बदलून मेनका उर्वशी केले होते
बघितला मी हा २ वेळा
पण त्याचे जेवढ्या लोकांनाही परीक्षण केले कोणाला पण सारखे पण दिसले नाही ?

मी मूळ चित्रपट बघतलं नाही ,त्यात पण त्याची बहीण असते ?

@हस्तर ,

हो बहिण असते. चित्रपटाच्या मुळ कथेत बदल नाही.

@फलक से जुदा

कशाचा राग आहे इतका ? चाटेंच्या चित्रपटावर टिका केली म्हणुन ?

नितिन: राग नाही...any publicity is good publicity ह्या न्यायाने...जितका प्रचार कराल तितका (सुमार असूनही) प्रसार होईल.

त्यामुळे सुमाराचा प्रचार हा प्रसारच...

फलक से जुदा

जर दोन गोष्टींमधला फरक स्पष्ट असेल तर खराब वस्तु, सेवा किंवा मनोरंजन कोण कशाला विकत घेईल.

हाच फरक उलगडून सांगण्याचा माझा प्रयत्न आहे.

हस्तर सांगू शकतील. त्यांनी दोन वेळा पाहिलाय.

मी या चित्रपटाचं नावही कधी ऐकलं नव्हतं. या लेखामुळेच पहिल्यांदा कळलं. त्यामुळे फलक से जुदा यांच्याशी सहमत.