मनातलं कपाट

Submitted by sanjana25 on 23 January, 2023 - 05:08

कित्येक वर्षांनी वेळ मिळाला
मनातलं कपाट उघडून बसले
पसारा पाहून मग उमगलं
मी ह्यात उगीचच फसले...

भूतकाळाच्या किती शिदोऱ्या
मोजून मोजून मी थकले
आंबट गोड त्या आठवणी
मुळीच नाही पुसू शकले...

मग मनाशी खूणगाठ बांधत
ठरवलं थोडा पसारा आवरू
इतकं ओझं वाहण्यापेक्षा आपण
स्वतःला जमेल तितकं सावरू...

माझी एवढी माफक अपेक्षा
मी तरी नाही पुरवू शकले
काही शिदोऱ्या फेकण्याचा विचार
मनात आल्यावर किंचित थबकले...

त्या शिदोऱ्या फेकण्याचा विचार
माझ्यामते तरी चुकीचाच होता
भूतकाळापासून सुटकेचा कोणाला
अधिकार विधात्याने दिलाच नव्हता...

sanjana

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults