मायबोलीवर एकाच चित्रपट / कलाकारावर किती धागे काढता येतात ?

Submitted by ढंपस टंपू on 1 February, 2023 - 02:22

मला बरेच कलाकार आवडतात. त्यांचे चित्रपट सुद्धा आवडतात. या कलाकारांवर मला त्यांचे छंद / शैक्षणिक माहिती / कौटुंबिक माहिती / अफेअर्स / करीअर / त्यांचे रँकिंग या व अशा अनेक विषयांवर धागे काढायचे आहेत. पण मायबोलीवर जर एका कलाकारावर , चित्रपटावर किती धागे काढावेत याची काही मर्यादा असल्यास ते डिलीट झाले तर मेहनत वाञा जाईल यासाठी हा प्रश्न विचारला आहे. कृपया मार्गदर्शन करावे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चार वर्षांनी शाहरूखचा चित्रपट आला...
चार दिवसात चार शे करोड कमावले..
चार धागे काय आले त्याच्यावर ...
तर ईतका आरडाओरडा??

चार दिन की जिंदगानी..
उससे भी कम ये जवानी..
करू द्या की मजा Happy

चार वर्षांनी शाहरूखचा चित्रपट आला...
चार दिवसात चार शे करोड कमावले..
चार धागे काय आले त्याच्यावर ...
तर ईतका आरडाओरडा??

चार दिन की जिंदगानी..
उससे भी कम ये जवानी..
करू द्या की मजा Happy

काहीच कल्पना नाही.
काही कळले नाही :).
म्हणजे किती काळानंतर चित्रपट आला याच्यावर किती धागे काढायचे असे पण असते का ?
लालसिंग चढ्ढा आमीर खानचा तीन वर्षानंतर आला होता ना ? किती धागे निघाले ?
विक्रम हा कमल हसनचा दहा वर्षानंतर आला होता. त्याच्यावर किती धागे निघाले होते ?
म्हणजे हे लक्षात ठेवून तेव्हढे धागे मी काढीन. जास्त झाले तर डिलीट करतात का ?
सांगा प्लीज.

पण खरेच नियम करायची वेळ आली आहे.
म्हणजे शाहरूखवर एखादा धागा काढायचा म्हटले तर तो ऋन्मेषनेच काढावा. ईतरांनी स्वतंत्र धागा काढू नये. जे काही असेल ते त्याच्याच धाग्यात लिहावे.

लग्नाची बदाम बदाम बायको आहे का माझ्या नवर्‍याबद्दल तुम्ही बोलू नका म्हणायला ?
>>>>>

एक्झॅक्टली डूड एक्झॅक्टली !

मी मुद्दाम उलटे लिहिलेले, धागाकर्त्यांच्या आक्षेपाला तुम्हीच उत्तर दिलेत Happy

धागाकर्त्यांच्या आक्षेपाला >>> कोणता आक्षेप ? मी फक्त माहिती विचारली आहे. तुमचं नाव घेतलं नाही, आक्षेप पण घेतलेला नाही. चोमचां केस वाटतेय.

याला चोमचां केस नाही तर ता ला जाऊन भां लपवणे बोलतात.
माझ्याच धाग्यांवर आहे हा धागा हेच कबूल करायचे नसेल तर मी जातो जेवायला. बाय Happy

माझ्याच धाग्यांवर आहे हा धागा हेच कबूल करायचे नसेल >>> तुमचा मेडीकल प्रॉब्लेम आहे असे वाटतेय. धमकी देताय चक्क. जबरदस्ती कबूल केले तर तुम्ही जेवणार नाही का ?
मी का कबूल करू ? मी तुम्हाला पाहीलेले सुद्धा नाही. तुम्ही मानव आहात कि पशू, नॉर्मल आहात कि कसे हे मला काहीही माहिती नाही, तरी तुमच्या धाग्यावर माझा धागा कसा काय असेल ?

प्रश्न वाचून पळून गेले की >>>> पळून जायचा प्रश्नच नाही. मी दुसर्‍या धाग्यावर सांगून गेलो होतो कि फ्री झाल्यावर येईन. कामात असताना पण दोन प्रतिसाद जास्तीचे दिल्याने कालचा दिवस पण फ्री झालो नाही.
तुमच्या प्रश्नात दमच नाही त्यामुळं त्याला महत्व द्यायचीही गरज नाही माझ्या मते. तुम्हाला हा प्रश्न पडला असेल तर माझ्यासारखे धाडस करून त्यावर धागा काढायला पाहीजे होता. मी नवीन असल्याने मला धागे काढण्याआधी जी माहिती हवी होती ती मी विचारली. त्याचे उत्तर द्यायच्या ऐवजी नवीन सदस्याला असे प्रश्न विचारणे हा आचरटपणा आहे.