अगा जे घडिलेची नाही

Submitted by अनन्त्_यात्री on 21 March, 2023 - 08:47

एके दिवशी- दुसर्‍या प्रहरी- नेत्र उघडला तिसरा
मितीत चवथ्या- झालो दाखल - थाट तेथला न्यारा
पाचावरती धारण बसली - षट्चक्रे लडखडली
सप्तरंग मिसळले वर्णपटी- श्वेतप्रभा लखलखली
अष्टसिद्धी प्रगटल्या परंतु नवविध भक्तिस भुलल्या
अनाहताच्या अनुनादाने - दाही दिशा कोंदल्या

Group content visibility: 
Use group defaults

सुंदर...

व्वा वा !
कविराज, हा अनुभव आहे ? Happy

१० वर थांबले म्हणून चान्स गेला नायतर मोहिनी जशी थेटरात "मुन्ना" ओरडली तसा परमेश्वर "मुन्ना" ओरडत आला असता.