IBS

Submitted by Nitin Hudekar on 13 November, 2022 - 11:55

मला खूप दिवसा पासून ibs चा त्रास होतोय. माझे वय ३३ आहे. कृपया कोणाला काही माहिती असल्यास मदत करावी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या धाग्यावर IBS म्हणजे नक्की काय याची माहिती नसणाऱ्यांच्या पोस्ट्स व सल्ले जास्त आहेत.
लोक पॅथी आणि त्यांचे वर्गीकरण करतात त्यातील कुठल्याही पॅथीत यावर क्युअर नाही. थोडेफार मॅनेज मात्र होते.
IBS मध्ये कधी कॉन्स्टिपेशन, कधी जास्त वेळा जावे लागणे - त्यात एखाद्या वेळेस पातळ होणे परंतु जुलाब नाही असे होते. थोडक्यात शौच्यास होण्याच्या प्रक्रियेवर शरीराचे / मेंदूचे नीट नियंत्रण नसते. त्यामुळे जुलाबा वरील किंवा कॉन्स्टिपेशन वरील उपाय यात चालत नाहीत. हा मनोकायिक आजार आहे असे मानल्या गेले आहे.
कधी अचानक बरे वाटणे आणि परत हा त्रास सुरू होणे असेही होते त्यात एखादा औषधोपचार सुरू असेल तर त्यानेच बरे वाटले असे वाटून परत ते औषध घेतले तर त्याचा काहीच परिणाम होत नाही हे दिसुन येते.

संतुलीत आहार हा केव्हाही चांगलाच, तो घेतल्याने याची तीव्रता जरा कमी होते असा माझा अनुभव पण तो यावर उपाय नव्हे. मानसिक तणाव कमी केल्यानेही फरक पडतो.

मला जेव्हा हा आता पेक्षा तीव्र स्वरूपात होता तेव्हा आपण प्रवासात असताना कसे होईल याची काळजी वाटायची. पण जिथे शौच्यास जाणे शक्य नाही (उदा. बस प्रवास किंवा वर्किंग लंच आहे त्या वेळेस) तेव्हा मात्र प्रेशर येत नसे, आता आपण जाण्यास फ्री आहोत आणि जाणे शक्य आहे अशा ठिकाणी पोचलो (उदा. विमानतळ) की मात्र अचानक प्रेशर येऊन पळावे लागे. (तेव्हा निदान माझा IBS तरी मनोकायिक आहे). एरव्ही घरी, ऑफिस मध्ये मात्र केव्हाही जावे लागे कधी खाल्ल्यावर लगेच किंवा इतर वेळीही. आणि कधी कॉन्स्टिपेशन फेज, त्यात काही दिवस कॉन्स्टिपेशन किंवा काही काळ अर्धा दिवस कॉन्स्टिपेशन आणि अर्धा दिवस पाच सहा वेळा त्यात एक दोनदा पातळ होणे असेही होत असे.

सध्या बराच आराम आहे, सकाळी दोनदा आणि संध्याकाळी एकदा. हे सुद्धा छान रिलीफ आहे.

मला IBS नाही परंतु एक समस्या जरुर आहे ती म्हणजे, भावना झाली रे झाली की त-त्का-ळ जावे लागते. मग २ मिनिटेही मला थांबता येत नाही. दुसरे म्हणजे जर शंका जरी आली की रेस्टरुम नाही जवळपास तर बरेचदा भीती वाटून जावे लागते. घरातील कोणी ४ तास रेस्ट्रुममध्ये बसत असेल तर ती व्यक्ती गेली की थोड्याच वेळात टेन्शनमुळे भावना येणे. व त्यामुळे, दार वाजवत बसावे लागून, त्या व्यक्तीत व आपल्यात वितुष्ट येणे असे प्रकार घडतात, हे रुममेटसबरोबर तसेच घरच्या सर्व सदस्यांबरोबर झालेले आहे.

आय हॅव्ह नो आयडिया पैकी पहील्या समस्येवरती काय तोडगा काढायचा? दुसरी समस्या , अमेरिकेत ऑलमोस्ट येत नाहीच. मध्यंतरी कोव्हिडमुळे, सर्व रेस्टॉरंटसनी , रेस्ट्रुम्स बंद ठेवल्याने तात्पुरता जाणवलेली. जे एस क्यु चे रेस्ट्रुम मॅनेजमेन्ट एक भिकारडे आहे. गेली कित्येक वर्षे एक तर रेस्टरुमच नव्हती आता आहे तीही काय तर सकाळी काहीतरी ८ ते रात्री ७ फक्त. खरोखर ना ...!!! Sad

IBS (irritable bowel syndrome) आजाराबद्द्ल मार्गदर्शन हवे आहे. https://www.maayboli.com/node/57131 इथे उपयुक्त माहिती आहे. ती सर्व वाचा. माझा अनुभवही दिला आहे.

सामो, पहिले हे IBS चेही लक्षण असू शकते. इतर काही नाही ना यासाठी डॉकचा सल्ला घेतलेला बरा.

दुसरे आता होत नाही तर विसरा. परत झाले तर थिरपी ट्राय करून बघा.

घाटपांडे, तुम्ही, स्वाती२, रेव्ह्यू वगैरेंनी तिथे छान माहिती व अनुभव दिले आहेत. येथील माझ्या पहिल्या पोस्ट वरील पहिले वाक्य मी सुधारत आहे.

What is the difference between IBS and IBD?

https://www.medicalnewstoday.com/articles/323778

मला crohns Disease आहे.
जो IBD आहे.
पण हे IBS नाव ऐकले की मी नेहमी कन्फ्यूज होतो. आपला आजार कुठल्या गटात मोडतो म्हणून..
कारण मी कधी माझ्या आजाराची माहिती जास्त वाचत नाही. त्याने उगाच टेंशन येते. त्यापेक्षा डॉक्टरवर सोडून देतो.
तुम्ही वाचत असाल तर वरच्या लिंकवरची माहिती छान मुद्देसूद वाटत आहे. (मी नाही वाचली. पण मांडणी छान वाटली)

IBS तुझ्या आजारा एवढा त्रासदायक नाही. प्रत्यक्षात आतड्यांना इजा होत नाही.