"चंद्रविलास" २७ मार्चपासून रात्री ११ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Submitted by Ajnabi on 9 March, 2023 - 05:04

मालिकेचा टाईमस्लॉट उशिराच आहे पण ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर इथे चर्चा करावी .

हि कथा आहे एका दोनशे वर्षांपूर्वीच्या जुन्या वाड्यात अडकून पडलेल्या बाप (अनंत ) आणि लेक (शर्वरी ) यांची. नुकताच टीजर झी वर दाखवायला सुरुवात झालीय, प्रत्येक भागागणिक एक नवा खुलासा आणि दर खुलाशामागे एक नवी कहाणी असलेली ही मालिका प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात नक्की यशस्वी होईल का? या मालिकेत प्रमुख भूमिकेत वैभव मांगले असणार आहे. वैभव मांगले यांच्यासोबत सागर देशमुख मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
मालिकेचं लेखन केलंय समीर गरुड आणि प्रसाद जोशी यांनी. तेव्हा पाहायला विसरू नका एक रहस्यमय भयकथा "चंद्रविलास" २७ मार्चपासून रात्री ११ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.
काही दिवसांपूर्वी झी मराठीचं सोशल मीडिया अकाउंट हॅक झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. झी मराठीचं इंस्टाग्राम आणि फेसबुक सगळ्याच ठिकाणी झी मराठीचा लोगो आणि इतर पोस्ट्स उलट्या दिसू लागल्या होत्या.
पण अखेर हे का झालं याचा उलगडा झाला असून हि झी मराठीची प्रमोशनल कल्पना होती. झी मराठीवर हॉरर पद्धतीची नवीन मालिका सुरू होतेय तिचं नाव चंद्रविलास.
Chandravilas-780x470.jpghttps://www.justmarathi.com/chandravilas/
https://www.esakal.com/manoranjan/zee-marathi-new-serial-chandravilas-co...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मला वाटलं होतं की नारायण धारपांच्या चंद्रविलास कादंबरी वर आधारित आहे की काय. पण तसं दिसत नाहीये. एनीवे पाहणार तर आहेच. इंटरेस्टिंग वाटतेय.

मि हि मालिक बघायला सुरुवात केली. पहिला भाग खुपच साधारण वाटला. पुढचे भाग कदाचित चान्गले असावेत म्हणून पुढे पाहिले पण अगदी वौतागुन बन्द करुन टाकले. चान्गले कलाकार असुनही कुठेतरी जुळणी निट होत नाही असे वाटते. पहिल्य भागत तर बाबा आणि शर्वरी यान्चे संवाद फार काहिच न्हवते. नुसते शर्वरि नावाने हाका मारणे आनी बब मी चुकले, बाबा अस करणार नाही, केवळ बाबा आणि शर्वरी या व्यतिरिक्त काहिच वेगळे न्हवते. कोणी पुढे पाहिलि असेल तर कशी वाटली सान्गा.
वैभव मान्गले ची वाक्य सुध्धा काही नीट न्हवती. अपेक्षाभंग केला मालिकेने.

त्या शर्वरीची ऍक्टिंग का कुणास ठाऊक नाटकी स्वरूपाची वाटते। जमत नाही तिला। एवढ्या उशीराच टाइम स्लॉट असल्यामुळे बघायला होत नाही एकदा पहिला होता एक भाग त्यात त्या बाबाची बहीण शर्वरीबरोबर खेळत होती। ( बाबाची बहीण हि लहानपणी बळी गेली आहे व तिचे भूत हे शर्वरीबरोबर खेळते आहे बाबाची बहीण फक्त शर्वरीलाच दिसते व आपली dildosti मधली ऍना काहीतरी भुतिया चाळे करताना दिसली )