Submitted by deepak_pawar on 28 January, 2023 - 10:47
गोऱ्या गोऱ्या गालावरी
खुलतेय गोड खळी
चांदण्यांचं तेज जसं
रूप तिचं सोनसळी
बहरल्या फुलापरी हसते मधाळ ती
पौर्णिमेचा चांद जसा दिसते कमाल ती.
पापण्यात लपविते मनातलं गुज
सांजपरी रूप न्यारं भाळावर सजं
पाहुनिया तिला का रं वेड जिवा लागं
फिरतंय मन माझं तिच्या मागं मागं
नभातली कुणी परी भासते कमाल ती.
चाहुलीनं तिच्या माझं मोहरत मन
वाऱ्यातून घुमू लागे पिरतीच गाणं
लाजाळूचं झाड जसं लाजते कमाल ती.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आवडली.
आवडली.
छान, गेय कविता. हिला चाल
छान, गेय कविता. हिला चाल लावून बघा.
केशवकूल, हरचंद पालव आपले
केशवकूल, हरचंद पालव आपले मनःपूर्वक आभार.
हिला चाल लावून बघा.>>>हो चाल लावली आहे.
हिला चाल लावून बघा.>>>हो चाल
हिला चाल लावून बघा.>>>हो चाल लावली आहे.
कुठे? यू ट्यूब वर टाकली आहे का?
हिला चाल लावून बघा.>>>हो चाल
....
कुठे? यू ट्यूब वर टाकली आहे
कुठे? यू ट्यूब वर टाकली आहे का? <<<नाही.
नुसतीच चाल लावली आहे.
प्रयत्न चालू आहेत.
अरे वा! चाल ऐकायला आवडेल.
अरे वा! चाल ऐकायला आवडेल.
अर्रे सुंदर मस्त मस्त!! गेय
अर्रे सुंदर मस्त मस्त!! गेय आहे.