
आयुष्याचे गणित....
गणित मांडता आयुष्याचे
वर्ष ती सरली अनेक..
सुटलंय ते असे वाटता
नवीन प्रश्न जन्म घेतसे..
एकत्र सर्वं ते मिळण्याचे
अधिकचिन्ह गोळाबेरजेचे..
जिव्हेवर गोड शब्द ठेवुनी
जोडा सदैव खूप माणसे..
वजाबाकी ही आयुष्यात
आहे ती खूप महात्वाची..
षडरिपूना लावा खुशाल
सौख्य सदा येईल जीवनी..
गुणाकार चिन्ह अनोखे
फुली जरी ती नकाराची..
आनंदच गुणे आनंदाला
समाधान त्याची पावती..
भागाकार ही गरजेचा
भागा कठीण दुःखाला..
दुःख सारे ते विसरूनी
कंसी जपा सुख स्मृतीना..
पाय, असे तो पायाभूत,
काढण्या वर्तुळाचे क्षेत्र..
जीवनमृत्य चक्र जाणण्या,
अजून मात्र सर्वं अनभिज्ञ..
काय कमी ते काय अधिक,
चिन्हे नव्हे.. ती प्रतिबिंब..
कमी जास्त चे जाणे येणे ,
सांगे आम्हाला जीवनचक्र..
शून्य आणि इन्फिनिटीचे
मात्र अजूनही पडते कोडे..
शून्यातून जर विश्व निर्मिते
शून्य इन्फिनिटी एक वाटते..
✍️ हेमंत नाईक
१४.०३.२३,
आंतरराष्ट्रीय गणित दिवस (पाय(३.१४) डे )
मस्त!
मस्त!
मस्त. गणिताचे नियम संसारात
मस्त. गणिताचे नियम संसारात लागू होतच नाही.