विशुद्ध

Submitted by अपूर्व जांभेकर on 4 April, 2023 - 04:28

स्वप्नं आळशी असतात... आपणहून कुठे जात-येत नाहीत
मुद्दामून तर कधीच पडत नाहीत...

खूप चलाख असतात स्वप्नं...
आलंच कुणाच्या मनात फार... तर करतात झोपेत, बंद डोळ्यांपर्यंतचा प्रवास
बघणाऱ्याच्या कल्पनाशक्तीप्रमाणे आणि स्वप्नांच्या एकंदरीतच मूडनुसार,
असमांतर संदर्भ, गडद-फिकट, चित्र-विचित्र, स्पष्ट-अस्पष्ट
काळी-पांढरी, करडी, क्वचितच रंगीत दृश्य, उमटत राहतात त्रिमितीच्याही पार! - काळत्रिज्येला छेदून!

खरं म्हणजे ‘त्यांना’ बघितलेलं बिलकुल आवडत नाही
आणि ‘त्यांच्या’ पाठीमागे धावलेलं तर मुळीच चालत नाही...
मांजराने डोळे मिटून दूध प्यावं, तशी बसली असतात स्वप्नं
रात्रभर जागरण करून कधी बाळासारखी निरागस झोपली असतात स्वप्नं...
आपली अवचेतना मधूनच पहाटे-पहाटे त्यांची छेड काढतं त्यांची ,
ते हि मग, लावून देतात - दिवसभर भिंगरी विचारांची!

तशी भित्री असतात बरं का पण स्वप्न...
कायम असुरक्षित वाटत राहतं त्यांच्यापासून, जे त्यांना जागेपणी पाहतात
त्यांना गाठण्यासाठी, दिवसा-ढवळ्या पाठलाग करतात
सत्यात उतरवण्यासाठी, जीवाचा काय-काय आटा-पिटा करतात...
नैतिक-अनैतिक, कसले कसले व्यापार करतात
मनापासून बंद डोळ्यांपर्यंतच्या झोपेतल्या प्रवासातंच जर बदलतं, चमत्कारिकपणे इतकं त्यांचं रूप,
वास्तवात येईलच कसं, त्यांचं मूळ स्वरूप?
आणि आलंच, तर किती हाहाकार होईल?

म्हणूनच कदाचित, अजून तरी, त्यांच्या निर्मिती अन लयाचं ज्ञान आपल्याला झालं नाहीये,
इतकी असतात, स्वप्न विशुद्ध!
कारण स्वप्न बघतात अनेक आणि बोटावर मोजता येतील, इतकेच होतात बुद्ध!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तशी भित्री असतात बरं का पण स्वप्न...
कायम असुरक्षित वाटत राहतं त्यांच्यापासून, जे त्यांना जागेपणी पाहतात
त्यांना गाठण्यासाठी, दिवसा-ढवळ्या पाठलाग करतात
सत्यात उतरवण्यासाठी, जीवाचा काय-काय आटा-पिटा करतात...
नैतिक-अनैतिक, कसले कसले व्यापार करतात
====== ...हे आवडलं !

छान कविता