Submitted by सांज on 20 January, 2023 - 02:19
का होतं असं?
मन विस्कळीत झालं की,
गुंत्यांमध्ये गुंतत गेलं की
तू आठवतोस.
मध्यरात्री रस्ते शांत झाल्यावर,
खिडकीतून बाहेरचे दिवे मिणमिणतात तेव्हा
वारा रहमानच्या सुरावटी सारखा तरंगत असताना
मन हलकं हलकं होत जाताना,
तूच आठवतोस.
का होतं असं?
चार ओळी मनाच्या तळातून पोहून वर आल्या की
कागदावर त्या उतरवताना
तू आठवतोस.
कोणालाही दाखवण्या आधी
तू त्या वाचाव्यास
असं मग उगाच वाटत राहतं..
का होतं असं?
माझ्या प्रत्येक कवितेचा पदर
विणला जातो, तुझ्या जाणिवेच्या धाग्याने.
तो नेसून तुला दाखवण्याचा मोह मग आवरता आवरत नाही..
तुझं असं माझ्या आत-आत असणं
मनातून डोळ्यांत तरळत राहणं
भिजवत रहावंसं वाटतं.. सतत शाईतून.
का होतं असं?
सांज
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान.
छान.
सांज, अगं आधीच्या कथा अर्धवटच राहिल्यात ना....!!
@आंबट गोड
@आंबट गोड
हो, मधल्या काळात काही कारणाने खूपच मोठा ब्रेक झाला. आता लिहायला घेतल्यात परत.
सुपर्ब ... !!!
सुपर्ब ... !!!
>>>>>वारा रहमानच्या सुरावटी
>>>>>वारा रहमानच्या सुरावटी सारखा तरंगत असताना
कमाल!!
आबा, सामो.. धन्यवाद
आबा, सामो.. धन्यवाद
खूप सुंदर झालीय...
खूप सुंदर झालीय...
मागे एका कवितेवर प्रतिसाद दिला होता, तेच इथे लिहितो.
ही कविता एखाद्या आर्ट वेबसीरिज किंवा मुवीचा सुरुवातीचा मोनोलोग म्हणून शोभेन!!!
सुंदर
सुंदर
खूप सुंदर कविता।
खूप सुंदर कविता।
माझ्या प्रत्येक कवितेचा पदर >
माझ्या प्रत्येक कवितेचा पदर >>
यापुढील खूप खूप सुंदर!
@अज्ञातवासी : धन्यवाद
@अज्ञातवासी : धन्यवाद
@चैत्रगंधा, मीना, गौरी.. Thank you!
अप्रतिम !
अप्रतिम !
वाह! खुप सुंदर
वाह! खुप सुंदर
माझ्या प्रत्येक कवितेचा पदर
विणला जातो, तुझ्या जाणिवेच्या धाग्याने.
तो नेसून तुला दाखवण्याचा मोह मग आवरता आवरत नाही..>>>>>>>>>> खूपच आवडलं.