शिवाच्या मेंढ्या

Submitted by दत्तात्रय साळुंके on 7 March, 2023 - 05:27

शिवानं वाघर बाजूला केली आणि वाड्यातल्या मेंढ्या मोकळ्या सोडल्या.
दूर डोंगरात छान गवत माजलं होतं. तिथं शिवा मेंढ्या चरायला घेऊन गेला.
एकाच जागी मेंढ्या दिवसभर चरतील एवढं गवत सहज उपलब्ध होतं. शिवा एक कडेला उभा राहून गमंत बघत होता. त्याची कुत्री कळपाभोवती इमानेइतबारे लक्ष ठेवून होती. मेंढ्याच तेवढ्या वखवखल्या होत्या. जरी प्रत्येकी समोर पुरेसं गवत होतं तरी दुसरी कुठे चरते तिथं जास्त गवत आहे असं वाटून तिथे तिसरी मेंढी जात होती. ती आपल्या बाजूला चरायला आली की पहिली तिच्या पुढं चारा खायला जात होती. सगळा कळप पायाखाली गवत तुडवत पुढं पुढं सरकत होता. शिवा गालातल्या गालात हसत होता. कधी हुर्र करत त्यांना हाकारत होता, पण कोणालाच त्याचं हाकारणं ऐकू जात नव्हतं.
© दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केशवकूल खूप धन्यवाद
धनवन्ती, सामो खूप आभार...
हे रुपक आहे ‌
ही माणसाची वखवख, चढाओढ आणि असमाधानी वृत्ती आहे.