फिल्मी गॉसिप

Submitted by शाखाहारी पिशाच्च on 18 November, 2022 - 22:10

फिल्मी गॉसिपिंग ही अनेकांची भावनिक गरज असते. अशांच्या भावनांना इथे वाट मोकळी करता येईल.
बॉलीवूडने विबासंची उज्ज्वल परंपरा सुरूही केली आणि तिला प्रतिष्ठा मिळवून दिली. ९०% गॉसिप्स विबासंवरच असतात. त्याला काही पुरावे बिरावे नसतात. पण ते कधीच लपून राहत नाही. मग चर्चा सुरू होतात. फिल्मी मॅगेझिन्स मधे छापून येतात. मग दोघेही असं काहीच नाही, "जस्ट फ्रेंड्स" " प्लेटोनिक लव्ह" असे खुलासे करतात. क्या एक लडका और एक लडकी कभी दोस्त नही हो सकते असे काळीज पिळवटून विचारले जाते.
इथे फक्त १००% प्युअर गॉसिपला स्थान आहे.
पुरावे मागणे, लेक्चर देणे, ती त्यांची पर्सनल स्पेस आहे, त्यांचं वैयक्तिक आयुष्य आहे असे उपदेश करणे हे फाऊल धरले जाईल. कारण असा उपदेश दुसर्‍याला केल्यावरही गॉसिपची गरज नाहीशी होत नाही. उपदेश करणारा स्वतः तिसर्‍या वर्तुळात जाऊन गॉसिप करू लागतो.

सुरूवातीलाच बिंदिया गोस्वामी - विनोद मेहरा यांच्याबद्दलच्या गॉसिपची कहाणी नमुना म्हणून घेतली आहे. श्वेता जया नावाच्या बाईने तर गॉसिपला वाहून घेतलेले आहे. उच्चभ्रू स्त्रियांच्या किटी पार्टीजमधे दबक्या आवाजात चालणार्‍या आणि शंभर टक्के खर्‍या निघणार्‍या अशा गॉसिपने युट्यूब समृद्ध आहे. वेळ कसा छानपैकी जातो समजतच नाही. आपणही या यज्ञकुंडात आपापल्या दोन दोन समिधा टाकून हे अग्नीकुंड धगधगत ठेवूयात.

https://www.youtube.com/watch?v=V2ttzrh71GU

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथं विषयाला धरून लिहिलं तर आयडी च्या मागे स्व, कै., वै किंवा पि.यो. वासी लिहिले जाईल.
( काय लिहू आणि काय नको असं वाटतंय. पण कंट्रोल)