क्षितिजावर एकल संध्या, क्षितिजापासून उदास,
झोळीत नभाच्या पसरे, तपकिरी खिन्न संन्यास -।।धृ।।
मातीचे फिटते देणे, मातीत मिसळता माती,
उत्सवास एकांताच्या, एकटेपणाची भीती,
चालणे नव्याने आता, उरलेला जुना प्रवास... ।।१।।
झोळीत नभाच्या पसरे, तपकिरी खिन्न संन्यास -।।धृ।।
घन निळे-जांभळे गहिरे, सोडून जाताना मागे,
हुंदक्यात उमलून येते, घर होते हळू-हळू जागे,
अंगणातील तुळशीचे, सावकाश मिटले श्वास... ।।२।।
झोळीत नभाच्या पसरे, तपकिरी खिन्न संन्यास -।।धृ।।
ती नदी तरंगून जातो, थरथरता पिवळा मोती,
पूर्वेवर पैलतिराच्या, उगवेल पुन्हा आसक्ती,
स्मृतीबिंब फिकट झालेले, ओझरणारा सहवास... ।।३।।
झोळीत नभाच्या पसरे, तपकिरी खिन्न संन्यास -।।धृ।।
चहूकडे अंथरत जाते, अंधाराची आरास,
परतून येण्याचे विरती, शेवटचे काही भास,
कोपऱ्यात दीपकळीचा, मिणमिणता निस्तेज प्रकाश... ।।४।।
झोळीत नभाच्या पसरे, तपकिरी खिन्न संन्यास
क्षितिजावर एकल संध्या, क्षितिजापासून उदास -।।धृ।।
वा किती सुंदर आहे. खूप आवडली.
वा किती सुंदर आहे. खूप आवडली.
झोळीत नभाच्या पसरे, तपकिरी
झोळीत नभाच्या पसरे, तपकिरी खिन्न संन्यास
क्षितिजावर एकल संध्या, क्षितिजापासून उदास
आवडली.
अप्रतिम !
अप्रतिम !
सुंदर!
सुंदर!
एकंदरीत चांगली आहे.
एकंदरीत चांगली आहे.
सुंदर!
सुंदर!
सामो, केशवकूल, sanjana25,
सामो, केशवकूल, sanjana25, अज्ञातवासी, हीरा, कुमार१ - सर्वांचे, मनापासून आभार _/\__/\__/\_