Submitted by kamalesh Patil on 14 February, 2023 - 01:34
सांगेन मी सुखाला भटकू नकोस आता
दु:खास सोसलेल्या नेऊ नकोस आता.
पायास बांधलेल्या वाटा गळून जाता
धावावयास जाण्या शिकवू नकोस आता.
डोळ्यात दाटता हे पाणी तुझ्या सयेने
मोकाट पावसासम रडवू नकोस आता.
स्वप्नातल्या जगाचे आकार मोडताना
साच्यात त्याच मजला घालू नकोस आता
थोडे इथे जगाया वाटे मला कशाला
प्रश्नात उत्तरांना शोधू नकोस आता
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान.
छान.
छान. -दिलीब बिरूटे
छान.
-दिलीप बिरूटे
छान कविता. ऐ दिल मुझे बता दे
छान कविता. ऐ दिल मुझे बता दे च्या चालीत (शाळेतल्या सवयीप्रमाणे) वाचली गेली.
छान
छान
छान.
छान.