मी लिहीत राहतो...

Submitted by अज्ञातवासी on 12 January, 2023 - 23:44

दररोज करतो नवे संकल्प
आणि ढकलतो उद्यावर
तरीही स्वतःला न बदलता
मी लिहीत राहतो...

मिठीत घेऊन तिला
मी लिहीत राहतो
आठवून सुद्धा तिला
मी लिहीत राहतो....

कुठल्याही क्षणी तिला
आठवत राहतो
निराश मनाने उत्तराची वाट बघत
मी लिहीत राहतो....

मी लिहीत राहतो
भावनांचे कल्लोळ
उदासीनतेचा पोवाडा
मी लिहीत राहतो...

निराश मी, मी हताश
वाईटाचा मी ध्यास
त्या जुनाट काळडोहात
यथेच्छ मी डुंबतो
पण तरीही...मी लिहीत राहतो

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कविता छान...
पण उत्साहाने लिहित रहा...