नवरा की प्रियकर

Submitted by बेताब दिल on 4 January, 2023 - 13:01

आज त्याला ऑफिसला जायचं होतं एरवी तो घरूनच काम करायचा.अजून हि mostly work from home च चालू होतं त्याच्या टीम च. संध्याकाळी तिनेच फोन केलेला चहा करताना,धडधड स्वतःचं सांगून मोकळा झालेला मी मित्रासोबत आहे,नंतर बहिणीकडे जाणारे.उशीर होईल यायला.काही काम होतं का?
ऐकून बीचारी च मन खट्टू झालं.अरे बोलूच नाही शकत का आपण असं इतर काही.एखादे वाक्य जरा गोडीत बोलल तर काय जातंय?
रात्री ८:३० ला घरी आला,मुलांना घेऊन ती जेवायला बसलेली.येऊन बोलला छान, काय मस्त भाजी केलेली आज,एकदम टेस्टी.खूप आवडली मला! मुलानी पण दुजोरा दिला.
ती खुश झाली.जेवण झालं तरी तसाच हात घेऊन बसून राहीली ताटावर.हा आपला भूक नाहीय म्हणून मोबाईल मध्ये गुंग.आजच्या शेअर मार्केट मधल्या प्रॉफिट साठी कौतुक केलं तिचे.म्हणे lady luck ahe तुझं!
मुलगी सांगायला आली ,बाबा माझ्या school मध्ये उद्या
Assembly आहे आमची.तिच्याशी २/३ वाक्य बोलला.तो पर्यंत मुलगा झोपी गेलेला.
ती त्याला निरखून बघू लागली,मोबाईल वर chatting आणि चेहऱ्यावर smile. माझ्याशी बोलताना मात्र अठ्याच येतात कपाळावर.
अशीच बसून राहिली त्याला बघत,पुढचा प्लॅन करत.आज निवांत बोलू या दोघे ही झोपताना. तो पर्यंत याने पुढचा प्लॅन केलेला, श्रमपरिहार चा.
ती आश्चर्याने बघतच राहिली,खरंच का काहीच राहिलं नाहीय शिल्लक आपल्या विषयी? कस याल अजिबात वाटत नाही अपल्या सोबत छान वेळ घालवावा म्हणून?
२ दिवस झाले खूप hectic ahe माझं schedule.
आजचा दिवस पण खूप काम होतं." त्याची पुस्ती.
"पण आज तर तुम्ही बाहेर गेलात ना संध्याकाळी.?"
न राहवून तिने विचारलेच शेवटी रागात.हे थोडी ना त्याला सहन होणार होत!
"अरे सकाळी ९ ते २ meeting चाललीय माझी.तुम्हाला काय मी मशीन वाटतो की काय? करून बघ बर माझ्या जागी तू काम?"
बिचारी विचार करत राहिली.बाहेर मित्राकडे जाताना तू थकला नाहीस.नंतर नाही इकडे ही छान गप्पा मारल्या असतील ना? तेव्हा काही नाही झालं आणि आता घरी आला की लगेच थकायला झालं का? ९-२ meeting मुळे थकला होता तर मित्राला नव्हते भेटायचं.बहिणीकडे
नंतर गेला असता पण नाही.घरी आला की पिण्याच मात्र कारणच हवं. खुप दुखावली परत ती आज पण.
ताट उचलून ठेवू लागली की लगेच याने चालू केल,काय हे,लगेच काय जाते निघून मी हा विषय काढला की. बोल ना काही तरी".
ती ही चिडली " अरे मी इतका वेळ बसून होते तुझ्या समोर ताटावर,तुझ्याशी बोलावं म्हणून.तुला स्वतः हून काही बोलायला गेले की तुझी धूडकावनारी बरीच कारण असतात,आता कशाला हा विषय,नंतर बोलू,आता मी थकलो आहे, डोकं दुखत माझं, समजत नाही का तुला शांत बस ना जरा वगेरे वगेरे.म्हणून तुझ्या समोर मुद्दाम शांत बसले मी अशीच.तर तुझ लक्ष मोबाईल मध्येच! "
" मग जरा इंटरेस्टिंग टॉपिक वर बोलत जा ना जरा,काय ते आपले सारखं सारखं !"
झालं मग काय होणार होत अजून वेगळ?तो बसला हॉल मध्ये आपली बैठक मारून ,ती गेली रूम मध्ये . काढल वाचायला न्यू एपिसोड.त्या मध्ये नवरा बायकोचे असलेले रोमँटिक talks वाचून तिला अगदी घरून आल!समजले की काय कमी पडतंय.हे असं दोघांमधलं गोड बोलण होतच नव्हतं मुळात आजकाल.किती किती हवा असतो तिला तो संध्याकाळी.काही बोलायला नसल तरी चालेल पण तू सोबत हवास निवांत रात्री च्या वेळी असे तिला नेहमी वाटायचं.तिला कळायचं ही तिची मानसिक गरज आहे जी त्याच्या कडूनच पूर्ण होऊ शकते.पण तो ? त्याला माहिती ही नसेल हे कदाचित.तिने बऱ्याचदा सांगितलेलं त्याला पण आजकाल त्याची प्यायची स्वे जरा जास्तच वाढलेली.दर दिवसागणिक आजकाल प्यायचा.खूप खूप चीडचीड व्हायची तिची.किती ही समजाऊन सांगितलं तरी त्याचे तेच." अग किती टेन्शन असतं मला ऑफिस च. करून बघ माझ्या जागी काम"
नंतर नंतर तर तिने या वर बोलणेच सोडून दिलेलं.कितीही संगीतलं तरी तेच परत! आधी आधी ती बसायची त्याच्या सोबत गप्पा मारायच्या म्हणून.पण १-२ पेग चढले की मात्र तीच्यावर चिडायचा.तिला घालून पाडून बोलायचा.सारख्या तिच्या चुका काढायचा.आता सहन होत नव्हत तिला ही.पण मुलासमोर उगी गोंधळ नको म्हणून काही बोलायची नाही.तिथल्या तिथे विषय बंद केलेला बरा असे वाटायचे तिला.पण किती दिवस ना?
खरंच संपते ना सहनशक्ती ही कधी कधी.
अस नाही की प्रेम नव्हत दोघात,फिरायला जायचे दोघे.ट्रेक करायचे बरेच मुलांना घेऊन.छान छान ट्रीप arrange करायचे .physical relations madhe पण काही प्रॉब्लेम नव्हता.उलट मुलं मोठी झालीय तर त्यांच्या रूम मध्ये झोपायची कधी कधी.तेव्हा यांच्या रात्री ना बहर यायचा.इतका आनंद तिला कधीच नव्हता येत आधी . मुलं लहान होती तेव्हा हे पण एक कामच वाटायचं तिला.खूप दमून जात होती तेव्हा,शरीर आणि मन दोन्ही नी. पण तिला एक गोष्ट जाणवायची आजकाल ली physical रेलेशन्स सगळं काही नसत पण यामुळे वैवाहिक जीवन खूप strong बनत. ती
खुप गुंतून जायची मग त्याचात मेंटली.आपल्या नवर्याविषयी एवढं वाटण ते ही चाळिशी च्या उंबरठ्यावर असताना! Means a lot!!

पण दोघांमध्ये एक गॅप येत होता.आजकाल तिला मनातून खूप राग यायचा त्याचा.तिच्या मते त्याला काही महत्त्वच नाहीय तिचं.सतत available असण त्याने granted घेतलय वाटायचं तिला. त्याच खुप मूडी असण आजकाल नकोस व्हायचं तिला. त्याचा मूड,त्याचा जॉब, त्याच काम, त्याचे प्लॅन्स हीच सगळी प्रायोरिटी.
तीच दुय्यम स्थान ! मुलांसाठी जॉब सोडल म्हणून काय झाल? घरात काम करून पण माणूस थकतो ना?त्याच्या कमाला, मूडला द्या ना जरा महत्त्व.हेच कारण होतं तिच्या दुःखाचं.
अजून एक गोष्ट तिला खूप लागायची मनाला!हा हिरो पिऊन आपल्या मैत्रिणीशी गुलुगुलु बोलायचा,आणि हिला मात्र ओरडायचा . गोड गोड बोलायला सगळं जग आहे याच्या समोर पण कूचकट पना मात्र माझ्यासोबत च. इतका क राग येतो त्याला माझा आजकाल की सतत चीडतच राहतो काही बोलल की .२ मिनिटाच्या वर तर नीट बोलणंच होत नाही आजकाल.बिचारी खूप खूप frustrate व्हायची.रात्र रात्र भर रडत राहायची पण त्याला त्याची काही भनक ही नसायची.सांगून ही तो ignore करायचा,मग काय करणार.अशीच कुढत बसायची मनात .खूप एकटी पडायची. आपलं कोणीच नाही का या जगात अस वाटायचं सतत तीला .पण तीच स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करायची.नवऱ्यातून आपण मन काढल पाहिजे.emotionally independent राहायला हवं आपण. आपल्या आनंदासाठी आपण त्याच्यावर कशाल डिपेंड राहायचं? कदाचित प्रत्येकाच्या लग्नानंतरच्या १२-१५ वर्षानंतर हेच होत असेल.

पण वेड्या मनाला थोडी ना समजत इतकं लगेच.नवरा जरी असला तरी तो आपला प्रियकर ही असतोच की!पण प्रियकरावर एवढा राग येऊ शकतो? तिलाच समजायचं नाही आपलं वागणं चूक की बरोबर .या अशा भरकटलेल्या अवस्थेत अजून च घालमेल व्हायची तिची.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कदाचित कथा वाचकांनी पूर्ण करायची असेल. टीप लिहीताना शाई संपली असेल.
Laughing uncontrollably... बाप रे, सुचतं कसं हे?

अशातच तिला मोनाने एका साईटबद्दल सांगितलं. तिने उत्सुकतेने मग काळजीपूर्वक स्पेलिंग लिहून घेतलं आणि आपलं खातं टिंडरवर उघडलं. आपले फोटो अपलोड केले पण बरेच दिवसात काहीच झालं नाही.

आता पुढे.>>>>

आपल्याला सोशल मीडियावर देखील कुणी समजून घेत नाही या विचाराने ती खिन्न झाली. तशातच बाहेर कुंद वातावरण झालेलं, मनातील मळभ अजूनच वाढले. तिने स्वतःसाठी गरमागरम कॉफी केली आणि वाफाळता मग घेऊन ती गॅलरीत गेली.
बाहेर लोकांची वर्दळ मंदावली होती आणि काहीजण पावसाची जोराची झड यायच्या आधी घर गाठण्यासाठी लगबग करत होते.
तशातच तिची नजर त्या तरुणावर पडली, कुरळे केस आणि अंगात सैलसर चेक्सचा शर्ट, खाली भरपूर खिसे असलेली कार्गो पॅन्ट
कसलीच घाई नसल्यासारखा तो रेंगाळत फुटपाथवरून सगळ्या जाहिराती, पोस्टर, दुकानांच्या पाट्या वाचत चालला होता. एका हातात एक बियरचा कॅन घेऊन त्याचे एकेक घुटके घेत एकेक अक्षर समजावून मनन करत जावं इतका वेळ तो थांबत होता.
तिला गंमत वाटली आणि कुतूहलही आणि तिला आठवलं बरेच दिवसात आपल्या कपाटात स्कॉच पडून आहे तिला हातच लावला नाही. आज मस्त वातावरण आहे तर रात्री थोडी घ्यावी आता असा विचार करत ती अजूनच निरखून त्याच्याकडे बघायला लागली आणि कुठल्या अज्ञात प्रेरणेने माहिती नाही पण त्या तरुणाने दुकाने सोडून थेट तिच्या गॅलरीकडे पाहिले आणि त्याचा चेहरा आणि ते रोखून पाहणारे डोळे बघताच ती दचकली

आता पुढे....

राहू द्या ओ
तुम्ही मुद्दाम नाही केले माहीत आहे
योगायोगाने झाले

तरुणाचे वर्णन सेम माझ्यासारखे.. लगे रहो.. वाचतोय >> सगळ्या जाहिराती, पोस्टर, दुकानांच्या पाट्या "वाचत" चालला होता असे वर्णन आहे. लिहीत सुटला होता असे असते तर आक्षेप समजू शकलो असतो.

तिच्या गॅलरीकडे पाहिले आणि त्याचा चेहरा आणि ते रोखून पाहणारे डोळे बघताच ती दचकली>> ती लगबगीने घरात शिरली अन् धपापत्या उराने तशीच भिंतीला टेकून उभी राहिली.. कानशिलं गरम झालीत, कपाळावर घर्मबिंदू जमा झालेत याचेही तिला भान नव्हते.. बऱ्याच वेळाने जरा सावरल्यावर सहजच आरशात डोकावली तर आपल्या गालावर लाली पसरलीये असं वाटून ती कावरीबावरी झाली.
कितीतरी दिवसात तिने अशा भावना अनुभवल्या होत्या ..
' छे ! काहीतरीच विचार करतो आपण. आता आवरायला हवे. 'हे' पण येतील आता. पसारा पाहून उगीचच चिडायला निमित्त.' असा विचार करत ती नकळत गॅलरीत पोहचली तर मघाचाच तो समोरच्या गॅलरीत व्यायाम करत होता...

' छे ! काहीतरीच विचार करतो आपण. आता आवरायला हवे. 'हे' पण येतील आता. पसारा पाहून उगीचच चिडायला निमित्त.' असा विचार करत ती नकळत गॅलरीत पोहचली तर मघाचाच तो समोरच्या गॅलरीत व्यायाम करत होता... >>>> पुढे

झालेला प्रकार सुखावणारा असला तरी तो तरूण समोरच्याच गॅलरीला चिकटून असलेल्या घरात राहत होता. म्हणजे हे प्रकरण धोकादायक आहे. हळूहळू भानावर येत चालल्यावर मनाची इशारे देणारी यंत्रणा काम करू लागली. पण म्हणतात ना, मन वढाय वढाय तसं आत्ता झालेल्या प्रकाराने मनाचा ताबा असा घेतला होता कि झटकून टाकायचा प्रयत्न केला कि ते पुन्हा पुन्हा त्याच पिकावर आलेल्या पाखरासारखं उडत होतं.

अशा वेळी मनाला वेगळा चाळा दिला पाहीजे. एकदा का नवीन चाळा मिळाला कि हे विसरले जाईल. ती काही नवतरूणी नव्हती बाव्रून जायला. जगाचा अनुभव होता. बर्‍या वाईटाची समज होती. मग तिने फेसबुक उघडलं. तर त्याच तरूणाने तिला लिमिटेड ऑडीयन्स करून सेटींग्ज ठेवून टॅग केलेलं. टॅग पोस्टमधे त्या तरूणाचा हसरा फोटो होता आणि यश हवंय तर क्लिक करा असा ग्राफिकल मेसेज पण होता. तिने त्या फोटो मेसेज वर क्लिक केलं तर....

ती एका पेजवर गेली. तिथे लिहीले होते
त्या डेटला जायचेय ? प्रतिसाद मिळत नाहीत ?
टींडर वर यश मिळण्यासाठी फोटो कुठल्या प्रकारे अपलोड करावेत , माहिती काय भरावी याच्या क्रॅश कोर्स साठी भेटा किंवा खाली दिलेल्या फोन क्रमांकावर फोन करा.
रू. ४४००० च्या रेग्युलर कोर्सचे सर्व फायदे या क्रॅश कोर्स मधे. आणि फीस ?
विश्वास ठेवा. फक्त रू ३८५/-
थोड्याच जागा शिल्लक. त्वरा करा...

हा मेसेज तिने वाचला मात्र...

Oh my my!! प्रतिसाद मध्येच कथा लिहून झालीय.पण ह्या वळणावर या रस्त्यावर जिथे आजकाल सगळे जाण्याचा प्रयत्न करताय तिथे नको माझ्या नायिकेला न्यायला. आजूबाजूला जरा डोळे उघडुन दोघांनी बघितले तर त्यांना ही काही वेळाने जाणवेल, जे आपल आहे तेच अवीट आणि आनंद देणारं आहे.बाकी सगळी गुंतागुंत.

तर आक्षेप समजू शकलो असतो.
>>>

छे आक्षेप कुठेय
मला तर आवडले कथेच्या नायकाचे वर्णन माझ्याशी मिळतेजुळते असल्याचे. त्याने कथेशी आणखी छान रिलेट होता येते. म्हणून तर म्हटले लिहीत राहा.. वाचतोय Happy

सर, इतके खुश नका होऊ, कुरळे केस, चेक्सचा शर्ट आणि कार्गो हे जगातल्या दीड करोड लोकांना लागू होणार वर्णन आहे

हा आता त्यातल्या बियरच्या कॅन मुळे तुम्हल ते जास्त आपलेसे वाटत असेल तर मग ठीक आहे

हा मेसेज तिने वाचला मात्र...

तिने डोळे मिटून घेतले आणि मनाशीच विचार करू लागली
कशाला पाहिजे आपल्याला ही गुंतागुंत, जे आपल आहे तेच अवीट आणि आनंद देणारं आहे
आणि तिने फोन घेतला आणि सगळे मेसेज डिलीट करून टाकले
स्वयंपाक घरात गेली, त्याच्या आवडीचा स्वयंपाक केला, मग ओटा आवरून, भांडी साफ केली, केर फारशी केली, पडदे बदलले, उश्यांचे आणि बेड कव्हर बदलली
दरवळत राहणारे मंद सुगंधित अत्तर लावले आणि त्याला आवडेल अशी शिफॉन ची साडी नेसून, केसात गुलाब माळून ती त्याची वाट बघू लागली आणि तोच त्याचा मेसेज आला

येताना ग्लेनलिव्हेत आणू का अडेंबर्ग विचारणारा

सर, इतके खुश नका होऊ, कुरळे केस, चेक्सचा शर्ट आणि कार्गो हे जगातल्या दीड करोड लोकांना लागू होणार वर्णन आहे
>>>

छे हो माझे केस कुरळे नाहीत. पण पुढे स्वभावाचे वर्णन नेमके केले आहे. लिहा तुम्ही वाचतोय. बरेली की बर्फीसारखा योगायोग आहे हा..

आता कथेत एन्ट्री घ्यायची की काय सरांना?
>>>

हो पण पाहुणा कलाकार म्हणून.. जसे शाहरूख हल्ली बरेच चित्रपटात करतो आणि छाप सोडून जातो

पुढे स्वभावाचे वर्णन नेमके केले आहे>>> कोणाच्या?? मी कोणाच्याच स्वभावाचे वर्णन केले नाहीये
सर, काढे पण चढतात काय तुम्हाला?

शुभ की कसली तरी प्रभातः तो घोरत पडला आहे आणि ती कुढुन झाल्यावर डोळे पुसुन चहा बनवत आहे. अश्यावेळी टॄण्ङ तॄण्ङ. बेल वाजते व चंपा मोलकरीण धस्सक न आत येते. बारा मिनिटात भांडी व लादी केर करते. एक कटाक्ष टाकून गूढ हसून जाते. घरची एक किल्ली तिच्याकडे आहे.

तिला गंमत वाटली आणि कुतूहलही आणि तिला आठवलं बरेच दिवसात आपल्या कपाटात स्कॉच पडून आहे तिला हातच लावला नाही. आज मस्त वातावरण आहे तर रात्री थोडी घ्यावी आता असा विचार करत ती अजूनच निरखून त्याच्याकडे बघायला लागली आणि कुठल्या अज्ञात प्रेरणेने माहिती नाही पण त्या तरुणाने दुकाने सोडून थेट तिच्या गॅलरीकडे पाहिले आणि त्याचा चेहरा आणि ते रोखून पाहणारे डोळे बघताच ती दचकली

आता पुढे....

Submitted by आशुचँप on 7 January, 2023 - 20:03

>>>>>>>

यापुढे मी थोडीफार addition केली, तर चालेल का?

मी कोणाच्याच स्वभावाचे वर्णन केले नाहीये
सर, काढे पण चढतात काय तुम्हाला?
>>>>

अहो केलेय की..

-----
कसलीच घाई नसल्यासारखा तो रेंगाळत फुटपाथवरून सगळ्या जाहिराती, पोस्टर, दुकानांच्या पाट्या वाचत चालला होता. एका हातात एक बियरचा कॅन घेऊन त्याचे एकेक घुटके घेत एकेक अक्षर समजावून मनन करत जावं इतका वेळ तो थांबत होता.
---

मी सेम असाच आहे.
फक्त बीअर कॅन ऐवजी ताकाची बाटली वा शहाळे येते ईतकेच.

कसलीच घाई नसल्यासारखा तो रेंगाळत फुटपाथवरून सगळ्या जाहिराती, पोस्टर, दुकानांच्या पाट्या वाचत चालला होता. एका हातात एक बियरचा कॅन घेऊन त्याचे एकेक घुटके घेत एकेक अक्षर समजावून मनन करत जावं इतका वेळ तो थांबत होता.>>>
याला तुम्ही 'स्वभाव' म्हणता होय?
नई मग तुमचंच बरोबर आहे Happy

तिला गंमत वाटली आणि कुतूहलही आणि तिला आठवलं बरेच दिवसात आपल्या कपाटात स्कॉच पडून आहे तिला हातच लावला नाही. आज मस्त वातावरण आहे तर रात्री थोडी घ्यावी आता असा विचार करत ती अजूनच निरखून त्याच्याकडे बघायला लागली आणि कुठल्या अज्ञात प्रेरणेने माहिती नाही पण त्या तरुणाने दुकाने सोडून थेट तिच्या गॅलरीकडे पाहिले आणि त्याचा चेहरा आणि ते रोखून पाहणारे डोळे बघताच ती दचकली

आता पुढे....

Submitted by आशुचँप on 7 January, 2023 - 20:03

>>>>>>>

इथून पुढे

त्याचा चेहरा आणि डोळे पाहताच ती दचकली.
त्या डोळ्यांमध्ये एक अजब नशा होती, कुतुहुल होती.
त्याने एक स्माईल दिली, तशीच ती आत पळाली.
आता दररोज हे व्हायला लागला.
एकदा त्याने नजरेनेच तिला इशारा केला.
तिची प्रचंड घालमेल झाली.
एव्हाना तिला आता सवय झाली होती...
एके दिवशी मनाचा ठिय्या करून ती खाली उतरली व त्याच्याजवळ गेली.
दुरून त्याच्या अजब नशा असलेल्या डोळ्यात आता गरदुल्याची झाक होती. वाढलेले केस, सुजलेला चेहरा, आणि वासनेने भरलेले डोळे.
ती त्याचे डोळे बघूनच भेदरली. तिने मागच्या पावली परतण्याचा निर्णय घेतला.
"ओ मॅडम, थांबा...बिअर दारू नाय काय, ही बघा, नॉन अल्कोहोल बियर. आपण दारुड्याना कस्पट समजतो. आपण घेतो फक्त विमल..." त्याचे बोबडे बोल कशामुळे हे तिला आता कळलं.
"नाही, मला जायला हवं. ती तडक मागे वळली."
"बरं, किती घेणार..." त्याने विचारले.
"काय?"
"किती घेणार, तू बघते माझ्याकडे माहितीये... किती घेणार तासाचे."
तिला स्वतचीच लाज वाटली.
"मॅडम, लई शौकीन आहे मी, आंबटशौकीन म्हणा ना, सांगा किती घेणार...?"
ती एवढं ऐकूनच धावत सुटली.
घरात आल्या आल्या तिने कडी लावली...
तिची छाती अजूनही वरखाली होत होती.
शी... तिला स्वतःचीच किळस आली.
तिला आजवर नवऱ्याबरोबर घालवलेले प्रत्येक हळूवार क्षण आठवले.
रात्री तो घरी आला.
आल्या आल्या तिने त्याला मिठीच मारली.
"आय लव यू, खूप खूप" ती म्हणाली.
तोही तिच्या केसांत हात फिरवत राहिला.
"ऐक ना, मी सुट्टी टाकलीय, पूर्ण महिनाभर. जाऊयात युरोपला. "
ती त्याच्याकडे बघतच राहिली.
आणि पुढच्याच क्षणी तिला उचलून तो बेडरूमकडे निघाला.

समाप्त...

कसलीच घाई नसल्यासारखा तो रेंगाळत फुटपाथवरून सगळ्या जाहिराती, पोस्टर, दुकानांच्या पाट्या वाचत चालला होता. एका हातात एक बियरचा कॅन घेऊन त्याचे एकेक घुटके घेत एकेक अक्षर समजावून मनन करत जावं इतका वेळ तो थांबत होता.>>>

याला तुम्ही 'स्वभाव' म्हणता होय?

>>>

स्वभाव म्हणा किंवा सवय म्हणा किंवा आदत से मजबूर म्हणा.... पण हे माझे आयुष्यात करून झालेय. असेच दादरच्या गल्ल्यात फिरून झालेय. आणि आता हे मुद्दाम बोलायचे म्हणून बोलत नाहीये. तर हे मायबोलीवर या आधी या धाग्यात लिहूनही झालेय Happy

https://www.maayboli.com/node/82403

त्यामुळे मला ते वर्णन ऐकून मीच आठवले असल्यास नवल नाही.

आणि पुढच्याच क्षणी तिला उचलून तो बेडरूमकडे निघाला.

समाप्त... >>> पुढे..

जेव्हां क्लान्त शरीराने बंड केले आणि अर्धोन्मिलित डोळ्यांनी तिने अंदाज घेतला तेव्हां तिची निद्रा भंग पावली. तेच ते रूटीन, तेच छत, त्याच पोफडे उडालेल्या भिंती आणि तेच उशीरपर्यंत नवर्याचं न येणं...
उदासवाणं होत ती तिच्या स्वप्नाला हसली.

स्वभाव म्हणा किंवा सवय म्हणा किंवा आदत से मजबूर म्हणा...>>> या तिन्ही गोष्टी एकच आहेत असं म्हणायचं आहे का?

नई मग खरोखरच तुमचंच बरोबर आहे Happy

सर तुम्ही खरे तर मराठीचे प्राध्यापक व्हायला हवं होतं

Pages