बागकाम अमेरीका २०२३

Submitted by स्वाती२ on 16 February, 2023 - 13:07

या वर्षीच्या बागकामाच्या गप्पांसाठी धागा सुरु करत आहे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

this “Indian farms and gardens in USA” group in Facebook is managed by Sasikanth Vallem. He quit his corporate job and started his agritech business- Indian fruits farming in Florida.

माझ्या मैत्रिणीचा कझिन आहे. फीडबॅक चांगला आहे.

कृष्णाकाठची वांगी आता पहिली उरली नाहीत. (नदीने आणलेल्या गाळात पूर ओसरल्यावर वांगी लावत ती वांगी.) आता धरणं होऊन पाणी अडवल्यावर कुठला गाळ आणि कुठली वांगी?

मेथी
WhatsApp Image 2023-04-16 at 9.01.12 PM.jpeg

अरुगुला, रोमेन लेटयूस, ब्रोकोली
WhatsApp Image 2023-04-16 at 9.01.12 PM(1).jpeg

ताजी भाजी
IMG-20230416-WA0006.jpg

मेथी घालून वरण्फळं
WhatsApp Image 2023-04-16 at 9.01.12 PM(2).jpeg

२ वर्षांपूर्वी अ‍ॅस्परेगस लावले होते. यावर्षी हार्वेस्ट करायला मिळाले. एक जुडी निघाली. अचानक पडलेल्या उष्ण हवेने की काय एका दिवसात ताडमाड वाढले. आता पुन्हा योग्य पेसनं वाढत आहेत.

राजगिरा लावलाय - भरघोस येतो नि आता दर वर्षी काही न करता आपोआप येतो.
>>> अरे सहीच. आमच्या इकडे पेरीनिअल आहे का बघायला हवं. आता लावला तर येईल ना? का मे पर्यंत थांबू?

थँक्स अंजू Happy

राजगिरा लावलाय एकदा दोनदा . मस्त पैकी उगवतो .
आंबटचुका पण आमच्या इथे मे महिन्यात लावते. एका वर्षी काही रोपं बियांवर आली होती.त्याच्या बिया इथे तिथे पडून पुढच्या वर्षी परत उगवली होती.

मेधा, राजगिरा आपला साधा ग्रोसरीमधला की त्याचं बियाणं वेगळं मागवतेस?

मला करडई लावायची आहे. एका फोरमवर कार्डिनल्ससाठी फुड म्हणून येतात त्याच बिया लावा असं वाचलं. अ‍ॅमेझॉनवर ४ औंस १८-२० डॉलर्सला आहे. बाकी कुठे करडईच्या बिया दिसल्या नाहीत.

मस्त दिसतायत भाज्या!
आमच्याकडे सध्या शुगर स्नॅप, साधे मटार, कांदे, ब्रोकोली , बॉक चॉय, केल, चार्ड, लाल मुळे , शेपू ही मंडळी 'पहिली चार पाने' स्टेजला आहेत. लेट्युस, पालक चे बी पेरले आहे. ananassa straberry च्या june bearing आणि ever bearing वाफ्यात फुले दिसायला लागले. all star अजून मागे आहे.

बोस्टन जवळ सफरचंदाचे झाड लावायचा अनुभव आहे का कोणाचा? भावाच्या घराभोवती जागा आहे तिथे लावायचा विचार आहे. कोणती जात ( झाडाची) लावावी? फळे येतात का बर्‍यापैकी? गोडीला कुठला प्रकार चांगला आहे. कधी लावावे इ. इ. असे खूप प्रश्न मनात आहेत.

धनवंती गोडीपेक्षा दिसायला लाल बुंद लावा. तुम्हाला काही शेती करायची नाही. पण लाल लाल बुंद फळे हिरव्या डहाळ्या - नेत्रसुख मिळेल अक्षरक्षः डोळ्याचे पारणे फिटेल.

यंदाच्या वर्षी तीन प्रकारचे कॉकटेल / चेरी टोमॅटो बिया पेरल्या आहेत (पिवळे / नारंगी / काळे).

शिवाय तीन प्रकारच्या मिरच्या हि पेरून ठेवल्या आहेत (थाई / हबानेरो आणि त्रिनिदाद स्कॉरपियन).
थाई रोजच्या वापराला आणि बाकी दोन झाडांना पुरेशा मिरच्या आल्या तर हॉट सॉस करून ठेवीन असा विचार आहे.

धनवंती

हनीक्रिस्प, हारकोर्ट, रेड डेलिशिअस किंवा गोल्डन डेलिशिअस या जाती लावू शकता.

पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे जी जात लावणार असाल ती फ्रॉस्ट हार्डी आहे हे चेक करून घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे मल्टिपल झाडं लावा म्हणजे पॉलिनेशन ला मदत होईल.

काही जातीच्या सफरचंदांच्या फुलांना पोलिनेशन साठी वेगळ्या जातीची फुलं जवळपास असावी लागतात. तर काही झाडं सेल्फ पॉलिनेटिंग असतात

https://www.massmastergardeners.org/ यांच्या वेबसाईटवर किंवा त्यांना फोन /इमेल करुन स्पेसिफिक माहिती मिळेल

धन्यवाद सामो आणि अक आणि मेधा..
अक, तुमच्या सल्ल्यानुसार किमान 2 तरी लावू.

अंजली, भाजीपाला छान फ्रेश, वरणफळं मस्त!
करडई, राजगिरा बिया नाहीयेत, पण आंबट चुका बिया पडून त्याचा तो येतो दर वर्षी स्प्रिंग मध्ये.
या वेळी मात्र अजून फार दिसला नाहीये. ईथे स्प्रिंग उशीराने आला, आणि आता टेंपरेचर ऑलरेडी ७० मध्ये गेलं आहे. आंबट चुक्याला लगेच बिया धरतील आला तरी.
सध्या बागेत मेथी, केल, मटार, बीटरुट, कोबी सिझन संपत आला आहे. हरभरा रोपं मात्र या वर्षी अजून लहानच आहे, फुलं धरली आहेत.
बाकी उन्हाळा स्पेशल बिया, रोपं तयार होत आहेत Happy

मी वापरल्या आहेत. मला तरी फार फरक वाटला नाही प्रोड्युसच्या क्वालिटीमध्ये. ग्रो बॅग्सची न्युट्रिशन डिमान्ड फार जास्त असते. माती लवकर सुकते, कोरडी।होते. त्यावर उपाय म्हणून मी रेझ्ड बेड सॉइल वापरली.

Pages