अंमली! - भाग ८

Submitted by अज्ञातवासी on 6 February, 2023 - 13:35

याआधीचा भाग - https://www.maayboli.com/node/82942

"मानस!"
"सर...."
"मानस सर."
"ओन्ली सर..."
"येस सर..."
"सीट."
"सर अकाउंट्स विषयी थोडं बोलायचं होतं."
"हेमंतभाऊशी बोल."
"सॉरी सर, पण त्यांना या गोष्टी समजणं थोडं..."
"...अवघड आहे हेच ना? म्हणून तर तुम्हाला ठेवलंय. आणि सीए झालात, कशासाठी?"
"सर हे जे आहे ना, ते हाताबाहेर जाईन."
"नाही जाणार. पुढच्याच महिन्यात पब्लिक आयपीओ लॉन्च होईल. काहीतरी करु."
"सर?"
"हे बघ. मोठ्या कष्टाने इथवर पोहोचलोय. जर काहीही इशू असेल, लगेच राजीनामा देऊन निघायचं, पण एक शब्द जरी बाहेर पडला ना, तर?"
"समजलं. सर."
"गुड. निघा आता. कामं करा."
तो निमूटपणे बाहेर निघून गेला.
बावीस मजली बिल्डिंग, सगळ्यात वरचा मजला.
तिथे एकच व्यक्ती बसायची. एकाच व्यक्तीचं ऑफिस, घर, सगळं.
मानस नागरे.
संपूर्ण काचेची केबिन. तीनही बाजूंनी. नाशिकची सगळ्यात उंच बिल्डिंग.
तिथून मानसला सगळं नाशिक दिसायचं.
आणि समोरच असलेला वाडा देखील...
जेव्हा केव्हाही त्याला रिकामा वेळ असेल, तेव्हा तो फक्त वाडा बघत बसायचा.
तो हळूहळू त्याचं राज्य विस्तारत होता...
...पण त्याला साम्राज्य हवं होतं.
...आणि सम्राट अजूनही जिवंत होता.
*****
"माल खूप आपल्याकडे तमा, प्रोडक्शन वाढवायला पाहिजे."
"अण्णा, तुम्हीच सांगा, तिथेच गोडावून. तिथेच पॅकिंग. तिथेच स्टोरेज. कसं वाढणार प्रोडक्शन?"
"तमा, तीच जागा सेफ. दुसरीकडे विचार सुद्धा करू नको."
"नाही अण्णा, आपल्याला साधं प्रोडक्शन सेंटर नाही, तर पूर्ण इंडस्ट्री उभी करायची आहे."
गौडाअण्णा हसला.
"तू हळूहळू उद्योगपती बनायला लागलंय, चांगली गोष्ट. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव. आपण गुन्हेगार. आणि कायम गुन्हेगार राहू. म्हणून सिताऱ्यासारखा चमकण्यापेक्षा कृष्णविवरासारखा काळोखात रहा, जो हजारो सितारे गिळंकृत करतो."
मानस भारावून त्याच्याकडे बघत राहिला.
"आणि तू मेथ घ्यायला लागला, हेसुद्धा ऐकलं."
"अण्णा नशा नाही, औषध म्हणून घेतो."
"मग शुद्ध एफेड्रीन घे. एक टॅब्लेट घेतली ना, तर पन्नास लोकांना खतम करशील. पण एक गोष्ट लक्षात ठेव. याचे फायद्यापेक्षा तोटेच जास्त."
"अण्णा इथे फायद्या तोट्याची पर्वा कुणाला आहे? मला तर जग जिंकायचय."
"एक वेळ जग जिंकणं सोपं आहे, नाशिक जिंकण फार अवघड."
"मी जिंकणार अण्णा. सगळं जिंकणार."
"यशस्वी भव." अण्णा म्हणाला आणि तिथून निघाला.
*****
"मानसदादा."
"बोल हेमंतभाऊ."
"अरे तो पिंगळे आलाय. नगरसेवक."
"काय म्हणतोय?"
"काही नाही आता निवडणुका जवळ आल्यात, यांचा त्रास सुरू होईल."
"पाठव त्याला आत."
"पाठवतो."
"आणि तू बाहेर थांब. मी नंतर तुला सांगेन काय करायचं."
"ठीक आहे रे."
"हेमंत बाहेर गेला, आणि त्याने पिंगळेला आत सोडलं."
"नागरे साहेब तुम्ही आम्हाला ओळखत नाही. किंवा ओळख दाखवत नाही. पण लक्षात ठेवा तुमच्या कंपनीत लावलेले कमीत कमी 60% कामगार माझे आहेत. आता आम्ही तुम्हाला एवढा सपोर्ट करतो, तुम्ही तर आम्हाला वेळही देत नाही."
"पिंगळे भें*** तुझी माझ्या कंपनीत यायची हिम्मत कशी झाली? दोन मिनिटं थांब आत्ताच तुझी ठासतो."
मानस प्रचंड रागाने अक्षरशः त्याच्यावर धावून गेला.
पिंगळेसाठी हे पूर्णपणे अनपेक्षित होतं. तो पूर्णपणे बावरला.
मानसने फोन लावला.
"देवरे साहेब महिन्याला नि महिन्याला तुम्हाला आम्ही पैसा देतो, दादासाहेबांनी तुम्हाला आमदारकीला जेवढा पैसा दिला तेवढा आम्ही पुरवला, आणि हा पिंगळे भें** आमच्या मागे लागतो. काय आहे हे? तुम्हाला जमत नसेल तर मी मुख्यमंत्र्यांशी बोलतो. मग आम्ही मिळून तुमची ठासू." आणि त्याने रागाने फोन ठेवला.
"निघ इथून आणि जर पुन्हा दिसला ना तर मारून टाकेल." त्याने पिंगळेला धमकी दिली.
पिंगळे अक्षरशः पाठीला पाय लावून पळला.
त्याला असं जाताना बघून हेमंत आश्चर्यचकित झाला.
"दादा, काय केलं तू?"
"भाऊ, विचारू नको. त्या देवरे आमदाराला फोन लाव."
"का?"
कारण आजपर्यंत आपण पोलीस विकत घेतलेत, आता राजकारणी विकत घ्यायची वेळ आलीय.
हेमंत त्याच्याकडे बघतच राहिला.
*****
पैशावाला माणूस कधीही कुरूप असत नाही.
हा तर आधीच चारचौघात उठून दिसणारा होता.
आणि आता त्याला पैशाची एक वेगळीच झळाळी प्राप्त झाली होती.
रेग्युलर जिम, डायट, आणि पैसा, सगळ्यांचं एक नवीनच रसायन तयार झालं होतं.
मानस नागरे आता हिरो बनला होता...
दर शुक्रवारी रात्री आणि शनिवारचा पूर्ण दिवस नेहमी एक नवीन मुलगी त्याच्यासोबत असायची.
तो कमीत कमी एक लाख तरी तिच्यावर उडवायचा.
त्र्यंबकेश्वर रोडच्या हॉटेल बॉलीवूड मध्ये आजही त्याची नजर सगळीकडे भिरभिरत होती.
...आणि आज त्याला लॉटरी लागली, कारण एक अमेरिकन मुलगी त्याच्या कह्यात आली होती.
...तो तिला घेऊन लिफ्टमधून खाली उतरला. ती त्याच्या खांद्यावर झुलतच त्याच्यासोबत आली.
त्याने गाडी स्टार्ट केली, व वेगाने पुढे आणली.
रात्रीचे बारा वाजले होते...
महात्मानगर कडून तो गंगापूर रोडकडे वळाला.
...आणि त्याला ती दिसली.
एकटी... कुणाची तरी वाट बघत.
पंजाबी ड्रेस, ओढणी आणि लांबसडक केसांची वेणी...
साधीशी, लोभस, गोल चेहऱ्याची.
...एक माणूस ॲक्टिवावर आला.
ती त्याच्यामागे बसली, आणि निघूनही गेली.
... याच्या हृदयात मात्र एक जीवघेणी कळ उठली होती...
'किती सुंदर आहे ही...'
...त्याच्या नजरेसमोरून ती आता जात नव्हती.
...मेथचा राजा पहिल्यांदा कुणाच्या तरी प्रेमात पडला होता...

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरदस्त!!
कथेच्या ओघात वहात जाणारा
केशवकूल.

उशीरा येणार होता ना हा भाग ?
आत्ता टाकल्याबद्दल काही तक्रार नाहीय..

मानसच्या उद्योगाबद्दल दादासाहेबाना आणि त्यांच्या माणसांना काहीच ठाऊक नाही ?
हेरखाते काय करतेय त्यांचे?

नायिकेची एण्ट्री झाली तर ... !!

मानसच्या उद्योगाबद्दल दादासाहेबाना आणि त्यांच्या माणसांना काहीच ठाऊक नाही ?
हेरखाते काय करतेय त्यांचे? >>>> +१

सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद!

दादासाहेब कथेच्या ओघात येतीलच, पण ही कथा पूर्णपणे मानसची आहे, आणि तोच ओघ कायम ठेवण्याचा प्रयत्न असेन.