‘नो स्वेट’ रॅप

Submitted by BarC on 10 November, 2022 - 12:14

कुठल्याही मराठी संस्थळांवर रॅप विभाग नाही. जे लिखित स्वरूपात रॅप करतात त्यांना “टेक्स्टसी” Textcee म्हणतात. अशा टेक्स्टसी लोकांसाठी मराठी संस्थळांवर व्यासपीठ नाही. - नवा रॅप ग्रूप हवा!

(पाककृती विभागात “कोरियन” शब्दखुणेवर मिटलं असतं खरं तर… पण एफर्टच मारायचा तर अख्खा ग्रूपचं मागावा नि काय. गझल चालते तर रॅप का नको?)

‘नो स्वेट’ रॅप
बिट्स - हवे ते! बादशहाचे चालतील . सनीही चालेल

नाच ग घुमा, घाबरू नको घामा,
मिटींग्सचा मंडे, वाट लावी वेन्सडे,
ढकल थर्सडे की पबमध्ये फ्रायडे,
मंडेला पुन्हा जा तू कामा, गं नाच ग घुमा

नाच ग घुमा, घाबरू नको घामा,
क्लबची रांग लांबच लांब
बाऊन्सर बोले, ए chica थांब
कामापुरता बनव मामा, गं नाच ग घुमा

नाच ग घुमा, घाबरू नको घामा,
Deospray आणला, भलती घासाघीस,
डान्सफ्लोअर वर दिसला, हेमस्वर्थ ख्रिस
ब्लॉन्ड ब्रूनेट नकोच ड्रामा, गं नाच गं घुमा

नाच गं घुमा, घाबरू नको घामा
टॅल्कला टाटा, परफ्यूमला फाटा
बघ तो बघतो, एकटक
हसलीस तूही, ओफ्फ फ*!

- BarC

(रॅपमध्ये कधी कधी असांसदीय भाषा असते, आयडी उडायचा. पण आहे मी your's truly... )

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Proud

मस्त आहे हे Happy

मी सुद्धा नुकतेच मै नही तो कौन बे ऐकल्यापासून हे रॅप खूप ऐकू लागलोय. या विकेंडला मीच एक धागा टाकायचा विचार करत होतो.. येऊ द्या अजून.. आवडलेल्या रॅपच्या लिंकही शेअर करा..