जोवर सृष्टी आहे तोवर माणुस, माणुसकी, नाती, आयुष्य, सुख, दुःख ह्यावर निरंतर लिहिलं जाणार, चर्चा होणार.
सृष्टीवर जशी जशी गर्दी वाढत गेली, माणसाच्या प्रगतीचा आलेख वाढत गेला, माणसाच्या आशा आकांक्षा वाढू लागल्या, आपसातल्या स्पर्धा वाढू लागल्या, तसतसा माणसाचा स्वभाव पण बदलत गेला अस म्हणणं वावग ठरणार नाही. ह्या गर्दीत कोणाचं कोणाकडे लक्ष नाही, प्रत्येक जण धावतोय एकाकी. कोणाची career साठी, तर कोणाची पोटाची खळगी भरण्यासाठी धडपड / धावपळ सुरू आहे.
ज़िन्दगी का सफ़र है ये कैसा सफर, कोई समझा नहीं कोई जाना नहीं, है ये कैसी डगर, चलते हैं सब मगर, कोई समझा नहीं कोई जाना नहीं....
जेवढी जास्त लोकसंख्या, तेवढे problems जास्त. वाढत्या लोकसंख्येचा दुष्परिणाम निसर्गावर झाला, होत आहे, त्याचे दुष्परिणाम ग्लोबल warming च्या नावाखाली अख्खं जग अनुभवत आहे.
लोकसंख्या नियंत्रणात आली तर प्रत्येकाचे आयुष्य सुकर होण्यात नक्की मदत होईल.
वाढत्या जनसंख्येचा परिणाम सामाजिक, आर्थिक परिस्थितीवर होतो, महागाई वाढते, बेरोजगारी वाढते, गुन्हेगारी वाढते, सर्वांना सामावून घेण्यासाठी जागा अपुरी पडते, घरांच्या किमती वाढतात, लोकांच्या चिंता वाढतात, चींतेच रूपांतर stress मधे, स्ट्रेसचे रूपांतर लहान वयात आजारांमध्ये होते. अशा वेळेस इस्पितळ तर "आ" वासून वाटच बघत असतात की कधी गिऱ्हाईक येतो व कधी त्याला लुटतो...
इस्पितळ, health industry ह्यावर चांगल लीहिण्यासारख कमी, वाईट जास्त, पण ते ह्या घडीला येथे नको.
आपल्या देशात जनसंख्या लवकरात लवकर नियंत्रणात आणली नाही तर त्याचे दुष्परिणाम आपल्या सर्वांना व येणाऱ्या पिढीला भोगावे लागतील हे मात्र नक्की. असो.
जीवनात नात्यांना फार महत्त्व. अपने है तो अपन है, अपने है तो जिंदगी है...
माणसाची नात्यांची चेन त्याच्या जन्मतःच सुरू होते. ही चेन तयार होते अनेक नाती व मित्र ह्यांच्या लिंकने. प्रत्येक नात म्हणजे एक लिंक, सर्व लिंक जोडून नात्यांची चेन तयार होते. कालांतराने ही चेन तुटते ती काही नाती दुरावल्यामुळे, काही देवाकडून हिरावली गेल्यामुळे, काही कायमचा अबोला धरतात व चेन मधून अलगद निसटतात. एक जरी लिंक नाहीशी झाली तर ती चेन तुटते, परत जुळून येत नाही. ती जुळली जाते ते नवीन लिंक ने अर्थात नात्याने. चेनचे तुटणे व जुळणे संपूर्ण आयुष्याच्या प्रवासात सुरू असते. चेन मजबूत ठेवण्यासाठी प्रत्येक लिंकचे सहकार्य आवश्यक असते. चेनची योग्य ती काळजी नाही घेतली तर ती गंजून तुटते, नाती खुंटतात, म्हणून त्यासाठी प्रत्येक लिंकची काळजी घेणे गरजेचे. एखादी लिंक जुनी होउन, अथवा नकळत तुटल्यास त्यास नाईलाज.
आयुष्य हा एक प्रवास आहे व हा प्रवास कोणी टाळूच शकत नाही.
हा प्रवास कसा सुकर करायचा हे ज्याच्या त्याच्या हाती. वर बसलेल्या दिव्य शक्तीने तुम्हा आम्हास पाठविले ह्या पृथ्वीवरील प्रवासास return ticket देऊन, ते पण confirm return ticket. कोणी कायमचा येथे राहु शकणार नाही ह्याची खबरदारी वरच्याने systematically घेतली आहे.
ईश्वर की बनाई यह सृष्टी बेशकीमती ख़ज़ानों से भरी हुई है, और उसकी देखभाल के लिये एक भी चौकीदार नहीं है. व्यवस्था ऐसी की गई है कि दुनिया में अरबों व्यक्तियों का आवागमन प्रतिवर्ष होता है, किन्तु यहां से कोई भी एक तीली तक ले जा नहीं सकता. खाली हाथ आने का, खाली हाथ जाने का...
आयुष्याच्या प्रवासाचे अनेक टप्पे/स्टेशन, टप्प्याटप्प्याने व येणाऱ्या काळा सोबत हा प्रवास सुरू होतो. प्रत्येक टप्प्यावर नवीन लोक आयुष्यात येतांत व काही जीवलग बनून कायम आयुष्यात राहतात, काही प्रवास अर्ध्यावरच सोडून जातात, काही कधीच पुन्हा दिसत नाहीत. आयुष्याचा प्रवास कधी संथ गतीने चालू असतो तर कधी वेगाने पुढे सरतो. ह्यात वळण पण असंख्य असतात, चढ उतार असतात. जर जिंदगीशी जुळवून घेतलं तर प्रवास सुकर वाटतो, जस .......
"मै जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया".
आयुष्याच्या प्रवासात कुठल्या वळणावर आपली कोणाशी भेट होणार आहे याची पूर्वकल्पना नसते. प्रत्येकाशी आपलं रक्ताचं नातं असू शकत नाही म्हणून देवाच्या कृपेने काही माणसं अद्भुतरित्या आपल्याशी जुळल्या जातात, आपल्या जवळ येतात ते ही नकळत, जसं की नदीच्या प्रवाहात वाहतांना दोन ओंडके अचानक एकत्र येतात. एकमेकांची सोबत कुठपर्यंत असेल ते काहीच निश्चित नसत पण काही काळ एकत्र प्रवास करून पुढे वेळ आल्यावर ती दुर होतात.
जेंव्हा प्रवास फार जलद गतीने पुढे सरतो तेंव्हा एका टप्प्यावर थकून भागून माणूस स्वतःतला "मी" शोधायचा प्रयत्न करतो, ह्या संपूर्ण धावपळीत त्याची त्याच्यातल्या "मी" शी भेटच झालेली नसते. ह्या जीवघेण्या धावपळीत तो फार पुढे निघून जाऊन परिवार मागे राहिलेला असतो, शारीरिक, मानसिक थकवा जाणवू लागल्यावर त्याला परिवाराची आठवण येते.
दिवसा उजेडातला प्रवास एवढा जाणवत नाही पण अंधारातल्या प्रवासासाठी आपण कुणाचा तरी हात शोधत असतो व तसच आपलाही हात कुणाला तरी हवा असतो....
माणसाच्या प्रवासाचा अंतिम टप्पा, म्हातारपण, हे त्याचे शेवटचे स्टेशन. येथे आल्यावर त्याला जाणवत की ह्या संपूर्ण प्रवासात आपण जगायचेच विसरलो, पुष्कळशा आकांक्षा अपुऱ्या राहिल्या असतात, बऱ्याच प्रश्नांची उत्तरं ठाऊक नसतात, ती ह्या क्षणी हवी असतात. अशा वेळेस पुन्हा चक्र उलटी फिरवता येत नसतात ते सर्व प्राप्त करायला, पुनः नव्याने जगायला वेळ निघून गेलेली असते...
ज़िन्दगी के सफ़र में गुज़र जाते हैं जो मकाम, वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते....
आयुष्य हे एक न सुटणारे कोड होय, उगाच ते सोडवण्याच्या भानगडीत पडू नये.
ज़िन्दगी कैसी है पहेली हाय,
कभी तो हँसाए, कभी ये रुलाये.
प्रत्येकाचं आयुष्य म्हणजे एक स्वलिखित कादंबरी, पहिलं पान जन्माच व शेवटचं मरणाचं, मधली पान ज्याची त्याने भरायची असतात कादंबरी पुर्ण करायला.
हीच कादंबरी म्हणजे "आयुष्य" नामक चित्रपट होय. आयुष्य चित्रपटाचा मनमुरादपणे आनंद घ्या कारण हा चित्रपट पुनः प्रदर्शित होत नसतो.., ह्यातल्या हव्या हव्याशा क्षणांना Download करता येत नाही.., नको नकोशा क्षणांना Delete ही करता येत नाही..,
ह्याचे निर्माते, लेखक, कलाकार, दिग्दर्शक, सर्वेसर्व तुम्हीच..,
"The End" ला टाळ्या वाजल्या पाहिजेत, तुमच्या चांगल्या भूमिकेचे कौतुक सर्वत्र व्हायला हवं, तुम्ही कायमचे लोकांच्या मनी असणार, तुम्हाला कोणी विसरणार नाही अशी अजरामर भुमिका साकार करा. याद रहे ये जिंदगी ना मिले दोबारा...
येथे कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या एका अप्रतिम कवितेतील काही ओळी एकदम fit बसतात...
"आयुष्य हे विधात्याच्या वहीतील पान असतं, रिकामं तर रिकामं, लिहिलं तर छान असतं. शेवटचं पान मृत्यू अन् पहिलं पान जन्म असतं, मधली पाने आपणच भरायची, कारण ते आपलंच कर्म असतं.
होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं, कुठलंच पान कधी गाळायच नसतं, चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं, कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असतं...
नाती जपण्यात मजा आहे, बंध आयुष्याचे विणण्यात मजा आहे,
जुळलेले सूर गाण्यात मजा आहे, येताना एकटे असलो तरी सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे...
नशीब कोणी दुसरं लिहित नसतं, आपल नशीब आपल्याच हाती असतं, येताना काही आणायच नसतं जाताना काही न्यायचं नसतं, मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं, याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं"...
प्रत्येकाचं आयुष्य निराळ, प्रत्येकाच्या नात्यांचा गोतावळा निराळा. नात्यांवर बोलण्यासारखं, भरपुर काही असत. नाती ही मुळातच नाजूक असतात व म्हणून त्यावर भाष्य करतांना प्रत्येकाने सावधगिरी बाळगायला हवी. पण तस् होत नाही. काहींना कोणाची नात्यांची घट्ट विण बघवत नाही, तेंव्हा ही मंडळी एखाद्याच्या नात्यांवर, नातलगांवर त्यांच्या पाठी, त्यांच्या नकळत निष्फळ चर्चा करतात, त्यालाच idle gossiping म्हणतात. अशा gossipers पासून नेहमी सावध रहावे. समाजात अशा gossipers ची कमतरता नाही.
जीवनात नाती गरजेची पण त्या नात्यांमध्ये जीव असला पाहिजे.
पूर्वी माणसाच्या खांद्यावर हात ठेवला की आपुलकीचा झरा वाहायचा, आता ह्रदयात हात घातला तरी ओल लागत नाही. माणसातील हा बदल घातक. माणुसकी वजा माणूस काही उपयोगाचा नाही.
प्रत्येकाच्या आयुष्याची कहाणी निराळी पण theme एकच, शेवट ठरलेला.
नशिबाने आपणास देवाने दिलेले आयुष्य भरभरून जगा, नाही तर शेवटी पुष्कळसे "काश" राहून जातात जीवनात.
आयुष्य भरभरून जगा हे लिहायला सोप, वाचायला बर जरी वाटत असलं तरी अवलंबायला कठीणच. मला व्यक्तिशः पुष्कळदा कठीण गेलं. पण आता अस वाटत की ह्या पुढे प्रयत्न करायला काय हरकत?
पुष्कळदा फुकटचा विचार करून करून शेवटी मी स्वतःलाच म्हणतो "जो होगा देखा जाएगा" आणी स्वतःचे tension कमी करून घेतो. तुमचं टेन्शन तुम्हालाच दुर करावं लागणार हे ध्यानी असु द्या.
आताच्या घडीचा प्रवास कसा सुकर होईल ते बघा, पुढच्या प्रवासाची चिंता करू नका. प्रवासात भेटलेल्या सर्व सोबतींशी नीट वागा, सर्वांची काळजी घ्या जेणे करून त्यांच्या सहवासाने प्रवास सुकर व आनंदी होईल.
शेवटी "जिंदगी मानो तो मौज है वरना बोझ है"....
आपणा सर्वांचे आयुष्य सुखात जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
सर्व स्वस्थ रहा, मस्त रहा.....
स्वस्थ राहाल तर इस्पितळांच्या लुटमारीपासून वाचाल, health is wealth हे ब्रीदवाक्य आजच्या घडीला १००% बरोबर आहे.
आयुष्यावर, नात्यांवर जेवढ सुचलं तेवढं लिहिलं ह्या घडीला. आयुष्याच्या प्रवासाचे माझे तिकीट कुठवर दिल हे फक्त विधात्याला माहीत, उरलेले लिखाण काही सुचल्यास उर्वरित आयुष्यात...
*संकलन, लेखन*
@ सुरेश Koulgi
७/१२/२०२२
जगभरातच जनसंख्या वाढण्याचं
जगभरातच जनसंख्या वाढण्याचं कारण म्हणजे विज्ञानातली , वैद्यकशास्त्रातली प्रगती, त्याचा प्रसार, त्यामुळे सुधारलेलं राहणीमान आणि वाढलेले आयुष्यमान. मृत्यूदर जितक्या झपाट्याने घसरतो, तितक्या झपाट्याने जन्मदर घसरत नाही. आता लोकसंख्या नियंत्रण म्हणजे जन्मदर आणखी कमी केला तर आणखी काही वर्षांनी तरुणांच्या तुलनेत वृद्धांचं प्रमाण खूप जास्त असेल. काम करणार्यांपेक्षा बसून खाणार्यांचं आणि दुसर्यांवर अवलंबून असणार्यांचं प्रमाण जास्त असेल. युरोपातल्या काही देशांत ही स्थिती आलीच आहे.
चीनला सुद्धा एकच मूल वरून तीन चालतील असा उलट मार्ग धरायला लागला आहे.