सतरंगी रे....! Never stop chasing rainbows..!

Submitted by मनिम्याऊ on 3 February, 2023 - 05:06
Never stop chasing rainbows

Why pink is not there in rainbows?

विजयलक्ष्मीला (माझ्या 6 वर्षांच्या मुलीला) पडलेला प्रश्न.. आणि मला पडलेला प्रश्न की तिला समजेल असे काय उत्तर द्यावे? पण खात्री होती कि उत्तर मिळणारच.
मग इथेच मायबोलीवर जाणकारांना विचारले

https://www.maayboli.com/node/69520?page=2

अस्मिताने सांगितलं कि
"गुलाबी रंग हा निळा व लाल किंवा जांभळा रंग मिसळून होतो. ते इंद्रधनुष्यात किंवा स्पेक्ट्रमवर एकमेकांपासून लांब आहेत, कुठेतरी त्या रंगांचे तरंग एकमेकांवर आले असते तर गुलाबी रंग तयार झाला असता पण हे एकमेकांपासून दूर आहेत. आपण जो गुलाबी म्हणतो तो लाल आणि पांढरा मिसळूनही होतो. पण पांढरा रंग हा रंग नाहीचये, तो व गुलाबी रंग आपल्या नजरेने तयार केलेल्या छटा आहेत (म्हणे.)!"

अमितव यांनी सुचवले कि
"त्या निमित्ताने तीन बेसिक रंग देऊन मुलीला ते वेगवेगळ्या प्रमणात एकत्र करुन दुसरे रंग तयार करायची जादू एक्सप्लोर करू द्या. मजा येईल तिला."

आणि खरंच आम्ही ते मनावर घेतलं. तिला क्रेयॉन्स घेऊन वेगवेगळे रंग एकावर एक लावून नवे नवे रंग तयार करायला दिलेत. पण तिचं समाधान होईना. डोक्यामध्ये पिंक रंग असणारं रेनबोच फिरत होतं. आणि पिंक रंग रेनबोमधेच हवा होता.

आज दुपारी अभ्यास करता करता तो युरेका मोमेन्ट आला. खिडकीतून ऊन येत होतं आणि तिथे टांगलेल्या क्रिस्टल बॉल मधून इंद्रधनुषी कवडसे तिच्या वहीवर पडत होते.
"आssssई ...!" अशी excitement भरलेली जोरदार हाक आली.
"लवकर ये !"
"बघ बघ किती छोटे छोटे रेनबो आलेत. आता गंमत करू आपण"
आणि असं म्हणून तिने पळत पळत जाऊन आमच्या खोलीच्या खिडकीत टांगलेला दुसरा क्रिस्टल बॉल आणला. आणि आधीच्या कवडस्यांच्या बाजूला नवे कवडसे घालायला सुरवात केली.
WhatsApp Image 2023-02-03 at 2.35.17 PM.jpeg

बरोबर हवं तसं फिरवून लाल रंगावर निळा रंग येईल असं अड्जस्ट केलं
ezgif.com-gif-maker.gif
.

आणि ......
WhatsApp Image 2023-02-03 at 3.14.26 PM.jpeg
बिंगो S S S S S
WhatsApp Image 2023-02-03 at 2.29.57 PM.jpeg
.

WhatsApp Image 2023-02-03 at 3.07.38 PM.jpeg
.

जॅकपॉ SS ट ... कि

इंद्रधनुष्याच्या तळाशी लपलेला विज्ञानाच्या सोन्याचा पॉट

(शीर्षकाचा फोटो म्हणजे या प्रश्नाचं जन्मस्थळ. डिसेंबरच्या सुट्टीत चित्रकोट धबधब्याला भेट दिली असता तिथले रेनबो बघून आम्ही विचारात पडलेलो Happy )

Update: 6feb2023
गेले दोन दिवस प्रचंड पाठपुरावा करून, कवडस्यांचे निरीक्षण करून आम्ही crystal balls च्या जागा फिक्स केल्यात जेणेकरून थोडा वेळ तरी रेनबोमध्ये गुलाबी रंग दिसावा. जरा यश मिळत आहे बरं..
Screenshot_2023-02-06-15-28-20-128_com.whatsapp.jpg

हे बघा
IMG-20230206-WA0004.jpg
आणि आम्हाला झालेला आनंद
IMG-20230206-WA0002.jpg

शाळेत teacher ला सगळं सांगून झालं. Moral of the experiment is "pink colour is the baby of rainbow, coz it is made by a mom and dad rainbows"

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ए हे लय भारी आहे! विजयलक्ष्मीला शाब्बास!

स्वतः प्रश्न पडलेला तो विचारला, आईच्या मदतीने लिट्रेचर रिव्ह्यू, माबोकरांच्या सल्ल्यानंतर हायपोथिसीस बनवला, योग्य वेळ येताच आपल्या चौकस छोट्या माऊने उपलब्ध साधनात प्रयोग डिझाईन केला, अनेक प्रयोग करून हायपोथिसिस तपासून बघितला, प्रयोग आणि यशस्वी प्रयोग यांची निरीक्षणं नोंदवली, पुरावे जतन केलेत, त्या पुराव्यांसकट तो (छोट्या माउने शाळेत आणि मनिम्याऊने माबोवर) सांगितला/पब्लिश केला. अशा रीतीने संशोधनाची एक संपूर्ण प्रक्रिया अतिशय योग्य आणि यशस्वी पद्धतीने पूर्ण झाली. चौकस बुद्धीने प्रश्न विचारणे, त्याचा पाठपुरावा करून त्याची उकल शोधून काढणे आणि लागलेला शोध इतरांनाही सांगणे ह्यातून निखळ आनंद मिळाला असणार. हे लहान मुलीला शिकवणं सोपं काम नाही. तुमचं पालक म्हणून अभिनंदन आणि मुलीला माझ्यातर्फे बक्षीस.

Pages