दिस सरतो असा.

Submitted by deepak_pawar on 21 December, 2022 - 10:52

दिस सरतो असा, आठवांचा ठसा, मिटून चालला
दिस सरतो असा, पाखरांचा थवा, उडून चालला.

दिस मेघापरी झरुन चालले
दिस वाळूपरी सुटून चालले
दिस सरतो असा, स्वप्नांचा दिवा, विझून चालला.

दिस गंधापरी विरून चालले
दिस रंगापरी पुसून चालले
दिस सरतो असा, या फुलांचा पसा, लुटून चालला.

दिस आले कधी सोबती घेउनी
दिस गेले कधी एकटा सोडुनी
दिस सरतो असा, ओळखीचा जसा, निघून चालला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users