चाफ्याचा स्पर्श

Submitted by sanjana25 on 29 January, 2023 - 05:12

अलगद हातात घेऊन मी
त्या फुलास स्पर्श केला
आणि माझ्या नकळत तो
असा काही एकरूप झाला
मनोहर रंग त्या चाफ्याचा
न्याहाळत रहावंसं वाटे
अन एकटक पाहता जणू
डोळ्यात आभाळ दाटे
काही स्पर्श सुंदर असतात
मोह नव्हे त्यात प्रेम असते
जगास न समजेल अशी
आपुलकी स्पर्शात भासते
माझ्या चाफ्याची सुद्धा
गंमत अशीच आहे बरं
त्याच्या स्पर्शानी तर माझं
जणू आयुष्य बहरलं सारं
त्याच्या सुगंधात चिंब चिंब
मनसोक्त भिजून मी घेतले
आजन्म पुरतील इतके
खूप सुंदर क्षण मी वेचले
त्या चाफ्याच्या सावलीत
बिथरलेले मन शांत होते
त्या सावलीचं छत्र कायम
सोबत रहावं ही प्रार्थना करते

sanjana

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

वा, सुंदर!!

"त्या सावलीचं छत्र कायम
सोबत रहावं ही प्रार्थना करते"
>> चाफ्याचं छत्र कायम तुमच्यावर असावं Happy