मित्रहो गेल्या काही वर्षांपासून तुम्ही एक गोष्ट वाचली , पाहिली असेल की भारतातून बरेचसे लोक अमेरिका , ब्रिटन , ऑस्ट्रेलिया या आणि अशाच भारताच्या तुलनेत श्रीमंत किंवा अधिक चांगल्या सुविधा असणार्या देशांमधे स्थलांतरीत होत आहेत. ही संख्या कमी न होता दरवर्षी वाढतच आहे. शक्यतो या देशांमधे कायमचं कसं राहता येईल यासाठी केली जाणारी धडपड लक्षणीय आहे.
हे लोक परदेशात जात आहेत त्यामागे नक्की कारणे काय आहेत? या लोकांना भारत इतका नकोसा का झालाय? भारतात संधी मिळत नाही म्हणून हे लोक जात आहेत का? हे असेच ब्रेनड्रेन चालू राहिले तर आधीच बनाना कंट्री असलेल्या आपल्याच देशाची अवस्था अजून बिघडणार नाही का? गोर्यांच्या या देशांमधे भ्रष्टाचार कमी असेल तर तो कमी का आहे? केवळ लोकसंख्या कमी आहे म्हणून या गोर्या लोकांच्या देशात समस्या कमी आहेत का?
अजून एक म्हणजे म्हातारपणी भारतात रहायला यावं अशीही एक बाजू आहे. हातीपायी हिंडता येतं तोवर अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया सारखे समृद्ध देश आणि शरीर थकू लागलं की भारत गाठायचा. हा प्रकार म्हणजे "खोबरं तिकडं चांगभलं" असा नाही का?
बुद्धिमान लोकांना अमेरिकेत किंवा तत्सम देशांमधे भरपूर संधी आहेत हे तर सगळ्यांनाच मान्य आहे. पण कधीतरी अमेरिकेच्या दुसर्या बाजूवर देखील चर्चा व्हायला हवी. विशेषत: भारताबद्दल बोलताना भारतात 'काय नाही' याची चर्चा बरीच होते पण अमेरिकेत काय नाही किंवा भारत आणि अमेरिका यांची तुलना करता अमेरिका भारताच्या तुलनेत कुठे कमी पडते याची चर्चा फारशी होत नाही. ती व्हावी हा या लेखाचा दुसरा उद्देश आहे. अमेरिकेतल्या भारतीयांबाबत वर्णद्वेषाचं प्रमाण वाढतंय का?
पाश्चात्य लोक आपल्या पॅशनला खूप महत्व देतात हे खरं आहे का? ज्या छंदाचा पैसे मिळवायला फारसा उपयोग नाही असे छंदीफंदी जीवन जगण्यासाठी लागणारा पैसा हे पाश्चात्य लोक आणतात कुठून? अमेरिका किंवा तत्सम देशांमधे कर्जे काय पाहून दिली जातात?
मला परदेशाचा प्रत्यक्ष अनुभव नाही. केवळ , वाचन , ऐकीव , इंटरनेट , टिव्ही यातून समजलं तितकंच. त्यामुळे या देशांमधे दीर्घकाळ राहणार्या , कामानिमित्त काही काळ राहिलेल्या लोकांकडून प्रतिसादाच्या अपेक्षेत. _/\_
अमेरिकन भारतीय भारतीय
अमेरिकन भारतीय भारतीय लोकांकडे बघतात
वर्णद्वेषी पानाचा तो एक प्रकार आहे.
>>>>>अहो, वर्णद्वेष आणि जातीद्वेष या अतिशय गंभीर गोष्टी आहेत. आपला मुद्दा(?) रेटण्यासाठी वापरू नका. अशा गोष्टी तथ्य व आस्था असतानाच वापराव्यात. कारण जेव्हा खरोखरचं अशा घटना घडतात, हे शब्द गुळगुळीत होवून बहुतांश लोक डिनायलमधे गेलेले असतात व उरलेल्यांसाठी याची प्रशक्ती येऊन धार बोथट झालेली असते. अमेरिकन भारतीय व भारतातले भारतीय एकाच वंशाचे आहेत !!!
---------
सर्वांना थँक्स.
वीरु
Home delivery apps work
Home delivery apps work better here
.
इज्जत देणं म्हणजे काय
इज्जत देणं म्हणजे काय अपेक्षित आहे? इज्जत देत नाहीत म्हणजे नेमकं काय करतात? >>> फेफ
हो मलाही हा प्रश्न आहे. तसे अमेरिकेत कोणीच कोणाला इज्जत देत नाहीत म्हणता येईल किंवा सगळेच सर्वांना देतात असेही. कारण अपवाद वगळता सगळे सारखेच. आणि भारतात काय अशी वेगळी इज्जत देतात?
अस्मिता. - छान लिहीले आहे.
बाकी मी वरती ऑलरेडी लिहीलेच आहे की लोक करीयर करता बहुतांश येतात. कोणी आपण देश सोडून जाउ वगैरे म्हणत येत नाही. किंबहुना ८०% लोक दोन तीन वर्षे इथे राहू, पैसे कमावू, नवा देश पाहू आणि परत जाऊ असे म्हणत आले पूर्वी, आणि नंतर इथेच राहिले. एकदा कोठेही सेटल झाल्यानंतर सगळे बदलून दुसरीकडे जाउन सेटल होण्याकरता तशी काहीतरी तीव्र इच्छा लागते. बहुसंख्य लोक ती स्टेप घ्यायला कचरतात किंवा इतका मोठा बदल नको असतो. मग भ्रष्टाचार, आरक्षण ई. कारणे स्वतःला देऊन रॅशनलाइज करतात. कोणाच्याही वैयक्तिक निर्णयात ही कारणे "मूव्हिंग द नीडल" स्वरूपाची असतील असे वाटत नाही. काही अपवाद असतीलही.
जनरल मध्ये 'मला अमुक देश/अमुक
जनरल मध्ये 'मला अमुक देश/अमुक शहर आवडतं, मी तिथे नोकरी बघून सेटल होणार' असा विचार करण्यातही पाप नसावं.नोकरी सोडून परदेशात गेला काय न गेला काय, सद्य नोकरीतून व्यवस्थित टर्म्स ने सोडणं, फसवणूक न करणं, एथिकल चोरी न करणं महत्वाचं.
गोवा किंवा मुन्नार ला नोकरी(चांगली) शोधून कुटुंबासह तिथेच सेटल व्हायचंय.
अस्मिता खूप मुद्देसूद पोस्ट.
अस्मिता खूप मुद्देसूद पोस्ट.
अगदी देशद्रोही च ठरवतात बाहेर गेलेल्यांना काही लोक आणि मनात मांडे ही खात असतात काही काही उगाच.
स्वच्छता आणि सेफ्टी हे कळीचे मुद्दे आहेत ज्यांना भारतात फारसं महत्वं दिलं जात नाही. असो.
सरांना आपला दिलाय किबोर्ड तर बडवा रात्रंदिवस असं झालंय!
नशीब १ च सर आहेत झेलायला अजून तरी.
अस्मिता. - संपूर्ण पोस्ट आणि
अस्मिता. - संपूर्ण पोस्ट आणि मांडलेले विचार आवडले.
खरे तर दुहेरी नागरिकत्व
खरे तर दुहेरी नागरिकत्व भारताने बंद केले पाहिजे.
हा जालीम उपाय योग्य तो बदल घडवून आणेल
Submitted by Hemant 33 on 13 January, 2023 - 0//
हा मुद्दा योग्य वाटतो. यावरून हेमंत सरांना इतकं ट्रोल का केलं कळत नाही.
भारत दुहेरी नागरिकत्व देत नाही पण OCI कार्ड हे जवळपास तसंच आहे. OCI धारक व्यक्तीला फक्त काही मर्यादा आहेत- जसं मतदान करता येत नाही, निवडणूक लढवता येत नाही, शेतजमीन घेता येत नाही, सरकारी नोकरी करता येत नाही. पण बहुसंख्य ओपन वर्गातील मध्यमवर्गीय लोकांना सरकारी नोकरी किंवा आमदारकी- खासदारकी किंवा खाजगी मालकीची शेती वगैरे तसंही अप्राप्यच असतं त्यामुळे या मर्यादा असल्याने फरक पडत नाही. पण कधीही मनात आल्यास भारतात जाऊन परत सेटल होता येतं, राहायला घर घेता येतं,खाजगी व्यवसाय वा नोकरी करता येते.
हे असल्यामुळे मग परदेशी नागरिकत्व व भारतात हक्काचं OCI असे पर्याय सहज स्वीकारले जातात.
जर भारताने हे धोरण बंद केलं- एकदा तुम्ही परदेशी पासपोर्ट घेतलात तर भारतावरचा हक्क सोडा- अशी भूमिका घेतली तर लोक परदेशी नागरिकत्व घेताना नक्किच जास्त विचार करतील किंवा त्यांना दुहेरी फायदे घेता येणार नाहीत. पण हा सरकारी लेव्हलवरचा पॉलिसी डिसीजन आहे.
एक ओळखीचं अमेरिकन सिटीझन ज्येष्ठ नागरिक जोडपं कायमचं पुण्याला निघून गेलं आहे कारण तिकडे म्हातारपणी सेवा करायला स्वस्तात पगारी नोकर , स्वयंपाकाच्या मावशी, वरकामाची ताई, एका फोनवर येऊन शहरभर फिरवणारा रिक्षावाला, वेळ पडल्यास वॉर्डबॉय/नर्स मिळतात. अमेरिकेत ही सोय खर्चिक आहे व मुलगा सून काही जबाबदारी घेणार नाहीत.
दोन्ही दगडावर पाय ठेवण अयोग्य
दोन्ही दगडावर पाय ठेवण अयोग्य च आहे.
एक तर इथे रहा, किंवा परदेशी.
तेथील नागरिकत्व घेतले की भरतावरचा पूर्ण हक्क सोडा.
गरज पडेल तसेल भारतीय ,किंवा अमेरिकेनं बनू नका.
उद्योग दुसऱ्याच देशात करायचे ,टॅक्स चोरी करण्यासाठी राहायचे तिसऱ्याच देशात.
फक्त स्वा फायदा देश ,राज्य ह्यांच्या शी काही देणेघेणे नाही.
जिथे स्वार्थ साधला जाईल t. तो देश ह्यांचं
ही वृत्ती नष्ट करण्यासाठी.
भारताने च नाही तर सर्व देशांनी .
असे दुहेरी फायदे देणारे कायदे नष्ट केले पाहिजेत
भारतात परतून आलेले तरूण किंवा
भारतात परतून आलेले तरूण किंवा वयस्कर लोक भारताची ईकॉनॉमी बूस्ट करत नाहीत का?
परत येऊन शिस्तीत राहत असले तर कोणाला काय प्रॉब्लेम आहे?
हे म्हणजे बाहेर गावी गेलात तर तिथे तुम्हाला एक्स्पॅट म्हणून मर्यादित च हक्क मिळणार सोयी सवलती नागरिकांना मिळणार (हे मान्य) आणि घरी परत आलात तर आता तुम्ही त्या घरचे. जा तिकडेच परत असे धोबीका कुत्ता टाईप स्टेटमेंट आहे.
दहा वीस वर्ष जे भारतात येत
भारतात कर्ज घ्यायचं लंडन मध्ये पळायचे.
लंडन मध्ये टॅक्स चुकवण्यासाठी दुंबई मध्ये जावून राहायचं.
दुबई मध्ये कारवाई होईल असे वाटले की भारतात येवून भारता च नागरिक आहे हा दावा करायचा
ह्या मागे जी वृत्ती असते .
हे एक उदाहरण दिले.
ही स्वार्थी वृती मोडून काढण्यासाठी .
एक उपाय सांगितला आहे
भारतात कर्ज घ्यायचं लंडन
भारतात कर्ज घ्यायचं लंडन मध्ये पळायचे.
लंडन मध्ये टॅक्स चुकवण्यासाठी दुंबई मध्ये जावून राहायचं.
दुबई मध्ये कारवाई होईल असे वाटले की भारतात येवून भारता च नागरिक आहे हा दावा करायचा >>
हे सरसकट सगळया परदेशस्थ भारतीय यांना लागू होईल का? आपण हया विषयातले तज्ज्ञ दिसता म्हणून विचारतो.
एक उदाहरण दिले आहे.
एक उदाहरण दिले आहे.
अशी वृत्ती असणाऱ्या लोकांची जी मानसिकता असते ते सांगायचे आहे.
कर्ज च घेतली जातील असे नाही.
बाकी अनेक प्रकारे स्वार्थ साधण्यासाठी अनेक देशांना फसवले जावू शकत
Whitehat
Whitehat
ह्यांनी वर लीहालेच आहे.
भारतात शिक्षण घ्यायचे विदेशी जायचे.
तिकडे आपल्या बुध्दीची. जास्त किंमत मिळते भारतात मिळत नाही त्या पेक्षा .
कौशल्य जास्त असते असे नाही.
त्याचा फायदा उचलत राहायचे.
तेव्हा भारत हा आपला देश च नाही असे वागायचे.
वय झाले की .
सेवा करायला माणसं लागतात .
ती तिथे परवडत नाहीत .
तासावर डॉलर मध्ये द्यावे लागतात. मग भारताची आठवण येते .
मग इथे येवून मी भारतीय आहे मला इथे राहू ध्या ही अपेक्षा ठेवायची .
आणि भारतात असणारे स्वस्त मजूर,सेवा ह्यांचं फायदा घायचा.
ह्यांचे समर्थन मी तरी करणार नाहीं
त्यांस भारतीय नागरिक बिलकुल समजण्याचे काहीच कारण नाही
टुरिस्ट व्हिसा घेवून दहा पंधरा दिवस येवू शकतात
सरसकट माझे सर्व विदेशात
सरसकट माझे सर्व विदेशात राहणाऱ्या भारतीय लोक विषयी हे मत नाही.
आयुष्भर कधी मराठी न बोलणारे ,मराठी आहोत हे न दाखवणे लाज वाटते म्हणून
पण जेव्हा ह्यांची कोणी गैर मराठी चांगलीच फसवणूक करतो.
तेव्हा victim कार्ड खेळून मी कशी मराठी आहे माझ्या वर कसा अन्याय झाला असे रडगाणे गायचे.
आणि जन्म जात मराठी असण्याचा फायदा उचलत राही चे.
मुस्लिम पोरांबरोबर पळून जायचे .हिंदू धर्मावर टीका करायची.
आणि त्याने फसवले की मी कशी हिंदू आहे असे रडगणे गायचे.
ह्या वृत्तीची लोक.
त्या प्रमाणेच.
विदेशात गेल्यावर भारत,bhartiy ह्यांचं द्वेष करायचा.
आणि फायदा दिसला की मी कसा भारतीय आहे हे सिद्ध करायचा प्रयत्न करायचा
अशा सर्व वृत्तीच्या लोकांना सहनभुती का दाखवा
NRE/NRO खाती बंद करून टाका,
NRE/NRO खाती बंद करून टाका, एफडीआय मधून भारतात आलेले कोट्यवधी डॉलर अर्थव्यवस्थेतून बाहेर काढा, फॉरेन रेमिटंस बंद करा आणि oci पण बंद करा. व्हिसा तरी कशाला ठेवताय?
दोन दिवसात सगळे डॉलर संपतील. मग उरलेले दोन दिवस स्वदेशी च्या पोस्ट फॉरवर्ड करा. मग रशियाच्या कच्छपी लागा. पण ते पण विदेशी आणि गोरेच की. मग या बिलियन लोकांना कसं जगवणार?
भारतात जे पैसे पाठवतात,भारतात
भारतात जे पैसे पाठवतात,भारतात ज्यांचे आर्थिक,सामाजिक संबंध आहेत, भारतात जे वरचेवर visit करतात.
ते भारतीय च आहेत ..जे
तिथे दहा वीस वर्ष गेल्यावर नोकरी गेली,तेथील वास्तव्य दहा वीस वर्षं नी वाढवणे शक्य नाही .म्हणून भारतात येणारे किंवा.
बाकी आर्थिक फायद्या साठी खूप वर्षांनी येथे येणारे.
म्हातारपणी येथे येणारे
ह्या सर्वांची
NRE/NRO खाती खरेच बंद केली पाहिजेत.
आणि त्यानं विदेशी नागरिक च समजले पाहिजे
बिहारी लोक पण हेच म्हणतात .
.
बिहारी लोक पण हेच म्हणतात .
.
विदेशात गेल्यावर भारत,bhartiy
विदेशात गेल्यावर भारत,bhartiy ह्यांचं द्वेष करायचा.
आणि फायदा दिसला की मी कसा भारतीय आहे हे सिद्ध करायचा प्रयत्न करायचा
अशा सर्व वृत्तीच्या लोकांना सहनभुती का दाखवा > अशा किती लोकांना तुम्ही ओळखता.
भारतात जे पैसे पाठवतात,भारतात ज्यांचे आर्थिक,सामाजिक संबंध आहेत, भारतात जे वरचेवर visit करतात.
ते भारतीय च आहेत .. >> चला इतकं तरी तुम्ही मान्य केलं. आता पुन्हा यु टर्न मारू नका.
NRE/NRO खाती बंद करून टाका,
NRE/NRO खाती बंद करून टाका, एफडीआय मधून भारतात आलेले कोट्यवधी डॉलर अर्थव्यवस्थेतून बाहेर काढा, फॉरेन रेमिटंस बंद करा आणि oci पण बंद करा. व्हिसा तरी कशाला ठेवताय?//
रोचक मुद्दे आहेत. भारतात येणारे remittance सर्वात जास्त आखाती देशातून येतात. तिथे नागरिकत्व मिळतच नाही, ते भारतीय नागरिकच असतात. दुसरा मोठा देश अमेरिका. तिथेही व्हिसा, ग्रीनकार्ड धारक भारतीय नागरिक मोठ्या प्रमाणात असतात. दुहेरी नागरिकत्व बंद करण्याचा या गटावर काही परिणाम होणार नाही. बाकीचे परकीय चलनाचे सोर्सेस- निर्यात, FDI - हे इकॉनॉमीच्या मेरिटवर अवलंबून आहेत. जर इकॉनॉमी promising असेल तर एखादा गोरा जॉन किंवा ब्रायन भारतात invest करणार- तो भारतीय वंशाचा नसला तरी. आणि इकॉनॉमी ठीक नसेल तर राजू किंवा अनिल टाईप कोणी काका देशप्रेमापोटी एक पैसाही देणार नाहीत!
अस्मिता, प्रतिसाद आवडला.
अस्मिता, प्रतिसाद आवडला.
“ हे इकॉनॉमीच्या मेरिटवर
“ हे इकॉनॉमीच्या मेरिटवर अवलंबून आहेत” - इति श्री रेवाखंडे, स्कंदपुराणे, ‘गोर्यांच्या देशात‘ नामे धागा समाप्तः! श्रीगुरूदेवचरणार्पणमस्तु!
भारतात पैसा मजबूत मिळतो...
भारतात पैसा मजबूत मिळतो... मात्र डिसिप्लिन आणि रिस्पेक्ट नाहीय...
टॅक्स चुकविणारे सगळीकडे आहेत.
टॅक्स चुकविणारे सगळीकडे आहेत. देश न सोडताही हजारो कोटींचा टॅक्स चुकविता येतो. श्रीमंतांची कर्जे बँका माफ करतात ( write off, waived off या बद्दल माहिती घ्या आणि लोकसभेमधले अर्थमंत्री यांचे वक्तव्य आणि त्यामधे दिलेले आकडेवारी बघा).
NRO/ NRI खाते नको असे सरसकट म्हणता येत नाही. NRO/ NRI यांच्या मुळे देशाला मिळणारा पैसा महत्वाचा आणि गरजेचा आहे. २०२२ मधे १०० बिलीयन USD आलेत (GDP च्या ३ %) हे प्रमाण जगांट सर्वांत जास्त (चीन , फिलीपिन्स, मेक्सिको सर्वांना मागे टाकतो) आहे. भारतांत पैसे पाठविणारे हे त्यांच्या कुटुंबांना मदतीसाठी पाठवित असतात पण त्याने देशातील जनतेला अप्रत्यक्षपणे फायदाच होतो ना?
NRI व्यक्ती भारतात आल्यावर पैसे खर्च करतील, उतार वयांत परत आल्यावर काही जादा सेवा घेतील पण त्याने काहींना रोजगार मिळेल ना?
आता उद्या आखातांत काही गडबड झाली तर विमानाने भारत सरकारला आपल्या नागरिकांना आणावे लागेल. वेळोवेळी (आखाती कुवैत युद्ध , युक्रेन, अफगाणीस्तान... ) सरकारने अशी मदत केलेली आहे आणि पुढेही करात राहिल. तिकीटाचे पैसे नंतर वसुल होतील पण वेळेवर मदत करण्याचा प्रयत्न होणे महत्वाचे आहे. दोघांनाही एकमेकांची गरज आहे.
भारतीय चलनात होईल तेवढं
भारतीय चलनात होईल तेवढं परदेशी व्यापार ही आयडिया प्राथमिक स्तरावर आहेच.
Usd वर अवलंबून राहणे हळू हळू कमी करणे.
ह्याची सुरुवात तर झाली आहे.
देशाचे दुसऱ्या देशावरील अवलंबता कमी करणे हा विचार जोर धरत आहे.
सर्व प्रकारचे उत्पादन देशात च होणे,अन्न धान्य स्वयंभू होणे ,
तंत्र ज्ञान मध्ये स्वयं पूर्ण होणे हे मार्ग देशाला आता दिसत आहेत.
फक्त भ्रष्टाचार मुक्त भारत,
व्यापारी सरकार ही युती होवू न देणे.
प्रशासन आणि चोर ह्यांची युती होवू न देणे.
उत्तम कायदा सुव्यवस्था.
सरळ कायदे गुंतागुंतीचे कायदे कचऱ्यात काढणे.
अनेक जुने कायदे रद्द करून आज च्य परिस्थती शी योग्य असणारे कायदे .
धर्म जात, घरात रस्त्यावर आणि व्यवस्थेत नाही.
अशा काही सुधारणा केल्या तर मला नाही वाटत .
भारत उत्तम ,समृद्धी असणारा देश होण्या मध्ये काही अडचण येईल .
दुसऱ्या गावात,दुसऱ्या तालुक्यात,दुसऱ्या जिल्ह्यात,दुसऱ्या राज्यात,दुसऱ्या देशात प्राथमिक गरजा भागविण्यासाठी जावे लागत असेल तर त्या सारखे अपमान स्पद कही नाही.
गावा पासून विकास ..
पूर्व देश विकसित .
फक्त काही शहर आणि राज्य नव्हेत.
हेच ध्येय असावे.
सरकार ची कमजोरी,फासलेले शहरीकरण, ह्या गोष्टी वर टीका होवू नये .
म्हणून स्थलांतर कसे गौरव स्पद आहे .
अशा प्रकारचे विचार पसरवले जातात.
आणि लोकांचा बुद्धी भेद केला जातो.
हे प्रकार बंद करावेत
इंग्लंड आयर्लंड इ. देशांकडे
इंग्लंड आयर्लंड इ. देशांकडे पाहिले तर तिथल्या लोकांनी सोळाव्या शतकापासूनच अमेरिकेत, अफ्रिकेत, आशियात नि ऑस्ट्रेलियात जायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांच्या देशांत त्यांची लोकसंख्या मर्यादित राहिली. भारतीयांनी कधीच इतरदेशी जाण्याचा विचारहि केला नाही.
उलट स्वतःच्याच देशात राहून लाचलुचपत, कायदे न पाळणे, जाऊ तेथे घाण करू, आपापसात भांडणे नि त्यात परकीयांची मदत घेणे, या वृत्तीने देशाचे वाट्टोळे करू घातले आहे. नावे ठेवू नका म्हणायचे पण सुधारणा नाही.
नि त्याचे खापर परदेशी गेलेल्या लोकांवर फोडताहेत.
स्वतः काहीहि न करता उगाच कारणे शोधून दुसर्याला दोष द्यायचा. दुसर्याने काहीतरी करावे, मी नाही!!! छान!!
आता तर भारतात भरपूर पैसा झाला आहे, मग का रडता? आपली वृत्ति सुधारा, मानपान, इज्जत यांच्या खोट्या समजुती सोडा नि पडेल ते काम करायची सवय ठेवा.
नशीब भारतात अजूनहि भरपूर लोक आहेत, त्यातले थोडे का होइना, चांगले काम करून भारताची प्रगति करताहेत.
Pages