मुंबई एअरपोर्ट जवळ लेडीज साठी सुरक्षित चांगले हॉटेल सुचवा.

Submitted by मीफुलराणी on 3 February, 2023 - 09:15

मार्च महिन्यात मुंबई वरून सकाळी ९ वाजताची फ्लाईट आहे, पुण्यावरून सकाळी लवकर निघण्यापेक्षा रात्री मुंबई एअरपोर्ट शेजारी राहून सकाळी ६ वाजता एअरपोर्ट ला जाता येईल. मुलगी आणी मीच आहे, कुणाला माहित असेल तर सुरक्षित चांगले हॉटेल जे एअरपोर्ट जवळ असेल असे सुचवा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Hotel Avion : एअरिपोर्ट समोरच ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर.
एअरपोर्टला कॉम्प्लिमेंटरी ड्रॉप- पीक अप आहे. ₹५००० आसपास.

पारल्यात थोडे आत Hotel Satellite. रेट जरा कमी असेल.
हे पण कॉम्प्लिमेंटरी ड्रॉप- पीक अप करतात.

Hotel Niranta is the best. Right at the airport. Very safe. You can enter terminal 2 from the hotel directly. They need boarding pass /ticket before they can check you in. I have stayed there and felt 100 % safe. When its your flight time you just go to check in floor directly. You can do hourly stay as well.

Hotel Niranta >>> तेरा हजार रूपये सिंगल रूम आणि टॅक्सेसचे जवळपास २५०० रूपये ? मायबोलीवर माझ्यासारखे गरीब लोक पण आहेत हो. अंधेरी, यारी रोड साईडची पण सुचवा कि. हजार रूपयांपासून मिळतात. त्याचं भाडं भरायला पण मी येताना प्रवासात कंगवे, रूमाल, नेलकटर , चाणक्यनीती, श्रीमंत कसे व्हावे, आनंदी कसे व्हावे, कोकशास्त्र ही पुस्तकं विकत येतो. एसटीने आलो तर कंगवा पाच रूपये, ट्रेनने आलो तर जनरल ५ रूपये, एसी चेअर कार मधे २०० रूपयाला. विमानाने आलो तर २००० रूपये. १५००० रूपये भाडं भरायला मला हॉटेलमधे प्रत्येक रूममधे जाऊन या वस्तू अदानी शेअरच्या वाढीच्या पटीत विकाव्या लागतील.

आयबिस व मॅरिअट पण आहे. एकटी स्त्री व बरोबर मूल असेल तर थोडा खर्च करुन चांगल्या क्वालि टीच्या हॉटेलात राहावे. हे एअर्पोर्ट च्या फारच जवळ आहेत. विचारल्यास सोडतील पण नाहीतर उबर करता येइल अगदी मिनिमम डिस्टंन्स आहे. ओयो रूम्स च्या आजिबात फंदात पडू नका.
शेडी हॉटेल्स पण खूप आहेत.

"सोयीस्कर" कुठले असे विचारणे मी एकवेळ समजू शकतो, पण "सुरक्षित"?
सुरक्षेसाठी दिल्ली आधीच बदनाम आहे. पण मुंबईसारख्या शहरात "सुरक्षित" हॉटेल कुठले, असे विचारावे लागते, हे अधोगतीचे लक्षण आहे का? सिंगापूर, टोक्यो अशा शहरात हा प्रश्न कधी विचारला जातो का?

हो
आय सहमत विथ अमा.त्यातल्या त्यात जिंजर किंवा आयबीस. आणि नीट आयडी प्रूफस मागणारे हॉटेल.
(जोगेश्वरी ला एका ओयो हॉटेल मध्ये एकटी राहिले होते.तसे नातेवाईक जवळपास 5 स्टेशन सोडून होते पण वेळ कमी असल्याने जवळ राहायचं होतं.)
स्टाफ चांगला होता.आयडी प्रूफ मागून मेकमायट्रिप वरून बुकिंग केलं होतं.पण खोल्या छोट्या आणि विचित्र लाईट वाल्या होत्या.कॉरिडॉर आणि रिसेप्शन एरिया साधारण बाथरूम इतका छोटा होता.उगीचच हॉटेल डिसेंट आठवलं. Happy

आणि सुरक्षित आहे का हा प्रश्न दिल्ली, मुंबई, पुणे, सिंगापूर,पॅरिस, इटली कुठेही विचारावाच. त्यातल्या त्यात गुगल मॅप आणि इतर जागचे रिव्ह्यू वाचून गेल्यास थोडा दिलासा.

कुठलेही शहर हे १००% सुरक्षित असते का? एखादे शहर कितीही सुरक्षित असेल तरीही पाहिल्यांदा तिथे जाताना माहिती करुन जाणेच योग्य. मुंबई किंवा कोणतीही शहर कितीही सुरक्षित असले तरी योग्य ती काळजी घेणे हे केव्हाही चांगलेच.

शहर कितीही सुरक्षित असले तरी योग्य ती काळजी घेणे हे केव्हाही चांगलेच. हे १००% बरोबर आहे.
पण कुठल्याही शहरात आपण सोय, बजेट आणि सुरक्षा बघतोच की. माझा प्रश्न प्राधान्य कशाला दिले आहे, यासंदर्भात होता.

ओयो म्हणजे बजेट हॉटेल्स असतात.मोठ्या शहरात कमी पैश्यात आणि गजबजलेल्या वस्तीत असतात.
ओयो 3-4 वर्षापूर्वी जोरात होते.आता डाऊन आहे.आम्ही 5-6 जागच्या ओयो हॉटेल्स ना राहिलो आहे.कमी वेळ, एखादाच मुक्काम आणि खूप पैसे मोजायचे नसतील तर जवळचं ओयो हॉटेल असं गणित.पण करोना पश्चात ओयो हॉटेल्स ची स्थिती आणि दर्जा याबाबत माहिती नाही.

अंतर्देशीय की आंतरदेशीय उड्डाण करायचे आहे याचा खुलासा करावा अशी मी धागाकर्तींना विनंती करतो.

देश विदेशात त्या प्रवास करतात.
त्यांना कसले सल्ले देत आहात.
त्यांस सर्व धोके ,अडचणी ह्याची जाणीव आहे.
फक्त आणि फक्त मुंबई विमानतळ जवळ कोणते.
स्वस्त,सुरक्षित ( म्हणजे फसवणूक म करणारे जी आश्वासन दिली आहेत त्या सेवा पुरवणारे) हॉटेल आहे इतकाच त्यांचा प्रश्न आहे.
स्त्री साठी प्रवास कसा धोकादायक ह्या वर तुमची मत नकोत.
त्यांस माहीत आहे

धागा वाचतोय. येथील माहिती कामात येईल.
धागाकर्त्यांनी बजेट दिले असते तर नेमके सुचवले गेले असते.
पण ते नाही दिलेय हे एका अर्थी चांगलेच आहे. सर्व बजेटचे सल्ले येतील.

सुरक्षित म्हणजे मला वाटते जब वुई सारखे हॉटेल डिसेंट वा तत्सम निघायला नको हे अपेक्षित असावे. अंदाज चुकीचाही असू शकतो.
अर्थात अश्या हॉटेल्समध्येही सुरक्षित हॉटेल्स असतात. सगळी काही रेड पडणारी नसतात. पण तेही फॅमिलीने टाळलेले उत्तम ईतकेच.

मी २ मुले घेऊन एकटीने प्रवास करताना कोर्टयार्ड बाय मॅरिअट ला राहिले होते मागे, म्हणजे किमान ८-९ वर्षापूर्वी. लोकेशन पर्फेक्ट आहे, १० मिनिटात एअरपोर्ट, त्यांची कॉम्प्लिमेन्टरी शटल होती. फूड फार भारी. कॉन्टिनेन्टल, इन्डियन इ. सेफ्टी च्या द्र्ष्टीने म्हणाल तर ओवर द टॉप च होते, म्हणाजे तुम्ही हॉटेल गेस्ट असल्याशिवाय ( की स्कॅन केल्याशिवाय) एलेवेटर उघडत नाही. आणि तेही तुमची रूम असलेल्या फ्लोरलाच तुम्हाला अ‍ॅक्सेस असतो. कदाचित कॉमन असेल तिकडे पण इथे अमेरिकेत इतका बंदोबस्त असलेला आठवत नव्हता कुठे.

जे दावे हॉटेल करते ते पाळणारे म्हणजे सुरक्षित
>>>

हे सुरक्षित सर्वांसाठी झाले.
त्यात महिलांसाठी सुरक्षित म्हटलेय म्हणून गैर धंदे न चालणारे वा मद्यपान करणाऱ्यांचा त्रास नसणारे असेच पहिले डोक्यात येते.

अजून चांगली सुरक्षा हवी असेल तर The Westin powai lake. तिथे स्निफर डॉग पण असतात गाडी सामान चेक करायला.

( की स्कॅन केल्याशिवाय) एलेवेटर उघडत नाही. आणि तेही तुमची रूम असलेल्या फ्लोरलाच तुम्हाला अ‍ॅक्सेस असतो>> हे कॉमन झालेय 5 star पासून.

मी काही वर्षान्पुर्वी एकदा हॉटेल Radisson मधे राहीलो होतो. एकन्दर सोय छान आहे. ४-५ च्या सुमारास खर्च येतो. पण सोयीसुविधा खूप छान आहेत. सेवकवर्ग खूप अदबशीर आणि नम्र आहे.

बर्‍याचदा बूकिन्ग फ़ुल असते, प्रीबूक करायचा प्रयत्न करा.

देश विदेशात त्या प्रवास करतात.
त्यांना कसले सल्ले देत आहात.
त्यांस सर्व धोके ,अडचणी ह्याची जाणीव आहे.
फक्त आणि फक्त मुंबई विमानतळ जवळ कोणते.
स्वस्त,सुरक्षित ( म्हणजे फसवणूक म करणारे जी आश्वासन दिली आहेत त्या सेवा पुरवणारे) हॉटेल आहे इतकाच त्यांचा प्रश्न आहे.
स्त्री साठी प्रवास कसा धोकादायक ह्या वर तुमची मत नकोत.
त्यांस माहीत आहे

नवीन Submitted by Hemant 33 on 5 February, 2023 - 11:00 >>>> स ह म त