अग्निहोत्रः परत एकदा २०२३ च्या चश्म्यातून.

Submitted by अश्विनीमामी on 26 January, 2023 - 08:53

तर आपणा पैकी अनेक जण अग्निहोत्र परत पाहायला लागले असतील. ही जेव्हा पहिल्यांदा कास्ट झाली तेव्हा काही मी बघितलेली नव्हती. आता
इथलेच वाचून परत चालू केलेली आहे. तर हा पिसेकाढू विनोदी धागा आहे. सिरीअसली घेउ नका. व्याख्या विक्की वुक्ख्हू.

भागवाइज परीक्षण चालू करते. गजानना गजानना.

आज मी भाग १३ परेन्त बघितले गेम खेळता खेळता. जुने मोहन आगाशेचे भाग छान वाटतात जास्त. काय ते बायकांचे जिणे. चिंतामणीच्या आईचे डोजे छान दाखवले आहे. सिद्धार्थ चांदेकर म्हणजे नील ना. त्याचे कपडे आता विनोदी वाटतात तेव्हा एकदम कूल असतील. ते बनियान बायकांच्या स्लिप सारखे आहेत. व त्याची फिगर ही तशीच दिसते. बॉडी शेमिन्ग नाही फक्त निरीक्षण आहे. व फार केसाळ तोंड. तरुण मुली फार मोठे तोंड हलवत बोलतात. आता कोणीतसे बोलत नाहीत. जुने मोबाईल, हेड फोन. एकदम रिट्रो मामला. ती त्याची बहीण प्रिंगल्स खाताना दाखवली आहे म्हणजे रिकामा डबा घेउन हिंडते. ही भाडिपा मध्ये पण बहीण आहे ना.

विनय आपटे काय भारी कॅरेक्टर. किती ती ज्वेलरी व आयुर्वेदाचार्य म्हणे. महादेव काका बेस्ट वाटतात. विनय ची बायको कोण ती बाई माझा एक क्रशच आहे. फार गोड दिसते ती नटी. तिच्या साड्या दोन तीनच आहेत आलटुन पालटुन. व उगीचच फुल ब्लाउज आहेत. असे का बरे. तिचा मुलगा आस्ता द काळे का? कायम दोन टीशर्ट ते ही चे गवेरा वाले. मुलगा क्रांतिकारी आहे हे दाखवायला. गावाकड चे भाग जास्त एंजॉय करत आहे. काका रॉक्स.

हो अहो विक्रम गोखले पण आहेत. सर्व लोक फार तरुण व पोंक्षे तर प्री कॅन्सर त्यामुळे सुदृ ढ व फुल फॉर्मात अ‍ॅक्टिन्ग करत आहेत. शुभांगी गोखले त्या दिलीप म्हातारा आजोबा आहे त्या सिरीअल मध्येपण फार गोड दिसते. ती व ऐश्वर्या नारकर फार गोड सुरेख दिसतात. ते फोन परत द्या प्रकरण फारच ताणले आहे. तरुण प्रेक्षकांसाठी घातले असावे. तरुण मुली तेव्हा मुद्दाम आपण कूल आहोत दाखवायला च्यायला वगैरे म्हणतात ते आता आउट डेटेड आहे. शुभांगी एक निळी भोर साडी नेसते ती फार छान आहे. कॉटन ची आहे पण क्रिस्प पदर. नाशीकच्या वाड्यातला झोपाळा अल्टिमेट आहे. तिथे बसून पोहे खायचे काय लव्हली.

एपिसोड ३७ मध्ये शुभांगीची साडी छान आहे . कसला तरी डार्क कलर आहे व जरी बॉर्डर. पण मुलगा हॉस्पिटल मध्ये पडलेला आहे. आहे तशी आलेली आहे बहुतेक. ब्लाउज प्लेन क्रीम कलरची सर्व व जी साडी त्याचे काठ बिलोज ला लावले आहेत. गुड थिंकिन्ग. पण फुल ब्लाउज काही झेपत नाही. ती काही तितकी वयस्कर नाही.

३८ भागात चिंतामणीचे मनोगत फार सुरेख व्यक्त झाले आहे. एकट्याने झग डणार्‍या व्यक्तीचे मनोगत.

भाग ४० - ४४

विनय आपटेंचा एक सीन आहे कोणत्यातरी भागात त्यात नवरा बायको दोघे झोपले आहेत. तर रात्री तीन ला फोन येतो.
विआ उठल्यावर ती ज्वेलरी नाही दिसत. जरा बरे वाटले. झोपताना खडे टोचतील ना . म्हणून काढली असेल. पण ते हिरव्या रंगाची काठाची साडी लुंगी म्हणून तशीच. त्या साड्या असल्याने फार बोंगा होतो. खरी लुंगी इतकी लांब नसते. ते ही भयंकर डार्क. हिरवा कलर.
बायको घाबरून उठते. पण तशीच झकपक साडी. अगदी पिन अप केलेली!!! साडी छानच आहे बाकी आमसुली रंगाची. तेच कपडे नेक्स्ट डे सीन मध्ये. विआ हपिसात जातो व उखडून एका एंप्लॉईला सॅक करतो इलॉन मस्क फॅशन.

विक्रम गोखले काय सुधरत नाही असे च अ‍ॅक्टिन्ग करतात. म्हाद्या काका व त्याचा मित्र बेस्ट. सिंचां आपला तेच कपडे घालून इकडे तिकडे भटकत आहे.व नवी डॉ. मैत्रीण गाठलेली आहे. हिचे कपडे साधे व छान आहेत. प्लेन कुर्ता खाली प्लेन सलवार व तसलीच ओढणी.

काय कोण जाणे सर्व स्टार कास्ट बघुन एकदम घरगुती वाट्ते. वॉर्म इनसाइड. लाइक मीटिन्ग ओल्ड रिलेटिव्ह्ज. विनय आपटे फार जुना क्रश. दूरदर्शन वर गजरा किंव असेच काही एक बारके स्किट होते त्यात एक फारच प्रेमात असलेले जोडपे दाख्वतात त्यांचा मित्र विनय आपटे. तर ह्यात ला मुलगा सिगरेट आणायला बाहेर जातो व मुलगी लगेच फार विरहिणी झाल्याचे भाव आणते. तर विनय आपटे वैतागून म्हणतो. चार मिनार सिगरेट आणायला तो काही हैद्राबादला नाही गेलेला. येइल दहा मिनिटात. तेव्हाच तो मनात घुसुन बसला आहे. नीलचे बाबा सई मँडीचे बाबा सर्व एकदम क्युट मराठी फोक्स वाटतात.म्हाद्या तर ग्रेटच. मी लगेचच तिथे भाडेकरू राहायला तयार आहे. गटवलाच असता त्याला मी तर मोदक खायला घालून.

भाग ५४ परेन्त लोड झालेले आहेत. पण कथानक फारसे पुढे सरकत नाही आहे. सर्वांचे उगीचच भयानक क्लोज अप्स आहेत.
अर्धावेळ लहान मुलांचे गैर समज फोन करणे भेटणे सॉरी म्हणणे तरुणींनी फुगुन बसणे. रुसवा काढणे. नील व अभीदाद्दा( इतका सॉलिड आहे ना म्हणजे एकदम भारी आहे!!) हे वयाने वाढले तरी थोडे माठोत्तम आहेत. दोघांचे वडील थकत चालले आहेत. नीलचे वडील बिचारे मला रिटायर होउन जरा आराम करायचा आहे बायकोबरोबर फिरायचे आहेत वगिअरे व्यक्त होतो तर ह्याला ते समजत देखील नाही. मला हे आधी सॉर्ट करु दे मग मलाच तुमचा बिझनेस सांभाळायचा आहे म्हणे.

इकडे अभी ला आपल्या कर्तुत्वाने वडिलांसमोरचे प्रश्न इतके चिघळत गेले आहेत नुकसान झाले आहे जाणीव पण नाही. कायम एक पोट बिघ्डलेले एक्स्प्रेशन असते. व चार काळे - इथे फॅशन स्ट्रीट वाले - टीशर्ट आहेत. - मोठे मोठे चेहरे असलेले तेच घालतो.
आजची पोस्ट कोव्हिड पिढी खूपच जागरूक व आईव्डिलांशी संवाद राखून आहे. जरा तरी सेन्सिटिव्ह आहे. कायम हाणामारीला उत्सुक. तो राजकार्णी पण बोअर आहे. पाल्टिक्स मध्ये ..... करत सुरू होतो.

बरे इतक्या काँप्लिकेटेड केस मध्ये डिटेक्टिव्ह कोन तर मंदिरा - काही प्रोफेशनल सेट अप हवा ना हे सर्व धागे जोडायला.
सदानं द राव पण पोरीवरच मदार ठेवून आहे. व्हेरी फनी. व पाच लाख स्वतंच्याच नावावर घेतु हपिसातून.

हे सर्व जोडपी म्हणजे पहिली पिढी गरिब पण सुशिक्षित घरातून थोडा ब्राम्हणी वारसा असलेली व स्वतःच्या मेहनतीवार नवश्रीमंत झालेली आहेत. घरे ही तशीच आहेत. जरुरीपेक्षा जास्त शो पीसेस सर्वत्र जागा नुसती भरून काढलेली आहे. डोळे भरुन गेले पाहिजेत. नील कायमच एक वेस्ट बेल्ट व एक बॅग आडवी घालून निघतो पण त्या दोन्ही वस्तु रिकाम्याच दिसतात. त्या बॅगेत फक्त एक मदर बोर्ड घेउन असतो मुंबईचा मुलगा नाशकात कोणत्यातरी फॅक्ट्रीत बोलणी करायला जातो. तो भाग फार विनोदी आहे.

देवाच्या वाडीस संजना पाठीवर हात ठेवण्या परेन्त प्रगती आहे. व इकडे सई बरोबर रात्री घरी पिझा खाउन बसण्या इतकी प्रगती आहे. सईचे पिझा खातानाचे क्लोज प्स लैच भयानक. ह्या भागात तिने कपडे पण काळाच्या मानाने डेंजरस घातले आहेत.
व डोळ्यात अगदी राहिलास तरी चालेल भाव आहेत. पण काही होत नाही बहुतेक सईचे वडील क्यापटन साहेब पण कंबरेला काही एक लेदर पाउच लावुन हिंडतात. मुली त्यांना बस मध्ये खायला पराठे देतात ते पण कॅसरोल मधुन. !! सर्व पात्रे ज्वेलरी घालतत मध्ये मोठी पेंडंट वाली. म्हाद्या फोन करायला फुल ड्रेस व टोपी पण घालुन जातो ते फार गोड. आता हे सर्व पुढे कधी जाईल? मोरोबा मध्येच एकदा लाल पितांबर नेसुन पूजा करत असतात भुयारातुन येउन. त्या सीन मध्ये नीलचे कपडे पण सुहागरात स्पेशल लाल बनियन व लालच ट्रॅक प्यांट. जागो जागी जास्वंदीची फुले!!

भाग ५७ परेन्त काहीही होत नाही. सध्या शायनिन्ग चालू आहे. साई बिहेविन्ग लाइक कुमुदिनी रांगणेकर हिरवीण. हिरोवर प्रेम करायचे पण पॅसिव अ‍ॅग्रेसिव्ह बोलायचे. काळजी वाट्ते म्हणायचे पण तू चांगला मित्र आहेस ना म्हणूण. मग त्याने ते मानले की फुतफुतायचे वतवतायचे. मनोरंजक आहे. साईचा ड्रेस म्याजेंटा वर सोनेरी डिझाइन. एकदम आव्हानात्मक गाडीवर बसते व संजू आली की लगेच चिडकट . हा पण वैताग वागतो. तिची चुकीची ओळख करुन देतो.

तर शेवटच्या सीन मध्ये वैदेही त्याला समजावायचा प्रयत्न करते बायकी गोंधळ काय झाला आहे तो त्या सीन मध्ये तिचा एकतर नाकातला शेंबुड दिसेल इतका क्लोज अप काय कामाचा!! मग तिचा एक कान इतका मोठा दिसतो की मी तोच बघत बसले. ही साधी दिग्दर्शनाची चूक आहे. जर कान मोठा दिसत आहे तर तिचे केस मोकळे सोडून तो झाकून टाकता आला असता. पण दिग्दर्शकाची ऑनलाइन डिग्री असावी. बॉडी शेमिन्ग नाही हं दिग्दर्शनातील चूक दाखवली आहे.

भाग ५८ व ५९ पण आलेला आहे.

५८ मध्ये साई कंटिनू विथ पॅ अ‍ॅ बिहेविअर. घरी येउन अंधारात रडत बसते व पाच वर्शाच्या मुली सारखे हलो बाब्बा करुन रडारड. ही अ‍ॅडल्ट आहे पण प्रेमात पडली नाही म्हणते. स्वतःचे प्रश्न स्वतः का नाही सोडवत?! क्यापटन लगेच आर्मी क्ष्क्ष्क्ष्क्ष्क्ष
मारतो. मला घेउन जा. आईए ब्बाब्बाअ भोकाड राणी. .... हिचा ब्रेक अप झाला तर ही काय करेल!!!

ह्या भाग ५७ मध्ये नीलचे कप्डे नक्की बघा. म्हणजे इथे पण थोडा छुपा अमेरिकन काँप्लेक्क्ष दिसतो. आत हाफ स्लीवचा टीशर्ट
मग वरुन एक ओवर साइज शर्ट फुल स्लीवचा रेषा रेषा वाला. व खाली व्हाइट ओव्हर साइज - एक साइज मोठी तीच खिसे वाली
पँट. व वरुन काळे जाळीदार जाकीट. बघुनच घामाघूम होते. रात्रीचा सीन म्हणून व्हाइट रेम्ज मधले कपडे आहेत. व ती माळ कायम घरात.

बहुतेक मुब च्या एंट्रीचे सूतोवाच झालेले आहे.

६१ लोड झालेला बघितला. आत्ता साठ लावला आहे. आज मोठ्या कानवालीचे कान झाकले आहेत. साइड प्रोफाइल मधे तिचे नाक छान सरळ दिसते. घर व गणपतीचे रहस्य एकदम बाजूला पडले आहे. सई इज प्लेइन्ग पॅसिव अ‍ॅग्रेसिव्ह विथ एम्लॉइ आल्सो. अजून नाकावरचा राग गेलेला नाही. नील फोन करत आहे तर त्याला कट करत आहे. ह्या प्रेमाच्या अग्निहोत्रात कथेची आहुती गेलेली आहे. प्रेमाची रागात लाडाची बोलणी चालू आहेत. ही एकदम पापानी परीच आहे. फालतु बडबड करायला वेळ नाही म्हणे. पुणेरी प्रेमप्रकरण. डॅफोडिल्स काय जागा आहे तिथे भेटायचे ठरते म्हणे. नील साहेबांना मापाचे शर्ट मिळत नाहीत का? कि अमेरिकन इस्टाइल. व्हाइट टीशर्ट व वरून तो ओव्हर साइज्ड शर्ट. आता बाबांच्या नगर प्रकरणाचा प्लग. आता म्हादेव लीना शायनिन्ग चालू आहे. लैच प्रेमळ आहेत ते अग्निहोत्री बापे. फोन नंबरची देवाण घेवाण होत आहे. वैदेही वडील बिझनेस चालवताना लाच देतात वगैरे म्हणून फुगून बसली आहे. घरबसल्या आदर्श कुरवाळत बसली आहे. मग चार दिवस रिसेप्शन का नाही संभाळत. इकडे अभीचे नवीन राड्याचे प्लान चालू आहेत ते बहिण वरून गच्चीतून ऐकत आहे. क्या शॉट क्या शॉट. ऑनलाइन डिग्री रंग लाई है दिग्दर्शकाची. सई परत पॅसिव्ह अ‍ॅग्रेसिव्ह. हिच्याशी लग्न म्हणजे जन्मभर ओढा ताण आहे. ऐन वेळी फुगून बसायची.


आता नील साई डेट चालू आहे. फुगलेली मैत्रीण. हे कोणाला रोमँटिक वाटत असेल. रवा मसाला दोसा व कॉफी असे खाणे हिचा पुणेरी अ‍ॅक्सेंट फार परफेक्ट जमला आहे. ही डेट साठी घरुन कपडे बदलून आलेली आहे शॉवर घेउन. कारण हपिसात चप्प केस
असतात. व ड्रेस पण घातला आहे चमकिला. कन्फुजिन्ग सिग्नल देत आहे. नील ला हे प्रेम प्रकरण आहे का साधी मैत्री असा
गोंड्स प्रश्न पडलेला आहे. पण उत्तर सापडलेले नाही. ह्यात अर्धा एपिसोड गेलेला आहे. अंधारातल्या सीन मध्ये पण कान मोठा दिसत आहे. वैदेहीला तिच्या आदर्शवादी प्रश्नाचे ग्रे उत्तर मिळणार आहे. वैदेही आजकालच्या काळातील वॉट्सॅप अंकलची फीमेल आवृत्ती आहे. आज दुसृया साइडचा कान दाखवला आहे. आता ही बाणेदार पणे घर सोडून स्वतंच्या जीवनाची जबाबदारी घेइल का? हा सीन छान रंगवला आहे सिनीअर अ‍ॅक्टरने. एकदम वाल्या कोळ्या मोमेंट. आता पाच मिनिटे मंदिरा सई पोस्ट मॉर्टेम. संजना डॉक्टर आहे तिला ही अडाणी खेडवळ म्हणते. दहा एपिसोड झाले तरी गावाला कधी भेटायचे ते ठरत नाही. डायरेक्टर पाण्याचा टँकर घेउनच बसला आहे.

भाग ६२ व ६३ आले आहेत.

इधर तो पूरा रातकाइच आलम दिकरा.

६२ मध्ये दोन बहिणींची अंधारात पिलो फाइट. पॅसिव अ‍ॅग्रेसिव मुलगी स्वतःलाच जस्टिफाय करत आहेत.

वैदेहीचे बोलणे वडिलांना फार लागले आहे. व नवरा बायको बोलुन दाखवत आहेत. हे पण रात्रीचाच सीन. आता नील साहेब पण जॉइन झालेला आहे. नील कामात येत नाही तर हे लोक्स धंदा विकून का नाही टाकत. हा जॉइन न व्हायला रोज नवी कारणे देतो.
आधी म्हणतो नियतीने वेगळा मार्ग दाखवला आहे. मग म्हणातो हे जमिनीचे प्रकरण निस्तरू. ते मदरबोर्ड घेउन विकायचे ते आहेच.
प्लस दोन लफडी चालू आहेत. आता म्हणतो मला माझ्या चुका करु द्या. इतकी खादाडी करुनपण ह्याला भूक लागलेली आहे. दोघे आईबाप सुखावले आहेत मुले छान बोललेली आहेत.

इकडे विनय आपटे डिरेक्ट गुजरात मधे इथल्या पेक्षा चांगले सरकार आहे. तिथे स्वस्त जमीन मिळाली तर घेउ या. लोड शेडिन्ग ची इथल्यासारखी लफडी पण नाहीत. हे एकदम आजसुद्धा रेलेवंट आहे एकदम. अरे वा. उगीच फॉक्स कॉन गेला ह्याव अन त्या वरून ओरडा कशाला. हा फार जाडा दिसत आहे. रोहिणी वैतागली आहे कारन घरी फार नोकर आहेत हाताला बुरशी लागली आहे म्हणे. रोहिणीचा मेनोपॉज चालू आहे बहुतेक उगीचच जाम उखडत आहे. नवरा बायको कधी दोन शब्द प्रेमाचे नाही बोलत का बरे.

इक्डे बीन साखरेचा चहा व इडल्या असा बेत चालू आहे. वहिनी - नणंद सुखसंवाद चालू आहे. ह्या पिढीतल्या बायका किती घरबसून प्रिव्हिलेज्ड होत्या. हाताशी स्वयंपाकीण तरी थोडे काम केले तरी वैतागतात. सो क्युट. रोहिणीकडे जुना कॉर्डलेस फोन आहे.

आता लगेच एक दम परवाच नाशीकला जायचे ह्या लाडुबाई नणंदने ठरवून टाकले आहे तिकडे म्हाद्या लीना अडचणीत ना.

भाग ६३ झाला आहे अपलोड.

लुंगी/ साडी वरुन खाली येते - जिन्यावरून - इकडे मोठ्या चित्राचा टीशर्ट फोनशी खेळत बसला आहे. हे सर्व जागच्याजागी असलेले लोक एकदम एकमेकांना टाकून का बरे बोलतात. टीशर्ट नव्या राड्याच्या विचारात आहे. रागावलेला आहे म्हणे. रागाला आवर घालायला शिका म्हणतो बाप. लुंगी एकदम विश्वासत घेउन प्लॅन काय विचारत आहे. टीशर्ट खूपच हुषार असल्याने बुद्धी वाकड्या मार्गाने वापरत आहे. ह्याला थोडी इंजेक्षने देउन माज आटोक्यात आणला पाहिजे. भडकू मास्टर.

इकडे पतंगाच्या दुकानातून म्हाद्या वहिनीला फोन करत आहे. वहिनीशी भांडण असल्याने तो अवघडला आहे. निळू भाउ फोन वर आलेले आहेत ही अशी ट्रांझिशन मधील पिढी आहे की मोबाईल नंबर वहीत लिहून घेतात. सो क्युट. परवाच पाव्हणे येणार म्हणून म्हाद्या बिथरला आहे. आज निळू भाउंनी लाल टीशर्ट व काळी प्यांट घातली आहे. तयारी म्हणून निळू भाउ लगेच तडक नाशीकला निघाले. हा काय डाळ तांदूळ भाजी आणून देणार काय नाशकात. पेट्रोलला पैसे बरे येतात. काय निरुद्योगी कार्टे आहे.

इकडे तारकरची बायको रोहिणी कडे कामास्नी आलेली आहे. इथे ऑलरेडी एक स्वयंपाकी आहे.इकडे वैदेही आईचा एक लाडीक सीन आहे. हिने झबले घातले आहे.

इकडे टीशर्टचा अर्धा कच्चा प्लान इन अ‍ॅक्षन अगेन्स्ट तात्या. जुनी मारुती १००० गाडी आहे. ह्याने टीशर्ट च्या आतून काळा लांब बाह्यांचा टीशर्ट घातला आहे. ही ड्रायवर चा इंटरव्यु घेणारी मुलगी विचित्र नाकेली आहे. फारच विचित्र प्लान आहे. ही असली पीडा बघणे लायक आहे काय . दिग्दर्शकाने जरा अंतरमुख होउन विचार करावा. ऑनलाइन डिग्री पब्लिश करावी. मुक्ता आर्टची तर नव्हे व्हिसलिन्ग वूड्सा वाली!!!

हे सर्व बघून गुंड मुलगा विचित्र पद्धतीने हसत आहे. डबल ग्रॅजुएट झाला आहे तर निदान कुठेतरी नोकरी धरू शकतो. बापाचा बिझनेस म्हणजे शोषण वाटते तर.

इकडे संजू व नील चा फायनली प्रत्यक्ष काँतॅक्ट झाला. विगो ला टेंपररी मेमरी लॉस आहे असे निदान झाले आहे. जे आपल्याला आधीच कळले आहे. पार्वतीच्या नंदना गजाननारे गजानना.... गजवदना.

म्हाद्या कायम एकासुरात कोकलतो.

एक काल्पनिक भागः

==============================================================

टिंग टाँग बेल वाजते.

ग्राहक घरबसल्या फोन वर टीपी करत अस्तो. दार उघडतो. तर अभी.

अभी: स्विगी कडनं आलोय ही घ्या डिलिव्हरी.
ग्रा: मी काही मागवलेलं नाही.
अभी: घ्या म्हणतो ना आणि कॅश ऑन डिलिव्हरी आहे. पाचशे रुपये द्या की मी सुटतो. नवा मोठ्या चित्राचा टीशर्ट घ्यायचा आहे.
ग्रा: पण अहो हे पार्सल माझे नाही. बघा माज्या फोन वर स्विगी अ‍ॅप पण नाही.
अभी: इतका फॅन्सी फोन बघितला नाही त्यामुळे लगेच बिथरतो. व पार्सल आत फेकतो. त्यातून तंदुरी चिकन बाहेर पडते व ग्राहकाच्या घरात डाग पडतात कार्पेट वर.

ग्राहकः अहो मी व्हेजिटेरिअन आहे. बायको ने बघितल तर ती फार अपसेट होईल.

अभी: बाह्या सरसावुनः होउ देना आपण राडा करायला भीत नाही. पैसे टाक बर्‍या बोलानं

इतक्यात लिफ्ट मधून नील येतो:

नीलः हे घ्या तुम्ही मागवलेली औषधे.

ग्रा: अहो मी लेट्रोझोल मागवलेले हे काय आहे आयुर्वेदिक मनोरमा?!

नीलः मी स्वतः नाशीक होउन घेउन आलेलो आहे. घ्या पटापट मला साई बाबाच्या दर्शनाला जायचे आहे.

ग्रा: अहो मला नाही चालत आयुर्वेदिक हे मी मागवले ले नाही. तुम्ही ए विन्ग का बी विन्ग ते चेक करा.

अभी : पैसे टाक पहिले नाहीतर दार तोडीन.

नीलः अगं साई अगं संजू मी आलोच तुम्ही उखडू - रडु नका.

ग्रा: मी कस्टमर सर्विस ला फोन लावतो. उगीच पाचशेला खड्डा!!

क.स.( साई) : हं बोला काय आहे? ( त्रासिक सुरात) जास्त बोलायचं नाही ह मला लगेच राग येतो

ग्रा: अहो बाई आपलं ताई , हे दोन तुमचे डिलिव्हरीवाले नको ती डिलिव्हरी करून वर राडा करायची धमकी देतायत
पैसे मागतायत काय आहे हे मोगलाई?

अभी: तंदुरी

ग्रा: चक्कर येउ लागली आहे.

क.स.: ते तुमचे तुम्हीच बघा. मला केसाला तेल लावायचे आहे. ब्बाब्बा.... बाटली फुटली.

अभी: पैसे टाक नील : घ्या हे मेमरी लॉस वर नक्की उपाय....

ग्राहक तेव्ढ्यात चतुराईने मधले दार लावुन घेतो.

अभी नील दार वाजवत आहेत. तर मेंढी येते : ह्या प्रकरणाचा तपास लावला पाहिजे काका मला तर घातपाताचा संशय येतो. मँ.

ग्राहक वैतागून अभीच्या अंगावर पाचशे रुपये फेकतो. आता तरी ही ब्याद जाईल.
तर लिफ्ट मधून वै दही येते व गाल फुगवून म्हणते : क्काक्का तुम्ही ल्ल्लाच दिलीत. आमी नाइ जा.

अभी ग्राहकाची पाठ तोडायच्या तयारीत दार तोडायला लागला आहे. नील जाळीदार जाकेट चावत परत नाशीकला जायचे
प्लान करत आहे. इतक्यात लिफ्ट मधून एक लुंगी कुलुंगी कुत्रे घेउन येते. कुत्रे भुंकू लागते. तंदुरीच्या वासाने कसे तरी होउन घ्राहक कोसळतो. अभीच्या चेहर्‍यावर एक समाधानी तिरकस हसू येते. आता नवा राडा घातला पाहिजे. म्हणून तो मेंढीला घेउन लोणाव ळ्याला जायला निघतो.

कस्टमर सर्विस फुगुन बसली आहे. तिला सावरायला नील नाशीक हून साडी आणायला जातो. नियती साडी शॉप मधून.

=====================================
काल्पनिक भाग आहे. ६३/५

भाग ६४

निळू भाउ परत नाशीकला . आज जाकीट नाही. कपडे साधेच आहेत. पैसे नाहीत एटिएम मध्ये जावे लागेल म्हणे. ते कोण भरते. बाबाच ना. मग सिडने शेल्डन चे पुस्तक घेतु वाचायला. हा बाईक चालवताना वाचतो काय. संजूचा फोन येउन ही लगेच घरी बोलवते. काय हे. मग कुठे तरी भेट तात. आता वैताग ग्यांग मिशन अकंप्लिश्ड मोड मध्ये आहे. अभी ह्याचे एक्स्प्लनेशन देतो ते जरूर ऐका. सारे शिक्षण कसे वाया गेले आहे ते कळेल. ह्याच सीनचे आता तात्या व फोन मिटतो त्या घटनेचे इंटर प्रिटेशन करतात. व्हेरी राशोमान स्टाइल. दिग्दर्श क महान आहे. साई परत पॅ अ‍ॅ. मोड मध्ये आहे. मधनंच पीरीअड च्या कळा आल्यावाणी चेहरा करुन हाफ डे रजा मारून जाते. मेंढी अभीला फोन करते पण तो उद्धट उत्तरे देउन बंद करतो. ह्याच्याशी रिलेशनशिप अशक्यच आहे. नील संजू भेटतात ह्याला नाशीकला जायचे फारच गडबडीत आहे. पण सई त्यांना बघते ती आटोतून उतरून बघते. आता त्यावरुन नवे गैरसमज घेउन जाते. मग संजू काय बोलायचे ते सांगते. इतके काय आहे त्या नाशीकला?! संजू मोरुकाकाला पळवून न्यायचा प्लान ठरवते. कारण विगो ला मेमरी लॉ स झाल्याने त्याला जुन्या जागी न्यायचे ठरते. डिरेक्ट किडनॅपिन्ग प्लान. हे तरुण लोक काहीच परिणामांचा विचार करुन वागत नाहीत. हा सारखा नाशीक नाशीक करत असल्याने ती चिडते व जा जा करून निघून जाते. इन्हे भी गुस्से वालीच लगरी. आजकाल मुले थोडी वाट बघतात अगदी मेसेज केला तरी. पूर्ण एपिसोड हे भेटणे न भे टणे नाशीक अंधेरी करण्यात गेला. दिग्दर्शक रिअली ग्रेट आहे. इकडे म्हाद्या लीना शायनिन्ग चालू आहे.

भाग ६५: म्हाद्या लीना शायनिन्ग चालू आहे. म्हाद्या इन पॅनिक मोड फरफरायला लागलोय म्हणे. लैच गोड. लीना त्याला घाबरते म्हणे. लैच किंचाळून बोलतो आहे. लीना स्पीकिन्ग व्हेरी स्वीटली. आता लगेच तारकरांच्या घरातली रागे बोलणी चालू आहेत. हा पोरगा पण चिडला आहे. ते तसे घर. त्या घरात मी राहिलेली आहे. ही बाई एकदम सिंगल पेरेंट विडो मोड. तर नगरशेवक व तात्या येतात हा भाग मी फॉरवर्ड केला. बघवेना. गजानना रे गजानना. इकडे महादेव काका बाळ संजूला शिकवत आहेत. हे उच्चार अपर क्रस्ट प्रेक्षकांना मस्त वाटत असणार. हाउ सनातन.
नील ची एंट्री झालेली आहे मुंबईहून. लीनाकडे जेवायचे आहे. ही पण खटपणा करत आहे. मजा म्हणून. म्हाद्या भुकेजून अधिकच कावत आहे. अजून गणपती-भुयार-रहस्य काही ही पत्ता नाही. इकडे मेंढी- साई पण रात्रीचा संवाद पोस्ट मॉर्टेम चालू आहे ती अभीवर वैतागली आहे व साई नीळ वर. खरंच सर्व रात्री चेच शॉट आहेत ह्या भागात. अंधारातच. इकडे इला भाटे व नवरा संवाद चालू आहे. हा म्हातारा नेट सर्फिन्ग करत आहे. तिची पाठ वळल्यावर पोर्नहबाय गच्छंति बाबा. वाट्टेल ते संवाद आहे. बाबा बिलगेट्स चाच एकदम संदर्भ देत आहे. ह्याच्या डोक्यात स्वतः बद्दल काय गैरसमज आहेत!! अआँ पोरगा नाशीकला गेला आहे हे बाबा ओळखतो. गावी जायचे आहे त्यामुळे बाबा भंजाळला आहे. इभा स्टँडर्ड मोड इज ऑन. अकरा वाजले हा बायकोला किचन मध्ये पिटाळतो.

इकडे सदा फॅमिली पण नाशिकला जायच्या मोड मध्ये आहे. अभी आपले कर्तुत्व रंगून सांगतो. हे पुढील भागात.
बरोबर अप्पांचा एक फ्लॅश बॅक. सगळ्याच जखमा दिसत नाहीत म्हणे. हो ना प्रेक्षकां च्या डोक्यावर परि णाम होतो आहे हे कुठे कोणाला कळतंय. गजानना रे गजानना.

भाग ६६:

आजचे पण मेजॉरिटी सीन्स रात्रीचेच आहेत. असे का बरे. चालतंय पण एक आपले निरीक्षण. अंधार अंधार.

सदानंद राव फॅमिली एकत्र जेवत व हास्य विनोद करत आहेत. स्वीट सीन. बरे वाटते बघायला. परवा नाशीकला जायचे पक्के झाले.
इक्डे पण गोड सीन लीना संजु निल म्हादेव काका गप्पा जेवण मस्त झाले. संजू बाल शंका विचारत आहे. म्हादेव गोड शब्दात समजावून सांगत आहेत. भिक्षुकीतले बारकावे समजावून सांगत आहेत. जुन्या पद्धती समजावत आहे. लीना पाटावर बसलेली आहे.
संजू आराम खुर्चीत व नील आणि काका झोपाळ्यावर बसून शिळोप्याच्या गप्पा मारत आहेत. गोड सीन. अभी व सदानंदराव सीनः अभी काहीतरी कारणा वरुन सडला आहे. सिगरेट ओढतो. ह्याच्या टीशर्ट वर जे चित्र आहे ते त्याच्यासारखेच दिसत आहे हा अंमळ विनोद. सदानंदला तात्याचे अपडेट देत आहे. पोरगं बनेल होत चाललं आहे.तात्या व फोन मिटतो सीन मी फॉर वर्ड केला आहे. नीळ बापाला स्वप्न पडले व स्वप्नात वडील आलेले आहेत. त्याने तो सटपटला आहे. मणी व बापाचा सीन एकदम टडोपा आहे. मुलाच्या हाताचे ग्रीज चे डा ग वडिलांच्या उपरण्यावर पडले जरूर बघा. पुढील भागात आई डबा पाठवते उषाच्या हाती पण मणी नाकारतो. आईचा शॉट आहे. मणीला आईची खूप आठवन येते. खूप लोकांना पदर डोळ्याला मोमेंट.

भाग ६७:

स्पॉयलर अलर्टः

आता आपण ६६ भागांची ग्रहमालिका सोडून अनंत अवकाशात भरारी मारत आहोत. ज्यांनी आधी बघितलेली नाही त्यांच्या साठी इथून अन चार्टेड टेरिटरी आहे. हे नवेभाग आहेत आपल्यासाठी. तर स्पॉयलर नको असेल तर पुढे वाचू नये.
=============================================================================

उषा नाही रोहिणी डबा घेउन आलेली आहे. धाकटी बहीण. आईने प्रेमाने पाठवला आहे. इथे मणीचे फाके पडत आहेत
दोन ग्लास गार पाणी पितो. ही रोहिणी बरोब्बर कास्ट केलेली आहे. मोठेपणीच्या शुभांगीसारखीच दिसते. मणीचा स्वाभिमान वर आला आहे पोट भरल्यावर. बिचार्‍याचे स्ट्रगल्स बरोबर आहेत. बाल रोहिणीचे कपडे परकर पोलके दोन वेण्या परफेक्ट दिसत आहेत. खणाचे जोड ब्लाउजला दिले आहेत. मणी साहेब जुन्या आठवणीत रमले आहेत आईची फार आठवण येते आहे. हे अगदीच युनिवर्सल आहे. व प्रेम भीक मागूनही मिळत नाही. एकदम ग्रेट रायटिन्ग. आमच्या जनरेशनला त्यातले सत्य कळलेले असते त्यामुळे खूप रेझोनेट होईल.

मणी आठव ण काढत आहे. व म्हाद्या एकदा पेढेघाटी डब्बा त्यात आईने लाडू बनवलेले आहेत बहुतेक ते पाठवले आहेत. आई ने
एकदम हृद्य पत्र लिहिले आहे. आई त्याच्या जेवणाची तब्येतीची काळजी करत आहे. नाही म्हटले तरी फर्स्ट बॉर्न सन. दॅट टू.
त्या काळातील आई करु शकते तेच केले आहे. हे वाचेस्तो आपण रडतो आहे ढसा ढसा आणी म्हाद्या लाडू खात बसला आहे.
पहिल्या पासून वाभरट. आईचे स्वगत व मागे उत्तम हळवी बासरी लावलेली आहे साथीला मृदुंग. फ्लॅश बॅक संपल्यावर इला भाटे चिकट गूळ बडबड चालू आहे. मग वयस्कर कपल उठून फिरायलाच जातात.

इकडे आठवणी काढल्याने म्हादेव उचक्या लागून उठला आहे. हा पण रात्रीचाच शॉट आहे. बिचार्‍या कलाकारांनी दिवसाचे उपद्व्याप संपवून सेकंड शिफ्ट केलेली दिसते. मराठी कलाकारांची परिस्थिती. हे ही उठून फिरायलाच जातात नील व म्हाद्या.
नीलच्या हेअरकटचे पैसे द्यायला हवे प्रोडुसरने. निदान दाढी कटिन्ग तरी व्यवस्थित हवे.

भाग ६८:

स्पॉयलर अलर्टः
====================================================================
काहीच घडत नाही. नाशीकला जाणे ह्यावर रक्त आटवणे चालू आहे फक्त. पण भगिनिंनो ११.४० ला रोहिणीची मुलगी ज्या आकांताने चार पाच आई आई हाका मारते ते नक्की बघा. कानाचे पडदे फाट्तील. धिस गर्ल इज सो अनॉइन्ग. खरेतर फोन मिटतो च्या घरी धाकटी सून म्हणूनच शोभेल. नवश्रीमंतांची पापानी परी. ड्रेस पण एकदम लग्नी घातला आहे तो ही प्रवासात. हिला कधी बाहेर
फिरवत नाहीत बहुतेक. फारच एक्साइटेड आहे. हिला मोठे कान चा फोन येतो. पण आता केसात कान लपवलेले आहेत.
सुरुवातीला वैदेही ने फॅशन म्हणून गुलाबी लांब बाह्यांचा टॉप व वरुन चिक्कू कलरचे स्लीवलेस बंडी घातली आहे. स्लिपच खरेतर. खाली काहीतरी कलम कारी टाइप स्कर्ट. तर आई तिला सोबर ड्रेस घालायला लावते. पापानी परी निघायच्या आदी तड तड फुलबाजी होत आहे. आईने वैदेहीचा फोन घेतला तर इतके काय फुगायचे. कार मध्ये बसल्यावर फोन करता येतोच की. आता इकडे नीळ व महादेव संवाद चालू आहे. एकदम सत्यवान सावित्री कथा आख्यान चालू झाले. हे सर्व बहुतेक नाटकात काम करणा रे कलाकार आहेत. शिरा ताणून बोलत आहेत सर्व. महादेव एकदम वॉट्सॅप फॉरवर्ड बोलत आहे. सावित्री वडाच्या झाडाखाली बसते. वडाचे झाड २४ तास ऑक्सिजन देते. तो
ऑक्सिजन सत्यवानाला मिळाला हे निसर्गातले आयसी यु आहे. त्यामुळे सत्यवानाला प्राण वायु मिळाला व तो जगला. नीळ
फारच इंप्रेस झाला आहे. ह्याचे घड्याळ किती मोठे आहे. व फॅशनेबल. त्या काळातले. व बटने सोडलेला नवा शर्ट. काका वटसावित्री पूजा चे फंडे सांगत आहेत. बायकांची निमित्ते मोकळे व्हायला. आता ह्याचा कथेशी काय संबंध आहे? हे शोधायला लागेल.

भाग ७० ७१ परेन्त लोड झाले आहेत. आता कथानक वाड्यात शिफ्ट झाले आहे. वाड्यातले भाग एकदम फर्स्ट क्लास गोल्ड.
सर्व सिनीअर अ‍ॅक्टर एकदम सिंक मध्ये काम करत आहेत. लीना स्वयंपाक करत असते. संजूला नारळ खोवायला बसवले आहे. तर शुभांगी व इला येतात व मदतीला लागतात ते एकदम नैसर्गिक अ‍ॅक्टिन्ग. अगदी रात्रीस खेळ चाले माई फील्स. बाहेर दोघे भाउ कॅच अप करत आहेत व मुले कंटाळून बाहेर फिरायला गेलेली आहेत.

बहुतेक रहस्यास सुरुवात झालेली आहे. ते लिहीत नाही.

कास्ट बरोबर गप्पा पण पाहिल्या. रंगा कोन ते होते. व इला व स्पृहा जोशी. गप्पा छानच आहेत. सिरीअल समजून घ्यायला मदत होते. ह्या का आधीच्या भागात तुळशी वृंदावन व विहिरीचे शॉट्स आहेत ते दोन प्रॉप्स फेक आहेत ते आता आपल्याला कळते.
तेव्हा लोकांना खरे वाट्त असेल. फक्त गप्पांच्या भागात स्पृहा ची चक्क चप्पल तुटलेली आहे. ते ती घालायचा प्रयत्न करताना दिसते. स्पेअर ठेवत नसतील का हे प्रोड्युसर. तिचा शर्ट व पँट पण एक साइज मोठा आहेत. पण छान दिसते. इलाताईंची साडी सुरेखच आहे. आवडली मला.

भाग ७२ काहीच घडत नाही. बायका स्वयंपाक करतात. बाप्ये वडिलांना जास्तीचे पैसे कुठुन कसे मिळाले ते खल करतात. सदानंदराव काही जेवायला येत नाही. घरुन जेवुन निघेल म्हणे

भाग ७३ मध्ये पूर्ण रिकेप आहे. नव्या प्रेक्षकांनी इथूनच बघितले तरीही चालेल. नीळ एकदम कपाळाला कुंकु लावून आजचे हिंदू मुलगे असतात तसा दिसतो आहे व पूर्ण स्टोरी सर्वांना सांगतो. त्या आधी तात्या व फोन मिटतो वाल्यांचा एक सीन आहे. ते बहुतेक तारकरच्या मुलाला फितवाय च्या प्रयत्नात आहेत. हुषार माणसाने फ्लॅश बॅक काळा पांढर्‍या फिल्म मध्ये दाखवला आहे. १०० एकर जमीन म्हटल्यावर सर्व मुलांचे डोळे व डोके चकाकले आहेत. आता जमिनीची खलबते चालू आहेत. मोजो आधीच जमीन नको नको नको करत आहे. अरे भाउ एकदा गुणाकार
करुन बघ. आता श्रीमामांची माहिती देणे चालू आहे. व प्रभा व आईचे काही एक संवाद आहेत. आई खाली व प्रभा वर बसलेली आहे. ह्यातून घरातले लेडीज पावर डायनामिक्स कळून येते. नो जजमेंट.

त्या गप्पा नक्की बघा नवीन प्रेक्षकांनी. स्पृहा जोशी अगदी अगदी टिपिकल पणे सिद्ध्ह्या म्हणते व तो इथे असायल हवा होता. सिरीअल मुळे आमची चांगली मैत्री झाली ( ती चप्पल तुटलेली तशीच आहे.) जनरल चांदेकर बुवांचे कौतूक आहे. इतर माहि ती खूपच रंजक आहे.
भाग ७५ ते आता ८०- ८१ अपलोड झालेले आहेत. फारसे काही घडत नाही. सर्व लोक घरी जमलेले आहेत. बहुतेक रोहिणी व सदानंदच्या घरी गोप्या फोन मिटते प्राणी मिळून काही चोरी करायच्या नादात आहे. हे शूटीन्ग इतक्या अंधारात आहे की काहीही दिसत नाही. इकडे जुन्या आठवणी काढणे चालू आहे व श्रीपाद वाइट मार्गाला कसा लागतो ते दाखिवले आहे. म्हादेवचे एक वाक्य भयंकर आहे. कधी कधी वाट्ते हा आपल्या आईबापांचा मुलगाच नाही. - म्हणजे ब्राम्हणा चा मुलगा असा दुर्गुणी असूच शकत नाही. - हे काही पटत नाही. - घरात पैसे कमी असल्या चोर्‍या मार्‍या थापेबाजी कमी अधीक प्रमाणात होत असेलच.

भाग ऐंशीत श्रीपाद घरातले दागिने चोरतो व वडिलांच्या व सर्वांच्या लक्षात येते. पण वडील हताश झालेले आहेत श्रीपाद कांगावाच करत आहे. प्रभा अगदी लाडीक पणे जेवायला वाढू का विचारते. पण हा नाही म्हणतो. पण वडिलांना वाटते की तिच्या नवर्‍याचे शाप
आपल्या संसाराला लागले आहेत. कारण त्याच्या घरातून तिला उचलून आणली. दोन्ही बायका त्या नवृयालाच शिव्या शाप देतात.
गांडुळाने शेषाला शाप देण्या सारखे आहे. असे प्रभा दोनदा म्हणते. ही एडिटिन्ग ची चूक आहे. बाप एकदम खचला आहे. त्या माणसाचा संसार उध्वस्त केला तो परागंदा झाला . आपला संसार पण असाच उध्वस्त होत आहे. यस दूसरेकी बीवी नहीं उठानेका था. मोगलाई थोडी है.

आता म्हाद्या वचन देतो की मी इथेच राहीन व अग्निहोत्र कुळाचार चालू ठेवीन. एकदम ढांसू संगीत मारले आहे. आ आ कोरस. फ्लेश बॅक संपवून वर्तमानात आले आहेत. सिद्धार्थ त्याला ओके ओके उगी उगी करत आहे. म्हाद्या अजूनही श्रीपादच्या झाडावर लटकला आहे. कधी कधी एखाद्या व्यक्तीचा राग राग करणे हेच दुसृयाचे जीवनाचे कारण/ ध्येय बनून जाते ते हे असे.

सिद्धारथ एकदम काय काय मोठे वाक्य टाकतो व धडा धडा मागे डबे पडतात. कोण संगीत कार आहे बरे. खंग्री मॅन का?!

भाग ८१ : प्लॉट मेजरली पुढे जात आहे.

सिद्धार्थ चांदेकर काकाला दवणीय वाक्ये बोलुन जोजवत आहे. सूर्योदय होत आहे. रात्र संपली आहे. म्हाद्या निराश मोड मध्येच आहे. दीडशे वर्श जुना वाडा आहे. त्याचे काय होईल. ( तिथे टावर बांधा रे ३२ मजली. कैकू रोरे? पण ह्याला भिकेचे डोहाळे!!) इकडे घराच्या झडतीचे वॉरंट घेउन गोप्याच्या खिशातला इनिसपेक्टर आलेला आहे. काल रात्री काही तरी प्लांट केलेले आहे वाट्ते विज्याच्या खुनाबद्दल. हा एक सब प्लॉट चालू आहे.
इकडे संजू व आई ह्यांचा संवाद चालू आहे. हा ह्या सर्व लोकांना वैतागला आहे. ह्याला बिचार्‍याला हॉटेलचा पोर्‍या बनवून टाकले आहे. चा इल्ड लेबर!! इला भाटे व रोहिणी ह्याम्चा प्रेमाचा संवाद चालू आहे. रोहिणीचा उजवा डोळा लवत आहे. लगेच डोळ्याला सोने लाव म्हणते. रोहिणी बंगाली सिनेमातल्या जमीनदारिणी सारखी दिसत आहे. हे लोक्स झोपताना पण साडी व सालंकृतच झोपतात का.

आता पोरांचा पोहे खातानाचा प्लग. त्यांना पोहे मस्त वाटत आहेत. नाशीकचे. फ्रेश हवेतले. सिद्धारथ आपली बाजू समजावून सांगतो. इथे सेफ वाटते म्हणे. आता अभी पण येणार परत परत. दोन्ही मोठे कान दिसत आहेत पोहे खाणार्‍या वैचे. सि. ने कंडक्टर सारखा ड्रेस घातला आहे. पण आतला सफेद टीशर्ट तसाच आहे. अभी मुळात ग्रे शेड्स आहेत हे दाखवायला फुल्ल स्लीव ब्लॅक टीशर्ट व वरुन यलो मोठे चित्र!! हे शर्ट. मुलींना पोहे पाणी आणायला पाठवतात. त्याही जीवनात कधी असली कामे केलेली नाहीतच तसाच आव आणून उठतात. इकडे इला भाटे नवर्‍याला आरतीला यायचा आग्रह करत आहे. पण एक बॅड न्युज कळते. इसका तो धंदा बंदही करना चाहिए. बसला आग लागली. चार लोक्स जळून मेली. हा अग्निहोत्र नीट न जोपासण्याचाच परीणाम आहे.व लगेच पोलिस येउन सद्याला पकडून नेत आहेत. खंग्री मॅन फॉर्मात येउन डब्बे बडवत आहे. ह्याला आता खुनाबद्दल अटक होत आहे. कलम ३०२!!! ( आमचा एक मित्र आहे सदानंद त्याला सद्याच म्हणतो.) सर्व लोकांचे मोठे मोठे कुंकुम तिलक लावलेले क्लोज अप आहेत. विनय आपटे तर मोठे चित्रच काढले आहे कपाळावर त्यात आठ्या. अभी पण ओरिजिनल मोड मध्ये पोट बिघडलेले एक्स्प्रेशन घेउन उभा आहे . नवे वर्श नवा राडा.

हे पब्लिक मुंबईला निघाले पण खालील बडबड कार मध्ये चालू आहे.: वड्डे लोगां वड्डे प्रॉब्लेमां, एक बी दिमागवाला नै दिकता. इकडे अभी. पेटला आहे. रोहिणी उगीच असे बोलु नको बोलु नको राज्या. शिव्या देउ नको म्हणे. जसे काही सद्या कायम ओव्याच गात असतो. ती बहीण रडारड चालू करत आहे. माज्या मुळे झाले माझ्या मुळे झाले. हा वडिलांना सोडवून आणेलच म्हणे. स्पृहाची एंट्री होईल्वाट्ते. ती पोरगी रडतच आहे.

नाशीकची ट्रीप फेल गेली काहीही युजफुल डिस्कशन झाले नाही. धिस कुड हॅव बीन अ झूम कॉल ऑर अ‍ॅन इ मेल.

भाग ८२:

सद्या शिवाजी नगर पोलिस स्टेशन मध्ये अ‍ॅडमिट आहे. वकिलांना फोन करायची परवानगी नाही. इकडे उत्साही अभी एकदम आल्फा मेल मोडात आहे. बल्लीवर रागवतो पत्ता का दिला म्हणून. बहिणीला का रड तेस एक मुस्काटात ठेवीन हे लगेच. हिच्याच
इज्जत संरक्षणासाठी पहिला राडा केला होता. ती मुलगी अगदीच चार वर्शाची असल्यावाणी ब्बाब्बा ब्ब्बाब्बा करत आहे. व्हिच इज क्वाइट इरिटॅ टिन्ग. अभी लगेच बाहेर पडतो. वकिलाचे नाव उमा बंड. ही स्पृहा असेल.इकडे बस कंडक्टर व फॅमिली घरी आले आई चहा करत आहे. वडील सिरीअस आहेत हे त्याच्या डोक्यात शिरले आहे बहुतेक. हा पण बाबांबरोबर हपिसात येतो म्हणे. इला भाटे लाडिक चिपळ्या वाजवत गाल फुगवून बसली आहे. हा कपडे बदलून आला आहे. शर्ट पेंट!!! बाबांसारखा ड्रेस.इकडे एकदम विगो व भजन पंती चालू आहे. खरेतर विगो चा मोड हा माझ्हा जनरल मोड असतो. भजने गात जगरहाटी चालू आहे सर्व नीट आहे. आपण सुखी राहायचे हे लै भारी. एकदम नीट बोलतो डॉक्टराशी. ह्याला सायलेन्सर लावा म्हणतो गुरव. गुड बिट ओफ एक्टिन्ग. बाय मोरुकाका. हे डॉकटर एकदम पेठी काका दिसतात. खरेतर गुरवाला पण एक साइज मोठा अंगरखा का दिला असावा. का तो चोरीचा आहे!! वरचे जाकीट फिटिन्गचे नाही.

इकडे अभी पण कपडे बदलून आलेलाआहे. शर्ट प्यांट ह्यातून दोघे मुलगे हाताशी आलेत असे दाखवले असावे. हा उमा बंडच्या घरी जाउन बंड करील आता बहुतेक. धडाक्याचा कार्यक्रम.

इकडे म्हाद्या लीना प्रेम संवाद चहा घ्या हो महादेवा चालू आहे. लीना हुषार आहे. चांगली बोलते म्हादेवाशी.

भाग ८३:

इकडे सिद्धार्थ बस अपघात कसा झालेला आहे तो विचारून घेत आहे. बस च्या रिपेअर मध्येच काही तरी खोट आहे. दिवेआगरला
जाणार्‍या घाटात बस कोसळली व जळली आहे.आता बहु वेटिन्ग चर्चीत मंदी व सई लाडे लाडे उखडून बसणे चालू आहे. सई नेहमी प्रमाणे फुगुन बसली आहे. ह्यांच्या टेबलावर चार ग्लास भरुन ऑरेंज ज्युस का ठेवला असावा. प्लस मोठ्या जग मध्ये पन आहे.सई बहिणीचा हात धरुन नील गेला उड त नाट्य करत आहे. स्वतः मेसेज करता येतो ना. इकडे इला स्वयंपाकीण असल्या तरी स्वतःच काही फोड ण्या देत आहे. रोहिणीचा फोन येतो. इला रोहिणी संवाद चालू आहे कॅच अप. हे मंदी साई संवादाचीच मोठी आवृत्ती चालू आहे. ढसा ढसा रडणे. रिकाम्या आसनांची पूजा मनोभावे लेव्हलला आहे इला...कदम वॉटसॅप आंटी होणार पुढे. रोहिणीला आता पन्नाशीत पण मोठे माणूस हवे आहे सल्ला द्यायला. इकडे लीना महादेव रोमान्स चालू झाला आहे. मध्येच. एक गुरव व त्याचा कंत्राटी किलर ह्यांचा ड्रंकन सीन आहे. हिट फॉरवर्ड. अभी इन्स्पेक्टर समोर बसून हळू हळू व लगेच चिडला आहे. इथेच राडा करेल बहुतेक. पण हा शांत पणे वडिलांना भेटू बघतो.

भाग ८७ परेन्त लोड झालेले आहेत. आता कथानकाने एकदम सिरीअस व भावना प्रधान मोड मध्ये शिरले आहे. त्यामुळे विनोदी लिहिणे फार शक्य नाही. लोकांच्या सफरिन्ग वर काही विनोद करणे बरोबर नाही. सद्या तुरुंगात आहे. व लॉकडाउन मध्ये कसे लोकांना एकदम वेळ मिळाला व एकमेकांषी मना पासून बोल णे झाले तसे त्याचे झाले आहे. बायको मुलगा सर्वाशी बोलत आहे. बट धिस कपल सीरीअसली नीड्स अ ड्रेस चेंज. ते जमीनदारीण लुक नेकलेस बोअर आहे व लुंगी सदरा फारच बोअर आहे. पब्लिक मध्ये तरी त्याने लेंगा सदरा घालावा.

नील अपघात स्थली व अभी वकीलीणीला स्टॉक करत आहे. व्हेरी क्रीपी. दोन्ही सांडगे आता सिरीअस हेल्प द फादर मोड. फुल शर्ट अँड ऑल. राव कन्या रडून रडुन अर्धी झालेली आहे.म्हादेव फोन वर चौकशी करत आहे. विनय आपटे गुड अ‍ॅक्टिन्ग. बट रिपिटेटिव्ह. लेखक व दिग्दर्शक पुणेरी आहेत ते कळते. हा अभी जो वकिलिणीच्या मागे मागे स्टॉकिन्ग करत आहे. वाट बघत आहे. त्या ऐवजी वकिलिणीने त्याला घर ते कोर्ट कोर्ट ते ऑफिस ह्या प्रवासात बोरिवली ते टाउन मध्ये सर्व स्टोरी सांगितली असती पंधरा वेळा. स्पृहा काही अनुभवी वकील दिसत नाही. खरंच बालनाट्य दिसते. विशाखा सुभेदार सारखी हवी होती. ते सई मँडी मला पण विनोदी वाट्ते. मुंबईतली अर्धी कामे प्रवासात होउन पण जातात - बोलणे समजाव्णे वगैरे तेव्हाच. सर्व दळण परत दाखवले आहे. वकीलिण पण अभीवर मोहित झाली वाट्ते.इकडे नील अपघात ग्रसत मुलाला बेड पॅन द्यायला पण तयार आहे. किती पुढारलेला आहे. हे खूप वेळ चालले. इकडे महाद्या लीना आइस ब्रेक झाला आहे व पंधरा मिनिटे लीना ची बॅक स्टोरी. म्हाद्या हळूच खुलत आहे. मेन तेच दिनेश निंबाळकर म्हणजेच रिसबूड. सुहास बाई पेटंट अ‍ॅक्टिन्ग करत आहेत म्हातारीचे. मग मुक्त्रा बर्वे कुठुन आली होती मध्येच भाग ८८ ८९ मध्ये काय कळेना गड्या.

एकीकडे कृ गुरव व विगोचा हा काय बोलतो ते त्याला कळत नाही तो काय बोलतो ते ह्याला कळत नाही ट्रॅक चालू आहे. विगो कधी क धी एकदम समजुतदार बोलतो. व भजन करत बसतो. हाउ इज ऑल धिस ग्रेट आय फेल टु अंडर्स्टॅम्दीग.

भाग ९१ लोड झालेला आहे.

सद्याला १५ दिवसाची रिमांड मिळाली. रोहिणी म्हाद्या फोन वर टिपे गाळत आहेत. सुहास पण टिपे गाळत आहे. आता आजी ने मणीला भेटायला पाहिजे. आजीला घराची आठवण येत आहे. अभीला एक पुरावा मिळत आहे. कुत्र्यासी नवे हाडूक.

भाग ९२ लोड झालेला आहे.

हा ही मेजरली अंधारातच शूट झालेला आहे. प्रॉब्लेम काय आहे ह्यांचा? पूर्ण भाग बस अपघात. त्याचे मिडीआ कव्हरेज. व प्रतिक्रिया.
बस रिपेअर झालेली की नाही. का तशीच पाठवली. रिपोर्टर म्हणून ती आपली मानबातली बायको आहे. मोठ मोठ्या आवाजात बडा बडा.

शेवटाला सदानंद रावाची मुलगी तिच्या इरिटेटिन्ग आवाजात आई आई किंचाळते व मामा बद्दल गैर्समज करुन घेते आधीच. मग रोहिणीचा वहिनीला भावपूर्ण फोन. संपला भाग. दोन्हीकडे मायलेकी अंधारातच बसलेल्या आहेत. इलेक्ट्रिक अग्नीचा पण कोप दिसत आहे झालेला. फेक न्युज कशी जनरेट होते ते दाखवले आहे. जे झाड आता फोफावले आहे. भाग ९४ पण आला आहे. रोज एक टाकत आहेत. पण मी बघणे सोडले एक तर अंधार. विनय आपटे दिसला की त्याला अंघोळ करायला लावून सर्व मणी मंगळ सूत्रे काढायला लावा वी. व चांगले क्वालीटी चड्डी बनियान शर्ट प्यांट घालायला द्यावे असे वाट्ते. लुंगी जरा सस्पिशिअस वाट्ते. काहीही कारन काढून उगीच फ्लॅश बॅक पण तो ही बोअरिन्ग आहे. आमच्या जनरेशनचे तरी आईबाप असेच होते त्यामुळे ह्यात काय नवीन असे वाट्ते. अगदी कपडे सुद्धा तसेच असत. दिनेश जुने कढ ओततो. त्याची बायको कलेक्टरीण आहे!!! पण बायका म्हंणजे भावनिक नात्यांच्या कुंपणात अडकलेलय असतात असे स्टुपिड विधा न करते. सई मँडी इग्नोर मारा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्यात हाईट म्हणजे सिनेमातला सुरूवातीचा गणपती नुसता स्क्रीनवर पाहूनच नीलला कळतं की हा त्या दरवाजा गणपतींपैकीच आहे. धन्य _/\_

या शिरेलीतील तरूण मंडळींकडे जे मोबाईल फोन्स आहेत, ते स्मार्ट फोन्स नाहियेत आणि म्हादेव काकांच्या वाड्यात कुठेही राऊटर दिसत नाहिये, मग यांना ईंटर्नेट वर श्रीपाद ची माहिती कशी मिळाली, काही कळलं नाही .... Lol

कोण बरं ते बाकी सीरियल्सपेक्षा चांगली आहे म्हणून कौतुक करत होतं? Proud

कॉलिंग रमड. आज भाग सुरु होतानाच रमडच्या गणपती आणि श्रीपाद संदर्भातली उत्तरं आहेत.
आय होप अग्निहोत्रवाले हे वाचत असतील आणि त्यामार्फत शुगोला कळेल की ती अगदीच प्यँ आहे. Angry

>> कोण बरं ते बाकी सीरियल्सपेक्षा चांगली आहे म्हणून कौतुक करत होतं? >> हो,हो, कोण ते? पग्या तर इतका दिपलेला आहे ह्या सिरियलने की इथे फिरकलेला ही नाही. उगाच त्याच्या मनातल्या सिरियलच्या इमेजला धक्का नको लागायला Wink

धाग्याचं नाव 'अगं अगं म्हशी मला कुठे नेशी' ठेवायला हवं. काही सीन्स पुढे ढकलत का होईना पण भरपूर लोक नियमित बघतायत की Proud

मणी डोक्यात जातोय आता. काय तो तोरा, काय ती सगळ्या जगावर वसवस. तरुण मणीचं काम ओम भूतकर करत आहे का? तो पण भारी करतो आणि मोजो तर प्रश्नच नाही. पण त्या मृणालचं त्याच्यासमोर हात जोडणं वगैरे कसंतरी वाटतं. इतका कोपिष्ट नवरा सांभाळून तिलाच बीपी व्हायचं.
एकूण बायकोवर राग काढणं हा सगळ्या अग्निहोत्री घराण्यातील पुरुषांचा मूख्य गुण आहे. मणी मृणालवर रोज ओरडतो. रोहिणी बिचारी रडत असते तर सदानंद 'रोजची तुमची कटकट' असं काहीतरी बोलतो. महादेवाला बायको नाही पण तो शालिनीशी रोज एकदा तरी भांडतो. दिनेशची बायको तर कलेक्टर(!) म्हणे पण ती त्याला घाबरते. त्याला त्याची आईपण घाबरते. (तुझ्या बायकोला तू नोकरी करायची परवानगी देतोस ना- मग सईला पण करू दे- इति प्रभा. अरे पण कलेक्टरला आपलं काम करायला या जमदग्नीची परवानगी का लागते?) आणि आप्पा ग्रेट होते असं मणी म्हणतो ते पण एका सीनमध्ये लक्ष्मीवर मुलांच्या समोर खेकसताना दिसतात. (लक्ष्मी- मी काय म्हणते. आप्पा- काही म्हणू नका तुम्ही!). आपल्याच तरुण मुलामुलींशी अजिबात पटवून न घेणे हा अग्निहोत्री पुरुषांचा दुसरा गुण आप्पांपासून सुरुवात. महादेवाला तेही भांडण करायला 'किशोर' आहेच.
एकटा श्रीपाद काय तो वेगळा - अमानी लिहिलं तसं नॉन ब्राम्हणी वागतो. ते character मस्त घेतलं आहे पण सौथचे सीन्स बोअर होतात. तरुण पिढीचे सगळेच सीन्स फॉरवर्ड करणे. Overacting ची दुकानं एकेक!

>> धाग्याचं नाव 'अगं अगं म्हशी मला कुठे नेशी' ठेवायला हवं. काही सीन्स पुढे ढकलत का होईना पण भरपूर लोक नियमित बघतायत की >> व्हय व्हय. घेतला वसा टाकवत नाही. रोजची सवय.

I am full on GOT binge watching. So watch this stupidity as a break. GOT will go off Disney on March 31.

तिकडे ती रेड वूमन अग्निहोत्र करत असेल. वेस्टरॉसच्या तळघराचं रहस्य कळण्याच्या आधीच्या काही सीझनमध्ये व्हीलन बनलेला एक गुरव (हाय स्पॅरो), सगळ्यांची वाड्यात येण्यासाठीची धडपड, सगळं सेमच आहे.

कॉलिंग रमड. आज भाग सुरु होतानाच रमडच्या गणपती आणि श्रीपाद संदर्भातली उत्तरं आहेत >>> हो हो Lol आता तर खात्रीच पटली की टाइम मशीन थ्रू वाचताहेत ही मंडळी. लग्गेच प्रश्नांची उत्तरं देतायत सध्या.

सायो, तू डायरेक्ट फटके देते आहेस म्हणून नाहीतर मला पण काही लॉजिकल प्रश्न विचारायचे होते. जसे की - मंजीला मधल्या काळात ती कुठे होती असा जाब कोणीच का विचारत नाही? मोरूकाकाला घरातल्या सगळ्यांनीच 'आहे बाबा असा एक पूजा करणारा माणूस' म्हणून मान्य केलं आहे का? कोणालाच त्याला समोरासमोर काहीच का विचारायचं नाहीये? कालच्या एका एपिसोड मधे बाबागातोतंबोराऐकतो धूमकेतूसारखा एका अनाकलनीय शॉट मधे का येऊन गेला? इ.इ.
त्यातल्या त्यात शालिनी इतकं पुढेपुढे का करतेय हा आपल्यासारखाच मोजोला सुद्धा पडलेला प्रश्न आहे हे बघून बरं वाटलं Proud

विचार विचार. अरुणला फटके कारण त्याला सिरियल बाकी कचर्‍यापेक्षा बरी वाटली. Wink
मंजुळा तिच्या आईबद्दल काय खोटं बोलतेय? तिने सांगितलं असतं की मंजुळा झाल्या झाल्या तिला आईपासून वेगळं केलेलं असतं आणि तुळसाला आपल्या मुलगी आहे हे माहितहॉ नसतं. आत्ता दोन वेळा तिच्या बोलण्यात असं आलं की ती आणि तुळसा एकमेकींना आई मुलगी म्हणून ओळखतात. तसंच तुळसाचा खून झालेला नसावा. काय खरं खोटं आहे हे तिलाच माहित.
म्हाद्या आणि शालिनीने आता लग्न कराव. नाहीतरी शालिनी आता आदरातिथ्यात रुळली आहेच चांगली.

विचार विचार. अरुणला फटके कारण त्याला सिरियल बाकी कचर्‍यापेक्षा बरी वाटली. Wink
मंजुळा तिच्या आईबद्दल काय खोटं बोलतेय? तिने सांगितलं असतं की मंजुळा झाल्या झाल्या तिला आईपासून वेगळं केलेलं असतं आणि तुळसाला आपल्या मुलगी आहे हे माहितहॉ नसतं. आत्ता दोन वेळा तिच्या बोलण्यात असं आलं की ती आणि तुळसा एकमेकींना आई मुलगी म्हणून ओळखतात. तसंच तुळसाचा खून झालेला नसावा. काय खरं खोटं आहे हे तिलाच माहित.
म्हाद्या आणि शालिनीने आता लग्न कराव. नाहीतरी शालिनी आता आदरातिथ्यात रुळली आहेच चांगली.

तुळसाचं रहस्य उगाच वाढवत आहेत झालं! कदाचित ती खरंच असेल जिवंत आणि बाप्पाच्या भीतीने अजूनही लपून राहिली असेल. मग मंजुळा तिच्याबरोबरच गेली असेल नील-अभि ला शेंड्या लावून.
म्हाद्या आणि शालिनीचं लग्न झालं तर तो संज्योतचं ऑफिशियल बारसं करेल बहुधा किशोर म्हणून Wink

काल पाहिलं का? मणीमंगळसूत्र चिवटपणे विचारत होतं की सोन्याचा गणपती कुठेय? पण रोहिणी मधेमधे 'ते जाऊदे ते जाऊदे' पचकते आणि विषय बाजूला पडतो. काहीच कसं कुतुहल नाही या बाईला?

शालिनी ला गणपतीची सुट्टी किती आहे नक्की?
म्हाद्या वि. श्रीपाद, मणी वि. दिनेश अशी अंतर्गत बंडाळी आहे, ती उषा कधी येणार म्ह ने? आणि येऊन कोणाशी भांडणार? मोरुला मोदक करायला बसवले पाहिजे. सगळ्याच रिकामटेकड्या पोरांना बसवा कामाला.

ते मुलींचे सारखे वव्वाअडा किती सॉल्लिड आहे काय डेंजर आहे म्हणणे एकदम खोटे वाटते. ह्या मुली आतून खर्‍या साहसी नाहीत. आपण हून त्यांनी स्वतःची लग्ने लावलेलीच आहेत. व थिंग्स आर कूल ओन्ली फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ नील ऑर अभिमन्यू. ती बबुची गफ्रे तर एकदम गचाळ. हिने बिहांइंड द कॅमेरा करीअर करावी हा फुस. नुसते डोळे वटारून संवाद वाचोन दाखवतात.

इंटरनेट सर्च फारच विनोदी.

सोन्याचा गणपती प्रभीने स्वतःच्या ओच्यात बांधून अंबाल्याला पळिवला आहे. तो ती को णाला कश्याला सांगेल. नौ वारी साडीचे ओचे पदर असतात हे क्लि अर केलेले बरे. मुफ्त का चंदन घिस मेरे नंदन आहेत आई बेटा.

दिनेशला आप्पांनी त्याच्यावर केलेल्या उपकाराची जाण नाही हे दिसलंच पण प्रभा मामी तशी फुकटी, संधीसाधू वाटत तरी नाही. अर्थातच कितीही म्हणाली तरी बाकी मुलांपेक्षा तिला स्वतःचा मुलगा आणि त्याचा इंटरेस्टच जास्त प्रिय असणार हे आलंच.

Team Mani.

प्रभामामी निराधार असल्याने अप्पा तिला आधार देतात, घरी आणतात हे ठीक पण त्यानंतर ते तिला स्वतःच्या पायावर उभी करायला काहीही प्रयत्न करत नाहीत. ती प्रगतीपुस्तक वाचून सही करते म्हणजे अक्षरओळख असते. मग पूढे शिकवलं असतं तर तिला एखादी टीचर वगैरे नोकरी मिळाली असती. किंवा शालिनीसारखी नर्स. किंवा कुकिंग तिला येतच होतं तर ऑर्डर्स घेणं इत्यादी. ती बिचारी रोजचं जेवण आणि डोक्यावर छप्पर या बदल्यात अग्निहोत्री वाड्यात फुकट राबते आणि unpaid हाऊसवर्क करत राहते. यामुळे दिनेशला अग्निहोत्री लोकांबद्दल राग असणं समजू शकतं. महिला आणि financial independence हा मुद्दा किती महत्वाचा आहे याचंच एक उदाहरण.याउलट शालिनी पण एकटी आहे तरी कमावती असल्याने तिचा कॉन्फिडन्स फुल ऑन असतो.
नंतर प्रभा श्रीपादला हजार रुपये देते ते बहुधा दिनेशने आर्मीतून पाठवले असावेत. नाही म्हणायला रोहिणीला प्रभामामीने जे केलं आहे त्याची जाण आहे. आईपेक्षा तिने माझं जास्त केलं असं ती बोलून दाखवते.

दिनेश ने निंबाळकरास कसे घोळा त घेतले ते ही दाखवा की.
Submitted by अश्विनीमामी on 1//

त्याचा उल्लेख प्रभामामी करते की. निंबाळकर त्याचे बॉस असतात आणि एका चकमकीत तो स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांचा जीव वाचवतो म्हणून ते त्याला मुलगा मानू लागतात असं काहीतरी होतं.

आजचा एकच भाग अजून आला आहे आणि तो ही सगळा गुडीगुडी. नाही म्हणायला तो श्रीपाद भिकार्‍यासारखा वाड्यावर दारात येतो आणि मंजुळाला वगैरे बघतो हेच काय ते नवीन.
प्रभा मामी आणि त्या दोन रिकामटेकड्या पोरींचं ‘भटाला दिली ओसरी आणि भट हातपाय पसरी‘ सारखं झालं आहे.

मला यातला गतानुगतिकपणा बघून उबग आला आहे. जुन्या कालबाह्य रूढींचे वळसे उगाळत राहण्यात धन्यता मानणारी एकजात सगळी पात्रे!
मंजुळाने श्रीपादला ‘आम्ही जातपात मानत नाही’ म्हणणे हा सर्वात मोठा जोक! तिला अजून भाषा आणि कपड्यांवरून हिणवणारी माणसे समोरच असताना! ‘इतक्या बायकामुली आहोत आपण, सहज करू मोदक, पुरुषांच्या शब्दाचा मान राखू’ हा ‘विज्डम’! बायको नवऱ्याला टॉवेल हातात आणून देते हा घरगुतीपणा! मी नाही बघू शकणार यापुढे! मळमळतं मला!

Pages