तुझी आठवण कधी निखारा.

Submitted by deepak_pawar on 24 March, 2023 - 12:17

तुझी आठवण कधी निखारा
कणकण कणकण जळते आहे
तुझी आठवण कधी पसारा
भरभर भरभर भरते आहे.

तुझी आठवण रंग नभीचे
तुझी आठवण गंध कळीचे
तुझी आठवण फुल बनुनी
हरपल हरपल फुलते आहे.

तुझी आठवण सलता वारा
तुझी आठवण चढता पारा
तुझी आठवण कधी सरींनी
झरझर झरझर झरते आहे.

तुझी आठवण अंधार रात
तुझी आठवण चांदणं गीत
तुझी आठवण दिप बनुनी
क्षण क्षण क्षण क्षण जळते आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कविता छान आहे. त्यात एक नादमाधुर्य आहे.

एक गोष्ट खटकली. पळपळ पळपळ जळते आहे >> इथे पळ म्हणजे जन पळभर म्हणतील हाय हाय ह्यातला कालवाचक पळच आहे ना? हिंदीत जसं पल पल हर पल म्हणतात, तसं मराठीत पळपळ म्हणत नसावेत. ती पळपळ वाचताना माझी धावपळ झाली अशी कळकळ मी या ठिकाणी व्यक्त करतो.

शिवाय 'हरपल हरपल फुलते आहे' इथेही पल म्हणजे पळच पाहिजे ना? हरपल हे हिंदी आहे. तुम्हीच शेवटच्या ओळीत मराठी पळ वापरला आहे आणि इथे हिंदी पल (हर सुद्धा हिंदीच आहे). ह्या दोन्ही ओळी खटकल्या.

हरचंद पालव आपलं म्हणणं बरोबर आहे. एक बदल केला पण दुसऱ्या पण दुसरा पर्यायी शब्द सापडत नसल्याने तो शब्द वापरला.