वादळ

Submitted by JPrathamesh on 24 January, 2023 - 14:56

गझल

वादळाला वादळाने गार केले
या नभाला का ? कुणी बेजार केले

ना घड्याळे घालुनी ती वेळ येते
बंद दाराने तुझे सत्कार केले

सांग सारे जाऊनी साऱ्या जगाला
काजळी ने का ? तुला लाचार केले

बोलताना बोलले वाटेल तेव्हा
ना कुणाच्या मागुती मी वार केले

बोलले नाही तुला, नाही कुणाला
मी तुझ्यासाठीच रे शृंगार केले....

प्रथमेश जोशी

Group content visibility: 
Use group defaults