वाळवी, वेड सिनेमे का उतरवले ? त्यांचे आर्थिक नुकसान कोण भरून देणार ?

Submitted by ढंपस टंपू on 1 February, 2023 - 05:33

मराठी भाषेतले चित्रपट का चालत नाहीत असे ओरडणारे चांगल्या चाललेल्या वेड आणि वाळवीचे शो पठाण साठी कमी केल्यावर काहीच का बोलत नाहीत ? आधीच हे चित्रपट कमी स्क्रीनवर रिलीज झाले. त्यात त्यांना प्राईम शो कमी मिळाले. पठाण मुळे त्यांचे शोज असून नसल्यासारखे आहेत. प्राईम टाईम मधे तर शोधूनही सापडत नाहीत.

गेल्या आठवड्यात रिलीज झालेल्या गडद अंधार , बांबू, पिकोलो या चित्रपटांना मोठ्या मिश्किलीने थोड्याशा स्क्रीन मिळालेल्या आहेत. मराठी चित्रपट जगवायचे म्हणून जाणार्‍या सिनेप्रेमींनी त्यांना आश्रय दिला तरी इतक्या कमी स्क्रीनवर तग धरण्यापलिकडे काही होऊ शकत नाही. अक्षरशः २० ते ३० हजाराचे कलेक्शन होतेय एका शो चे. तेव्हढेच शोज आहेत. काही चित्रपटांना तर स्क्रीनच मिळत नाही. अनन्या सारखा चांगल्या विषयावरचा चित्रपट कमी शोज मुळे लगेचच ओटीटीवर आला. स्क्रीन्स न मिळाल्याने धंदा नाही. धंदा नसल्याने ओटीटी वाले पण जास्त पैसे देत नाहीत. निर्मितीचा खर्च सुद्धा वसूल होत नाही.

वेड, वाळवीला वाढती गर्दी पाहता काही ठिकाणी त्यांचे स्क्रीन्स वाढवणार होते. पण पठाणने सगळ्याच स्क्रीन्स बुक केल्याने आहेत ते सुद्धा कमी झाले.

आपण महाराष्ट्रात राहतो. नेहमीच हा प्रकार घडतो तरी आपण गप्प का ? मग मराठी चित्रपट चालत नाहीत म्हणून निर्लज्जपणे आरडाओरड करायचा आपल्याला हक्क आहे का ? याचा अर्थ मराठी चित्रपट बनवूच नयेत का ?

पठाण चालल्याने बॉलीवूडला फायदा होतो म्हणणार्‍यांना अक्कल आहे कि नाही ? इतर सर्व चित्रपटांचा धंदा बुडवून हे इतरांचा कसा काय फायदा करतात ?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला या नवनवीन आयडी घेऊन येणाऱ्या व्यक्तीचे कौतुक वाटते... शैली वरून कळते कि हे तेच आहेत पण इतका पर्सिव्हरेन्स इतकी चिकाटी... दाद दिली पाहिजे खरंच....

शैली वरून कळते >> तुम्ही अ‍ॅडमिन म्हणून कमेंटी, आयडी उडवता ना ? तुम्हाला कशाला पाहीजे शैली ? डायरेक्ट कळतं ना ?
आमच्यासारख्यांना शैलीवरून ओळखावं लागतं कि कटप्पा, झंपू हे कुणाचे आयडी असतील, मार्मिक कुणाचा आयडी असेल, बिथोविन कुणाचा असेल, आणि अजून काही आहेत जे उडवले तुम्ही नाईलाजाने.

आणि जर पठाण किंवा असे तुमच्या मते लै डिमांड असलेले पिक्चर येतात तेव्हां साऊथ इंडीयात दक्षिणी भाषेतले पिक्चर काढून का रिलीज करत नाहीत ? फायदा तर तिकडं पण व्हायला पाहीजे ना ? लिहीलंय हे आधी. तुमची व्हेंट काढण्याच्या नादात दुर्लक्ष झालं.>>>>> हे काहीच कळलं नाही.

दुनियादारी धमकी देऊन पुन्हा आणला आणि तो धो धो चालला असं म्हणत असाल तर मग एक टाईम गल्ती झाली असेल मालक लोकांची. त्यांनी लक्षात नसेल आलं की पब्लिकला किती आवडला ते. पण नुसती दादागिरी करायला, किंवा घुसखोरी करायला कशाला ते एक पिकचर काढून दुसरा लावतील? मराठी ऑडियन्सला मराठी पिकचर बघता यावे ह्या हेतूनी सिनेमा हॉल उघडला तरच हे शक्य आहे. पैसे कमवायला उघडला तर अर्थातच ज्याला डिमांड आहे ते पिकचर ते लावायला बघतील आणि त्या बद्द्ल तुम्ही अन मी वाफ सोडल्याव्यतिरिक्त काय करु शकतो?

पठाणचे सकाळचे शोज रिकामेच होते. ते वाळवीला दिल्याने काय फायदा होणार?
सकाळी सकाळी office goers, विद्यार्थी, गृहिणी, हातावर पोट असलेले यातले कोण जाईल?

>>>>>

मी पठाणला सकाळच्या सव्वानऊच्या शो ला गेलो. ते ही सहकुटुंब.
मी वाळवीला रात्री साडेदहाच्या शो ला गेलो. ते ही एकटाच.

नुसतीच खडाखडी करण्यापेक्षा आकडे द्या. मी कुठल्यातरी धाग्यावर एक लिंक दिली आहे. त्यात किती स्क्रीन्स, एकूण सीट्स किती, शोजची संख्या किती हे दिलेले आहे. त्याच साईटवर जाऊन प्रत्येक सिनेमाचे तपशील पाहू शकता. आणखी एक लिंक मायबोलीवरच गेल्या चार पाच दिवसात दिली आहे. त्यात सकाळची ऑक्युपन्सी किती, दुपारची किती आणि रात्रीची किती, टक्केवारी किती असे तपशील दिलेले आहेत. पठाणच्या कुठल्यातरी धाग्यावर असेल.

धागा चुकला शांत माणूस... हा धमपास टेम्पू ( कसले आयडी घेतात.. लिहायला किती त्रास...) यांचा धागा आहे...

प्रत्येक विकेंडला कुठला तरी पिक्चर बघायलाच हवा हे ॲडीक्शन आहे का लोकांना? >> हो तसं असतं खरं काही लोकांना. काहिंना एखादा वीकेंड फ्री असतो मग त्या वेळी वेड लागलेला नसेल तर बघायचा असून ही राहून जातो मग वेळ घालवायला पठाण सारखा तद्दन फालतू (काहिंना पैसा वसूल वाटू शकेल) बघावा लागतो!

झंपु दामलु तुमच्या धाग्यावर मला बंदी आहे काय? Lol
मार्मिक आणि तुम्ही एखाद्या बागेत बसून माझ्यासाठी एक नाव नक्की करा. माझाच गोंधळ व्हायचा अशाने.

काहिंना एखादा वीकेंड फ्री असतो मग त्या वेळी वेड लागलेला नसेल तर बघायचा असून ही राहून जातो मग वेळ घालवायला पठाण सारखा तद्दन फालतू (काहिंना पैसा वसूल वाटू शकेल) बघावा लागतो!
>>>>

वेड आल्यानंतर चार आठवड्याने पठाण आला.
चार आठवडे वेड बघायचा नाही.
पठाण मात्र पहिल्याच आठवड्यात बघायचा. त्याला नाईलाज बोलायचे Happy

अवांतर - पठाण तद्दन फालतू असेल तर ही निव्वळ आणि निव्वळ शाहरूखची जादू (बदाम बदाम बदाम) म्हणू शकतो जे लोकं करोडो रुपये खर्च करून त्याला बघायला जात आहेत..

वेड आल्यानंतर चार आठवड्याने पठाण आला.
चार आठवडे वेड बघायचा नाही.
पठाण मात्र पहिल्याच आठवड्यात बघायचा. त्याला नाईलाज बोलायचे >>> लोकांनी कधी सिनेमे बघायचे हे पण तुम्ही ठरवणार का ? वाळवीचा धागा वर्षभर आधी का काढला नाही ? वेडचा धागा तर काढलाच नाही उलट लोकांना झापताय. तुम्हाला मराठी पिक्चर जगो कि मरो काहीही वाटत नाही. धंदा पर गंदा है असे गंदे तत्त्वज्ञान सांगताय. तुम्ही जर वर्षभर आधी वेडचा धागा काढला असता तर लोकांनी तसे प्लानिंग नसते का केले ?

टीप - सगळेच लोक धागे काढण्याइतके, पिक्चर रिलीज झाल्याबरोबर हातातली कामे टाकून पळत जाऊन पिक्चर बघण्याइतके रिकामटेकडे नसतात. स्वतः धागाकर्त्याने पठाण रिलीज होऊन चार दिवस झाले तरी पाहिलेला नव्हता. त्याची निर्लज्ज कबुलीसुद्धा दिली आहे. आताही पाहिलाय कि नाही याची कल्पना नाही. तो स्वतः शाहरूखखानचे सगळे पिक्चर बघत नाही. तरी शाहरूखखानचा फॅन आहे असे खोटेच सांगतो. त्याने हा पिक्चर पाहिलाय कि नाही यावर विश्वास ठेवता येत नाही. सहकुटुंब जाण्याइतका तो उदार वाटत नाही. चिंगूस, चिंधीचोर मनुष्य कशाला सहकुटुंब जाईल ? पाहिलाच असेल तर बॉयकॉट ग्यांग बरोबर पायरेटेड पाहिला असेल.
हा लोकांना कसे जाय झापू शकतो ? इतके रिकामटेकडेपण सार्वत्रिक झाले आहे का ?

तुम्ही जर वर्षभर आधी वेडचा धागा काढला असता तर लोकांनी तसे प्लानिंग नसते का केले ?
>>>

चला माझ्या धाग्यांनी लोकं प्लानिंग करतात हे तरी मान्य केले. काही लोकांना मला हे श्रेय देणेही जड जाते Happy

वेड काय वाळवीचा धागाही वर्षभर आधी काढला असता. पण मुळात माझ्यापर्यंत तो पोहोचायला तरी हवा. पठाणचा धागा वर्षभर आधी आला कारण तेव्हापासूनच त्याची हवा केली गेलेली. मराठी चित्रपट या बाबतीत कमी पडतात. म्हणून तर मग मी मला जेव्हा समजते तेव्हा लगेच हातभार लावतो आणि जास्तीत जास्त लोकांना एखादा चांगला मराठी चित्रपट समजेल हे बघतो Happy

चला माझ्या धाग्यांनी लोकं प्लानिंग करतात हे तरी मान्य केले. काही लोकांना मला हे श्रेय देणेही जड जाते >>> वाळवी तुमच्यामुळे चालला असा तुमचा दावा आहे म्हणून

पठाणचा धागा वर्षभर आधी आला कारण तेव्हापासूनच त्याची हवा केली गेलेली. >>> कुणी केली हवा ? मायबोलीच्या बाहेर तर मला दिसली नाही.

कुणी केली हवा ? मायबोलीच्या बाहेर तर मला दिसली नाही.
>>>

अहो मग माझा धागा कसा आला?
मला काय शाहरूखने फोन करून वर्षभर आधी सांगितले का की माझा पिक्चर येतोय..
मार्च महिन्यात त्याचा पहिला टीजर येतो आणि त्याला करोडो व्यू पडतात

मराठी चित्रपट या बाबतीत कमी पडतात. म्हणून तर मग मी मला जेव्हा समजते तेव्हा लगेच हातभार लावतो >> पठाणने मराठी पिक्चर काढायला लावले याचे समर्थन केले तुम्ही.

सैराटची हवा वर्षभर नव्हती तरी चालला तो. असे लाखो पिक्चर्स असतील. त्यामुळं तुमचा गैरसमज दूर करा. फक्त अधिकारवाणीने लोकांना झापणे बंद करा.

स्वतः धागाकर्त्याने पठाण रिलीज होऊन चार दिवस झाले तरी पाहिलेला नव्हता. त्याची निर्लज्ज कबुलीसुद्धा दिली आहे.
>>>

अहो याचाच तर अभिमान आहे मला.

माझे शाहरूखप्रेम आंधळे नाहीये Happy Happy

मला काय शाहरूखने फोन करून वर्षभर आधी सांगितले का की माझा पिक्चर येतोय.. >>> तुम्हाला बॉयकॉट ग्यांगने पैसे दिले असतील आत्तापासून लोकांचे रक्त खवळले पाहीजे शाहरूख नाव काढले कि म्हणून. नाहीतर कुणीही नॉर्मल माणूस आपला ज्या पिक्चरशी निर्माता दिग्दर्शक कलाकार म्हनून संबंध नाही त्याचा धागा वर्षभर काढेल का ? तुम्हाला जर मुलं असतील तर जन्माआधी वर्षभर धागा काढला होता का ? ऐकायला थोडं विचित्र वाटेल पण हेच उदाहरण सटीक आहे.

पठाणने मराठी पिक्चर काढायला लावले याचे समर्थन केले तुम्ही.
>>>

तुम्ही माझ्या सर्व पोस्ट पुर्ण वाचल्या नाहीयेत. मी समर्थन नाही केले तर तसे का होते हे दाखवले आहे. त्यावर तोडगा म्हणून कायदा गरजेचा आहे. नुसते थिएटरमालकांनी असे वागावे म्हणून अपेक्षा धरण्यात अर्थ नाही. ते व्यवसायच बघणार.

नाहीतर कुणीही नॉर्मल माणूस आपला ज्या पिक्चरशी निर्माता दिग्दर्शक कलाकार म्हनून संबंध नाही त्याचा धागा वर्षभर काढेल का ?
>>>>

वाह.. रावण मेला आणि तुम्ही रामाची सीता कोण आता विचारत आहात

अहो हेच तर ते शाहरूख प्रेम.. बदाम बदाम बदाम

गंदा है पर धंदा है असे तुम्ही म्हटले आहे.

त्यावर तोडगा म्हणून कायदा गरजेचा आहे. नुसते थिएटरमालकांनी असे वागावे म्हणून अपेक्षा धरण्यात अर्थ नाही. ते व्यवसायच बघणार. >>> चूक. वरती बर्‍याच जणांनी म्हटल्याप्रमाणे साऊथमधे कायदा नाही. तरी थिएटरमालक इथल्यासारखी डेरिंग करत नाहीत. मराठी प्रेक्षकांनी मराठी पिक्चर बघित्ला पाहीजे. ते तयार आहेत पण शोज नाहीत असे वर सगळ्यांनी म्हटले आहे. तुम्ही ते न वाचता माकडासारख्या उड्या मारताय.

व्यवसाय हे कारण असते तर चाललेले मराठी पिक्चर कमी शोज दाखवणे हे झाले नसते.
तुमचे सगळे मुद्दे चूक आहेत नेहमीप्रमाणे.

तुम्हाला आणि च्रप्स यांना मायबोलीवर लोकांना वैताग आणण्याचे करोडोंनी रूपये मिळतात. कारण तुम्ही जेव्हढा वेळ यासाठी घालवता त्यावरून नोकरीत तुम्हाला कामासाठी वेळ मिळत नसणार. असे धंदे करून तुम्ही मुंबईत तीन घरे घेतली आणि च्रप्स यांनी अमेरिकेत मोठी गुंतवणूक करून भारतातही करत आहेत आणि आता अमेरिकेत घर शोधताहेत रेंटने देण्यासाठी.

तरी थिएटरमालक इथल्यासारखी डेरिंग करत नाहीत.
>>>

तिथले थिएटरमालक स्थानिक असतील
आपले अमराठी असतील
तिथे असे केल्यावर लोकं थिएटरमध्ये नासधूस करत असतील.
आपल्याकडे असे करावे का?

एका धाग्यावर तुम्ही स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर आणि सुबोध भावेची हेटाळणी, टिंगल केली. यांना घेऊन पठाण काढायचा का असा प्रश्न विचारला. बाकिच्यांचे सोडा, पण तुम्ही सई ताम्हणकर आणि स्वप्नील जोशी तुमचे आवडते सुपरस्टार्स आहेत असे हजारदा सांगितलेले आहे. मग ही हेटाळणी कशी काय बाहेर पडली ?

यावरून तुम्ही मनात एक आणि प्रत्यक्षात दुसरेच असे व्यक्तीमत्व आहात हे कळते. स्वप्नील जोशीच्या हेटाळणीने तुमच्या मनातले खरे खरे बाहेर आले. हे दोघे तुम्हाला आवडतच नाहीत. पण आपण टीका न करता लोकांकडूनच त्यांना जोडे मारण्याचा कार्यक्रम उरकून घ्यायचा आणि आपण साळसूदपणे वाइट वाटल्याचे दाखवायचे हे तुमचे खरे चरित्र आहे.

या चरित्रानुसारच तुमचे शाहरूख प्रेम आहे.
जय हिंद !

सामना मी नक्की शाहरूखप्रेमी आहे की नाही Lol

तिथे नराठीच्या धाग्यावर तर बोलत आहात की मी शाहरूखप्रेमाच्या नादात मराठी चित्रपटांवरच्या अन्यायाचे समर्थन करतो.

आणि ईथे उलटेच Proud

एक काही तरी ठरवा
मी शाहरूख प्रेमी आहे की नाही? >>>> हा प्रश्न तुम्ही तिथे विचारला आहे. मराठी भाषा येणारा कुणीही सांगेल मला काय म्हणायचे आहे.
तुम्हाला तिकडे उत्तर हवे असेल तर हे तिकडे कॉपी करा. मला कंटाळा आला आहे आणि आता वेळ नाही.

एका धाग्यावर तुम्ही स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर आणि सुबोध भावेची हेटाळणी, टिंगल केली. यांना घेऊन पठाण काढायचा का असा प्रश्न विचारला...

>>>>

चूक
दुसऱ्या कोणीतरी स्वप्निल जोशीला घेऊन पठाण करा असे म्हटले होते.
मी त्यावरच पुढे म्हटले की मग जॉन जागी सुबोध आणि दिपिकाजागी सई किंवा सोकु ज्युनिअर घ्या म्हणजे पुर्ण मराठीच स्टारकास्ट होईल.
त्यात हेटाळणीही काही नव्हती. मला खरेच या मराठी सुपर्रस्टारना घेऊन असे बिगबजेट सिनेमे बघायचे आहेत. जे डब करून देशभरात जगभरात चालतील.
जर जॉनजागी डोल्लेशोल्लेवालाच हिरो हवा असेल तर आपला गश्मीर महाजनी आहेच.

Pages