*सकाळ*
शुभ सकाळ, good morning अस संबोधून एकंदरीत दिवसाची सुरुवात होते....
सकाळी सकाळी चांगली बातमी मिळाली किंवा काही चांगलं घडलं असेल तर ते शुभ मानण्यात येते.
सकाळ, सुबह, morning ह्या सर्वांचा अर्थ एकच पण सकाळ सकाळ मधे पण फरक असतो.
गरिबाघरची सकाळ वेगळी तर श्रीमंताघरची न्यारी. मुंबईची निराळी तर पुण्याची वेगळी. शहरांमधील वेगळी तर गावांमधील निराळी. समुद्रकिनारील वेगळी तर नदीकिनारील न्यारी. जंगलातील त्याहून निराळी. सकाळ सर्वत्र एकच पण माहोल निरनिराळा.
सकाळची प्रसन्न वेळ, बऱ्यापैकी सर्वत्र शांतता, देवालयातील घंटानाद, आरतीचा, काकडआरतीचा मनाला भावणारा आवाज, गावाखेड्यात गोठ्यातील गायी म्हशींचे हंबरणे,
पक्षांचा चिवचिवाट, सर्वांची आपापली लगबग, असाच काहीसा असतो सकाळचा scene.
सकाळ एकच पण तुमची आमची प्रत्येकाची same नसते.
गरीबांना सकाळ उजाडताच दिवसाची चिंता असते, रोजगाराची चिंता असते, त्यांच्यासाठी मॉर्निंग वॉक प्रकार नसतो, bed tea प्रकार नसतो, वर्तमान पत्र चाळण नसत तर वर्तमान कसा ढकलायचा ह्याची चिंता असते. तो भूतकाळात जात नाही वा भविष्याबद्धल काही त्याच्या डोक्यात नसत, त्याच्या डोळ्यासमोर फक्त वर्तमान असतो.
श्रीमंताघरची सकाळ हट कर असते. रोजगाराची चिंता नसते, आरामात उठतात, bed tea, वर्तमान पत्र चाळणे, जमल्यास morning walk / gym, नाश्ता नव्हे breakfast, juice & then their routine begins. Problems सर्वांनाच असतात, ह्यांचे problems काहीसे निराळे, at times they invite problems, creat problems. पुष्कळदा उंचे लोगों के ऊंचे problem असतात. Sometimes some of the problems do not allow them to sleep, मग अशांची सकाळ encouraging नसते.
मध्यमवर्गीयांची सकाळ सदा धावपळीची असते, हा प्राणी मधला असतो जो सतत भरडला जातो status maintain करण्यामागे. मध्यमवर्गीय weekend ची आतुरतेने वाट बघत असतो.
मुंबईची सकाळ ? मुळातच ती झोपत नाही, रात्री / पहाटे एक दोन तासा करता फक्त विसावते. त्यामुळे मुंबईकरांची सकाळ वेगळीच असते. तारीख बदलते म्हणुन त्यास त्या तारखेची सकाळ म्हणावी लागेल. सतत भागदौड़, श्वास घ्यायला फुरसत नाही, सतत पळत असतात एकाकी. पुणेकरांची सकाळ तशी फारशी घाईगडबडीची नसते, सर्व कस आरामात. खेड्यातील सकाळ प्रसन्नदायक असते.
नदीकिनारील, समुद्रकिनारील, जंगलातील सकाळ सर्वात best, निसर्गाच्या सानिध्यात सर्व चिंता विसरून जातो माणूस.
कधी कधी सकाळ हा हा म्हणता उजाडते तर कधी रात्र सरता सरत नाही. सकाळच्या mood वर दिवस अवलंबून असतो. सकाळ चांगली तर दिवस चांगला ही एक धारणा असते.
उद्याची सकाळ बघणं हा पण नशिबाचाच भाग, पुष्कळांच्या नशिबी ही सकाळ उजाडतच नाही. आयुष्यात उद्या काय वाढून ठेवलं असेल हे कोणासही ठाऊक नसत. Seeing next day morning is as good as winning jackpot.
आज जब आप सुबह उठ रहे थे तब कोई अपनी आखिरी साँसे ले रहा था, एक और दिन के लिए ईश्वर को धन्यवाद दीजिये, मिले हुए इस दिन का लाभ उठाए.
सकाळच्या न्याहरीत खाद्य पदार्थ प्रांता प्रांतानुसार वेगळे असतात. दक्षिणेत इडली, वडा, डोसा, पोंगल वडा, उप्पीट, फिल्टर कॉफी...
महाराष्ट्रात उपमा, कांदे पोहे,
थालीपीठ, बटाटेवड़ा, साबुदाणा वडा, मिसळ, शिरा, साबुदाणा खिचडी, चहा, कॉफी. हल्ली इडली, वडा, डोसा, पराठा ह्यावर पण ताव मारल्या जातो. काहिंकडे egg item असतात. Diet concious लोकांचे सगळ निराळं असत, ते खाण्याच्या बाबतीत वेगळ्याच दुनियेत वावरत असतात.
गुजरात मधे फाफडा जिलेबी, ढोकळा, ठेपला, फरसाण, चहा.
नॉर्थ मधे पराठा pickle curd, पुरी साग, भजिया, आलुबोंडा, कचोरी, छोले समोसा, चाय, लस्सी.
Portuguese ब्रेड, पाव सोडून गेलेत, ते पण बऱ्या पैकी खाल्ली जातात.
आजकाल at least खाण्याच्या बाबतीत तरी प्रांतीय भेदभाव विसरून सर्वत्र सर्व प्रांतीय खाद्य पदार्थ आवडीने खाल्ले जातात. अपवाद म्हणून काही प्रांत असतील पण...
सगळ्यात पौष्टिक व filling न्याहरी गावा खेड्यातील, शेतातील शेतकऱ्यांची ती म्हणजे भाकरी, चटणी, कोरड़ कालवण, कांदा. अजून तरी काही प्रमाणात शुद्ध हवा त्यांच्या नशिबी आहे.
सकाळी सकाळी सर्व देवालयात भक्तिमय वातावरण असत. नाश्त्यासाठी जशी काही हॉटेल्स full असतात तशी भक्तीसाठी देवालये full असतात.
काही ठिकाणी लोक सकाळचा मोहक सूर्योदय बघायला जातात.
तर अशा ह्या सकाळला कमी लेखून चालणार नाही, ती काही फक्त नावापुरती सकाळ नसते. पुष्कळांना ती भरभरून काही तरी देते, तर काहींचं हिरावून घेते.
वो सुबह कभी तो आयेगी, वो सुबह कभी तो आयेगी, इन काली सदियों के सर से, जब रात का आंचल ढलकेगा, जब अम्बर झूम के नाचेगी, जब धरती नग़मे गाएगी, वो सुबह कभी तो आयेगी....
( साभार:
गीतकार साहिर लुधीयानवी)
प्रत्येक नवीन सकाळ आपणा सर्वांना एक आशेची किरण घेऊन येवो हीच सदिच्छा.
सुरेश Koulgi
२/१२/२०२२
छान लिहिलंय, आवडलं.
छान लिहिलंय, आवडलं.
उद्याची सकाळ बघणं हा पण नशिबाचाच भाग, पुष्कळांच्या नशिबी ही सकाळ उजाडतच नाही. >> सहमत. माझ्या मते म्हणूनच आपण वाढदिवस साजरा करतो. १ वर्षाने आयुष्य सरले म्हणून न्हवे, तर १ वर्ष आयुष्य उपभोगायला मिळाले म्हणून.