शिक्षक / शिक्षिकांनी सांगितलेले चौकटीतले किस्से

Submitted by रघू आचार्य on 6 December, 2022 - 09:37
shikshika

चौकटीतले म्हणजे वृत्तपत्रात मुख्य बातमीच्या मधे किंवा चिकटून चौकटीत जे बातमीच्या संदर्भाने अवांतर पण रोचक किस्से देतात ते.
शाळेत शिक्षक शिकवताना कधी कधी रंगात येतात आणि मग त्यांचे अनुभव किंवा एखादी मुलांना ठाऊक नसलेली घडलेली घटना, प्रवाद, अफवा सांगतात. धड्यापेक्षा मुलांना या चौकटीतल्या किश्श्यांची जास्त आतुरता असते. काही काही शिक्षक तर या चौकटीतल्या किश्श्यांसाठी मुलांचे लाडके असतात. मग ते मारकुटे असले तरी तेव्हढं चालवून घेतलं जातं.

मनपाच्या शाळेत शिकल्याने दमांच्या शाळेतल्या प्रमाणे इरसाल मुलंही होती आणि तसेच शिक्षकही. त्यातल्या काही किश्शांमुळे जसे गैरसमज झालेले होते तसेच पुढे नव्या शाळेतल्या शिक्षकांच्या अचूकतेच्या आग्रहाखातर आलेल्या किश्शांनी इतरांच्या घट्ट गैरसमजांना धक्का बसायला मदत झाली.

तुमच्याकडेही असे किस्से नक्कीच असतील ज्यांचा प्रभाव खूप काळ राहिला असेल.
उदा. एक किस्सा इथे वाचू शकता

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान धागा.
शाळेत असताना मला येरे येरे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा ही कविता पाठ होत नव्हती.
तेव्हा सर म्हणाले की अक्षय कुमार आणि ममता कुलकर्णीच्या भोली भाली लडकी. खोल तेरे दिलकी, प्यारवाली खिडकीची चाल लाव..
आजवर विसरलो नाही ते. पोरांनाही तशीच शिकवली आहे Happy

ये रे ये रे पावसाला ही चाल फिट बसतेय.
पूर्वी पहिलीला असायची ही कविता. आता मराठी शाळेत पण नर्सरीलाच उरकून टाकतात. छान किस्सा.
सबसे बडा खिलाडी मधे आहे ना गाणे हे ? ९५ चा हिट्ट मूवी आणि तितकेच सुपरहिट्ट गाणे. आठवण झाली.

काळे म्हणून एक मारकुटे पण त्यापेक्षाही भयाण विनोदी सर होते. त्यांची आठवण आजही मुलं काढतात. त्यांचेच किस्से जास्त आहेत.

काश्मीरचं वर्णन करताना सरांनी सांगितलं होतं कि तिथं एव्हढी थंडी, एव्हढी थंडी कि माणसं लुंगीच्या आत शेगडी बांधून फिरतात. त्या वेळी हे खरंच वाटलं होतं. काश्मीरचे लोक घराबाहेर पडताना लुंगी नेसत नाहीत हे समजायला तिथे जायचा योग यावा लागला. Happy
घरातलं माहिती नाही. उंचावरच्या ठिकाणी तर शेगडी (बुखारी) ला उंचच उंच धुराडे लावल्याशिवाय ती पेटत नाही हे ही त्याच वेळी कळले.

> काश्मीरचं वर्णन करताना सरांनी सांगितलं होतं कि तिथं एव्हढी थंडी, एव्हढी थंडी कि माणसं लुंगीच्या आत शेगडी बांधून फिरतात.
हे अगदीच खोटे नाही.

शाळेत असताना मला येरे येरे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा ही कविता पाठ होत नव्हती.
तेव्हा सर म्हणाले
>>>>कुठल्या इयत्तेला ही कविता होती म्हणे Uhoh

आम्ही "राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली" ही कविता म्हणायचो ती जरा रडवी चाल होती. तेव्हा एका शिक्षकांनी गंमत म्हणून "ए दिल मुझे बता दे, तू किस पें आ गया है" च्या चालीवर म्हणा असे सांगितले. नंतर आम्हाला ओरीजनल रडव्या चाली पेक्षा हिच चाल आवडायची.

गागालगा लगागा गागालगा लगागा
या वृत्तातली कोणतीही चाल बसते. ए दिल मुझे बता दे च्या लयीवर उडत्या चालीची. खोडकर मूडची गाणी लिहिली जातात.
आम्हाला ए रात के मुसाफिर चंदा जरा बता दे ही चाल लावून दिली होती..
खूप वर्षांनी रात्री भूले बिसरे गीत कार्यक्रमात हे गाणे पहिल्यांदा ऐकले तेव्हा खूप ओळखीचे वाटले. पण पाच सहा दिवसांनी सरांनी हीच चाल शिकवल्याचे खाडकन आठवले.

शाळेत असताना मला येरे येरे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा ही कविता पाठ होत नव्हती.
तेव्हा सर म्हणाले>>>> भंपक.. सर अशा फालतू गोष्टी शिकवायचे काय रे?

काश्मीरचं वर्णन करताना सरांनी सांगितलं होतं कि तिथं एव्हढी थंडी, एव्हढी थंडी कि माणसं लुंगीच्या आत शेगडी बांधून फिरतात.>>>>हे खरे आहे Wikimedia.. A kanger is an earthen pot woven around with wicker filled with hot embers used by Kashmiris beneath their traditional clothing pheran to keep the chill at bay, which is also regarded as a work of art. It is normally kept inside the Pheran, the Kashmiri cloak, or inside a blanket

कुठल्या इयत्तेला ही कविता होती म्हणे Uhoh
>>>
ईतके कोणाला आठवतेय.
पण ही चाल दहावीला क्लासच्या सरांनी सांगितलेली.

भंपक.. सर अशा फालतू गोष्टी शिकवायचे काय रे?
>>>>
यात काय भंपक आणि फालतू?

एकेकाळी शिक्षक व शिक्षिकांनी चौकटीतले किस्से सांगितले होते. आता तेच किंवा अनुभवातून मला सुचलेले, समजलेले किस्से मी वैद्यकीय व बिगरवैद्यकीय विद्यार्थ्यांना 'रिसर्च मेथडोलॉजी, डेमोग्राफी, एपिडेमियॉलॉजी व बायोस्टॅटिस्टिकस' सारखे क्लिष्ट विषय शिकवायला वापरतो.

अहो गणिताच्या सरांनी सांगितलेले हे..
फॉर्म्युले पाठ होत नसतील तर त्यांना चाल लावा यावरून हा विषय निघाला होता.
त्यासाठी येरे येरे पावसा दहावीच्या अभ्यासक्रमात कश्याला हवी?

(a + b)3 = a3 + 3a2b + 3ab2 + b3.

3 म्हणजे cube
2 म्हणजे square

या फॉर्म्युलाला चाल लावून द्या ना सर!!
गाताना व्हिडिओ youtube वर अपलोड केला तरी चालेल!

सरांनी नेहमीच्या पद्धतीने आचरटपणा सुरू केलाच आहे
सर एकही धागा का सोडत नाहीत हे 'त्यांच्याकडे दुर्लक्ष करा की वो' असली लाडिक पिपाणी वाजवनऱ्यांना विचारावा वाटतो
Sad

काही असो, या निमित्ताने अज्ञातवासी अज्ञातवासातून बाहेर आले.. आता खुर्ची / पिंगळा / झोया ही जबरदस्त कादंबरीपण अज्ञातवासातून बाहेर येऊ द्या.

भूगोलाच्या तासाचे सर "टिमटिम करते तारे, ना घबराना प्यारे" च्या चालीवर ब्रह्मांड आठवत असतील.

(a + b)3 = a3 + 3a2b + 3ab2 + b3.

3 म्हणजे cube
2 म्हणजे square

या फॉर्म्युलाला चाल लावून द्या ना सर!!
>>>

हे बेसिक आहे. ईतक्या सोप्या फॉर्म्युलासाठी गाणे आणि चाल खर्च करून फुकट घालवण्यात अर्थ नाही.
डेरीवेटीव्ह आणि ईँटिग्रेशनचे सारे छोटेमोठे फॉर्म्युले मात्र मी एका चालीत बांधले होते.

काही असो, या निमित्ताने अज्ञातवासी अज्ञातवासातून बाहेर आले.. आता खुर्ची / पिंगळा / झोया ही जबरदस्त कादंबरीपण अज्ञातवासातून बाहेर येऊ द्या.>>>>
खरंच न! खूप दिवसांनी अवतरले ते.

“डेरीवेटीव्ह आणि ईँटिग्रेशनचे सारे छोटेमोठे फॉर्म्युले मात्र मी एका चालीत बांधले होते.” - इथे M-3 मधल्या पार्शल डिफ्रन्सिएशनचे प्रॉब्लेम्स सोडवताना ‘डॅबा डॅबा रहता हूँ’ म्हणणारा कु. ऋन्मेष डोळ्यासमोर उभा राहिलाय. Lol