'ह्या पेयाला नावच नाही'

Submitted by नीधप on 12 January, 2023 - 08:56
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दारू: रम. कॅप्टन मॉर्गन प्रीफरेबल. पण म्हातारा साधूही पळेल. बाकी अजून महागड्या रमा तुम्हाला परवडत असतील तर वापरून बघा. Happy
संत्री, सफरचंदे
दालचिनी, लवंगा, स्टार अनिस, ऑलस्पाइस
मिडीयम रोस्ट 100% कॉफी पावडर (चिकोरी अजिबात नाही, इन्स्टंट अजिबात नाही)
पाणी

क्रमवार पाककृती: 

पूर्वतयारी
१. सव्वा कप पाण्याला 3 टीस्पून या हिशोबात कॉफी घ्या आणि ती फिल्टर (मी साऊथ इंडियन फिल्टर वापरला) करून घ्या.
२. अडीच कप पाण्यात पाव(ब्रेड नाही. एक चतुर्थांश) सफरचंदाचे तुकडे, एक छोटे संत्रे सालीसकट तुकडे करून, 3 किंवा 4 लवंगा, दालचिनीचे अर्ध्या बोटाइतके 4 तुकडे, स्टार अनिसच्या दोन पाकळ्या, दोन चिमूट allspice पूड असे घेऊन पाणी अर्धे होईपर्यंत आणि सफरचंद शिजेपर्यंत उकळून घ्या. या प्रकरणाला पुढे मी काढा म्हणले आहे.
३. जास्तीच्या संत्र्याचे सालासकट आडवे स्लाइस कापून घ्या. ग्लासावर खोचायला

आता प्रत्यक्ष ग्लास भरायचा.
कॉफीचे decoction आणि वरती सांगितलेला काढा व्यवस्थित कढत कढत हवा. ते दोन्ही आधी करून ठेवले असेल तर परत गरम करा.

एका ग्लासाचे प्रमाणः
30 मिली कॉफी
गाळलेला काढा 60 मिली (गाळण्याचे काम आधी करू नका. शक्यतो ग्लास भरतानाच गाळा. चहा कपात ओततो तसा)
रम एक पेग (60 मिली) असे मिश्रण केले.
गार्निशला संत्र्याची अर्धी चकती ग्लासावर खोचा.

झालं. मस्त घसा शेकत चांगभलं करा.

वाढणी/प्रमाण: 
५ ग्लास . +/-१
अधिक टिपा: 

१. रेसिपीत कप, टीस्पून वगैरे मेजर्स आहेत. ती जनरल, अंदाजपंचे दाहोदरसे नाहीत. कप = 238 मिली. टेस्पून = 15 तर टीस्पून = 5 मिली. हे व्यवस्थित मोजून घेतलेले आहे.
काही महत्वाच्या सूचना
२. घसा शेकत पाहिले 2-4 घोट प्या पण संपूर्ण ग्लास चहासारखा भसकन संपवू नका.
३. कॉफीचे प्रमाण वाढवू नका. कॉफीची नोट सटलच राहूद्या. अन्यथा हिंदी सिनेमातल्या लिक्विड ऑक्सिजनसारखी 'कॉफी तुझे सोने नही देंगी और रम तुझे जगने नही देंगी!'.
४. आपला नेहमीचा दारू कोटा कितीही पेग असला तरी हे पेय दोन पेगापलिकडे पिऊ नका. दुसऱ्या पेगच्या पुढे जाऊच नका आणि जायचे असल्यास आपल्या सवयीच्या गोष्टी वापरा.
४. पेय कुठलंही प्या. पण प्यायल्यावर गाडी चालवू नका.

माहितीचा स्रोत: 
आहार: 
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Use group defaults

इंटरेस्टिंग, कॉफ़ी सोबत रम घ्यायचा प्लॅन होताच

बाकी काढयाच्या रेसिपी मध्ये ते स्टार अनिस म्हणजे काय ते कळलं नाही

गरमाग'रम' नाव ठेव कॉकटेलचं Proud

बाकी पेयाचं वर्णन प्रचंड आवडलेलं आहे. इतके कुटाणे करण्याची हिंमत झाली की नक्की करून पाहणार Happy

आमच्या आईने एकदा चांगला साजूक तुपातला शिरा केशर, बदाम, बेदाणे वेलदोडा आणि काय काय घालून केला होता. सगळे म्हणाले व्वा, शिरा उत्तम झाला आहे. माझ्या सासूबाई म्हणाल्या एव्हढे सगळे सोपस्कार केल्यावर काय नवल आहे चांगला झाला आहे?
तरी सासूबाई मुंबईच्या होत्या, पुण्याच्या नव्हत्या. पण आम्ही पण सदाशिव पेठेत पाच वर्षे राहिलो असल्याने असल्या शेर्‍यांकडे दुर्लक्ष केले. आम्हालाहि असले शेरे देता येतात, पण आम्ही देत नाही. नाही जमले एव्हढे सगळे प्रकार करायला तर मुकाट्याने नीट स्कॉच पितो नि गप्प बसतो.

>>>>>>>पण आम्ही पण सदाशिव पेठेत पाच वर्षे राहिलो असल्याने असल्या शेर्‍यांकडे दुर्लक्ष केले. आम्हालाहि असले शेरे देता येतात, पण आम्ही देत नाही.
हाहाहा Lol Lol

इतकी कृती करायला हिम्मत पाहिजे त्यासाठी स्टेप 1 मिसिंग आहे...
पूर्वतयारी -
1 - एक टकीला / रम / व्हिस्की शॉट घेणे...

तीच आहे का रेसिपी <<
इन्स्टा लिंक पाह्यलेली नाही पण माझ्या रेसिपीची प्रेरणा मल्ड वाईन आहे.