
हरी विण वोखटे सर्व काही
हरी विण वाटे संसाराचे ओझे
हरी माझा सांगाती , हरी माझा सोबती
हरी माझे दैवत , हरी माझे सर्वस्व
हरी मायबाप , हरी प्राणआधार
हरी आप्तबंधू , हरी सखाप्रिय
हरी विण कोण हरील भवताप ?
हरी विण कोण दूर करील संकट ?
हरी चित्ती , हरी ध्यानी
हरी स्वप्नी , हरी अंतरी
हरी सुंदर साजिरा , हरी विठ्ठल कानडा
हरी नाम तारणहार , हरी नाम पावन फार
हरी हरी नामाचा लागला छंदु
हरी चरणांना नित्यकाळ वंदु
हरी कृपे नाश होई पापांचा
हरी कृपे उध्दार होई जनांचा
हरी वसे चराचर , हरी नसे भेदाभेद
हरी त्रैलोक्याचा स्वामी , हरी त्रिगुणरहित
हरी सगुण साकार , हरी निर्गुण निराकार
हरी द्वारकेचा राणा , हरी लक्ष्मीचा पती
हरी रामकृष्ण गोविंद , हरी विठ्ठल परब्रह्म
हरी गुण वर्णिती वेद शास्त्रे पुराणे
हरी किर्ती गाती हरी भक्त आनंदे
हरी भक्तवत्सल , हरी करूणाकर
हरी आनंदसागर , हरी अनाथरक्षक
हरी भवभयहारक , हरी पतितपावन
हरी सर्वगुणसंपन्न , हरी पूर्ण परीपूर्ण
हरी नारायण , हरी नारायण
हरी नारायण , हरी नारायण
हरी रूपे अनंत , हरी कथा अनंत
हरी लीला अगम्य , हरी पाठ पवित्र
हरी हरी हरी नाम शिवाचा मंत्र
हरी हरी हरी नाम अमृत गोड
।। जय श्री हरि ।।
सुंदर
सुंदर