क्रेडीट कार्ड किंवा बँक व्यवहार करण्यासाठीच्या खोट्या लिंक्स

Submitted by अतुल. on 31 October, 2022 - 06:39

अनेकदा SMS किंवा व्हाट्सच्या माध्यमातून आपल्याला खोटे संदेश आणि लिंक येतात. खाली क्लिक करून व्यवहार पूर्ण करा इत्यादी. अनेकजणांना ही लिंक संशयास्पद वाटते त्यामुळे ते सावध होतात. पण सर्वच लोकांना ती खोटी साईट आहे हे कळेलच असे नाही. मला एखादी अशी खोटी लिंक आली तर मी माझ्या ग्रुप्स वर सांगतो कि असा एखादा SMS येईल जी खोटी साईट आहे. अशा साइट्स बाबत मायबोलीकरांना सावध करण्यासाठी हा धागा.

बाय द वे अशा खोट्या वेबसाइट्स गुगल ला इथे रिपोर्ट करता येतात (जे मी पट्कन करतो):
https://safebrowsing.google.com/safebrowsing/report_phish/?hl=en

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला आत्ताच एक एसएमएस आला ज्यामध्ये "तुमच्या क्रेडीट कार्ड वरचे पोइंट्स खालील लिंक वर जाऊन रिडीम करा अन्यथा ते एक्स्पायर होतील" मला शंका आली आणि ती खरी निघाली. कारण ही वेबसाईट एक App डाउनलोड करायला सांगते. कोणतीही बँक किंवा क्रेडीट कार्ड कंपनी असे करणार नाही. ही ती साईट आहे (चुकून क्लिक होऊ नये म्हणून मुद्दामहून मध्ये मध्ये स्पेस देत आहे)
https : // newpointslink.co.in /

वीजबीलासंबंधी मला एक एसेमेस आला होता. चालू महिन्याचं वीजबील भरलं नसून आज रात्री ११.३० वाजता आपलं कनेक्शन कापलं जाणार आहे. अधिक माहितीसाठी खालील वाट्सअ‍ॅप क्रमांकावर संपर्क करा. परंतू मी माझं वीजबील आधीच भरलं होतं.

झोल कसा असतो की
१) मोबाईलमधला सिम कार्ड नंबरच नेट बँकिंगला जोडलेला असतो किंवा
२) व्यवहार पूर्ण करण्यासाठीचा ओटीपी येणारा नंबर तिथेच असतो किंवा
३)त्या नंबरला वाटसप असते.

मग चोरणाऱ्याचे काम सोपे होते.
यातले एकही नसेल तर लिंक कामच करत नाही.

वीजबीलासंबंधी मला एक एसेमेस आला होता. चालू महिन्याचं वीजबील भरलं नसून आज रात्री ११.३० वाजता आपलं कनेक्शन कापलं जाणार आहे....

मुळात असा मेसेज आला तर घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही, साधा विचार करावा की जर वीजमंडळाचे कर्मचारी वीज कापायला येणारच असतील तर ते 'एवढ्या रात्री' का येतील??? (मुळात 'सरकारी कर्मचारी' एवढे कामसू कधीपासून झाले???) आलेच तर दिवसाढवळ्या येतील ना! या रात्री ०९:३०, रात्री ११:३० या वेळा मुद्दाम तुम्हाला घाबरवण्यासाठी दिलेल्या असतात की 'अरे बापरे, रात्री वीज कापली तर पंखा / एसीशिवाय झोप कशी येणार ???? वगैरे वगैरे.

(चुकून क्लिक होऊ नये म्हणून मुद्दामहून मध्ये मध्ये स्पेस देत आहे)
https ..........co.in /
Submitted by अतुल. on 31 October, 2022 - 16:09

तुम्ही दिलेली लिंक मी संगणकात पूर्ण काळजी घेऊन Bluestacks (Android interface in Windwos) वापरून उघडली. HDFC बँकेचे वाटावे असे app बनवले आहे लफंग्यांनी!
app उघडल्यावर तुमची सगळी माहिती जसे की नाव, मोबाईल क्र., जन्मदिनांक, कार्ड क्र., Exp date, CVV सगळे विचारले आहे. मी याठिकाणी सर्व खोटी माहिती भरली. मग मला माझ्या अस्तित्वात नसलेल्या कार्डवर 9042 points मिळाले आहेत! २४ तासानंतर ते रिडीम होणार आहेत!!!
HDFC card fake app1.pngHDFC card fake app2.png

@विक्षिप्त_मुलगा
वाह, मला जे करून पहायचे होते तेच तुम्ही केलेत (Bluestacks वगैरे वापरून). स्क्रीनशॉट आणि डिटेल्स साठी धन्यवाद.

वाटलेच होते त्यांनी अशीच काहीशी लुच्चेगिरी केली असणार. पूर्वी बँक सारख्या दिसणाऱ्या वेबसाईट बनवत. इथे एक पाऊल पुढे जाऊन चक्क app बनवले आहे!

आय सी आय सी आय ची पण अशी फेक साइट आहे. त्या लोकांचे क्रेडिट कार्ड घ्या म्हणून लिटरली रोज फोन येत. आता बंद आहेत. केवायसी केले नाहीतर अकाउंट ब्लॉक होईल असे पण सांगत असतात.

एक बाई फोन करुन उगीचच शेअर टिप्स देते. मी पोलाइ टली ऐकून ठेवते परवा म्हणे मी ऑर्डर टाकूका १०० शेअर ची. मग तिला झापडले चांगले. गप्प बस म्हणून. मग पुढे दोन बाप्यांचा फोन आला!!!

State bankच्या दहा साईट्स आहेत जनतेच्या सेवेसाठी.
या सेवेचं कुणी कुणी व्रतच घेतले आहे.

पूर्वी बँक सारख्या दिसणाऱ्या वेबसाईट बनवत.....
आय सी आय सी आय ची पण अशी फेक साइट आहे. .....
State bankच्या दहा साईट्स आहेत जनतेच्या सेवेसाठी.....

हल्ली फेक वेबसाईट बनवण्याचे कोणी कष्ट घेत नाहीत. Original Website उघडून त्याचा screenshot घेतात. शाओमीच्या फोनमध्ये लांबलचक screenshot घेता येत असल्याने त्यांचे आणखीनच फावते. प्रत्येक स्क्रीन म्हणजे homescreen, login screen अशांचे screenshot घेऊन website बनवण्याचे जुजबी ज्ञान वापरून खोटी लिंक तयार करून त्याला या screenshots जोडतात.
गंमत म्हणजे मोबाईलवरून screenshot घेतलेले असल्याने आणि ते मोबाईलवर पाठवलेल्या sms मधील लिंक वर क्लिक करून मोबाईलवरच वेबसाईट उघडावी अशी अपेक्षा असल्याने बँकेच्या वेबसाईटच्या मोबाईल व्हर्जनचे screenshot असतात. ती लिंक तुम्ही संगणक / laptop वर जरी टाकलीत (private browsing / incognito mode मध्येच हे प्रकार करावेत) तरी संगणकावरसुद्धा वेबसाईटचे desktop version न उघडता mobile version च उघडते!!!
------------------------------------------------------------------------------------------------------------------------

त्या लोकांचे क्रेडिट कार्ड घ्या म्हणून लिटरली रोज फोन येत. आता बंद आहेत. केवायसी केले नाहीतर अकाउंट ब्लॉक होईल असे पण सांगत असतात.
एक बाई फोन करुन उगीचच शेअर टिप्स देते....... मग पुढे दोन बाप्यांचा फोन आला!!!

तुमचा मोबाईल नंबर DND (Do Not Disturb) मध्ये नोंदवा. नोंदणीपासून ७ दिवस झाले की त्यानंतर असा कॉल आला की त्याची तक्रार नोंदवा. (तक्रार कशी आणि कुठे करायची ही माहिती कोणाला हवी असेल तरच सांगेन, कारण सध्या बिझी आहे.)

तक्रार कशी आणि कुठे करायची ही माहिती कोणाला हवी असेल तरच सांगेन >>>> मला खरेच ही माहिती उपयोगी पडेल.मला येणारे 90% कॉल्स हे असेच असतात. करून करून किती नंबर ब्लॉक करू.

मला येणारे 90% कॉल्स हे असेच असतात . .
मला डिश टिवीचे येत (शनिवारी रविवारी पाच सहा) असत .त्यांना इमेल केला, लगेच उत्तर आले की कस्टमर केअर इमेल बंद करून app मध्ये लिंक दिली आहे तिकडे जा. तसे केल्यावर लगेच बंद झाले.
कंपन्यांकडून रोज शंभरच्या वर कॉल्स झाले की ते बिझनेस मार्केटिंग कॉल्स धरतात आणि DND लागू होते.पण हे लबाड लोक मर्यादेच्या आतच कॉल्स करतात आणि dnd नियमांच्या बाहेर राहतात. म्हणजे ते पर्सनल संपर्क झाले. मुळात मुख्य कंपनीने या बीपिओ कंपन्यांना काम दिलेले असते. तर मुख्य कंपनीलाच इमेल करा. Action लगेच होते.
बाकी इमेल हे पावरफुल काम करते. माझा अनुभव चांगला आहे.

____________
Bajaj Finserv .
यांच्या एफडी आहेत. यांचे स्थानिक केंद्र जवळपास असेल तिथे/तशा अधिकृत offline केंद्रावर जाऊन चौकशी करा. तशी ट्रिपलA rating कंपनी आहे म्हणजे धोका नसावा.

<<Bajaj Finserv कडून फसवणूक झाली आहे का कुणाची?>>

फसणुकीचा किंवा इतरही फारसा अनुभव नाही. मी दीड दोन महिन्यांपूर्वी त्यांचे रेटिंग बघुन थोडी चौकशी करून 3 वर्षांची FD काढली ऑनलाइन.
तेव्हा तुमच्या प्रश्नावर अजुन काय प्रतिक्रिया येतात याबद्दल मी ही उत्सुक.

कंपन्यांकडून रोज शंभरच्या वर कॉल्स झाले की ते बिझनेस मार्केटिंग कॉल्स धरतात आणि DND लागू होते....
मुळात आपल्या नेहमीच्या १० आकडी मोबाईल क्रमांकावरून मार्केटिंग करणे हेच बेकायदेशीर आहे. जर एखाद्याला टेलीमार्केटिंग करायचे असेल तर त्याला TRAI (Telecom Regularity Authority of India) कडे नोंदणी करून, योग्य ती फी भरून, परवाना घ्यावा लागतो आणि मग त्या परवान्याच्या आधारे 140 ने सुरु होणारा क्रमांक घ्यावा लागतो. व अशा 140 ने सुरु होणाऱ्या क्रमांकावरून telemarketing करणे कायदेशीर आहे. (Like driving 'Yellow Number Plate car on Ola/Uber)
आपल्या नेहमीच्या १० आकडी क्रमांकावरून telemarketing करणे म्हणजे पांढऱ्या नंबरप्लेटच्या गाडीतून प्रवासी वाहतूक करण्यासारखा प्रकार आहे, जोपर्यंत कोणी तक्रार करत नाही, कारवाई होत नाही तोपर्यंत चालू द्या!
------------------------------
त्यामुळे आपला क्रमांक DND मध्ये नोंदवणे आणि तरीही call / sms आल्यास तक्रार करणे, हाच उत्तम उपाय आहे. (एकदा सरावल्यावर तक्रार करायला अवघी १-२ मिनिटे लागतात. अगदी बस-ट्रेनची वाट बघता बघता किंवा प्रवासात बसल्या बसल्यासुद्धा करू शकतो!)
------------------------------
DND नोंदणी कशी करावी???
DND नोंदणी करण्याचे विविध पर्याय आहेत, खालीलपैकी कोणत्याही सोयीस्कर पर्यायाचा वापर करू शकता.
१. आपल्या फोनच्या मेसेज मोड मध्ये जाऊन 'New Message' मध्ये जावे. तेथे 'START 0' असे type करून '1909' वर पाठवा. (START आणि 0 मध्ये space आहे.)
२. आपले जे सिम कार्ड असेल त्या कंपनीचे app (उदा. जिओ असल्यास MyJio) उघडा, त्यात DND preference चा पर्याय मिळेल. प्रत्येक app मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हा पर्याय असल्याने इथे दिले नाहीत. YouTube वर video उपलब्ध आहेत.
३. सिम कार्ड असलेल्या कंपनीचे app नसल्यास त्यांच्या वेबसाईटवर लॉगीन करूनही DND सुरु करता येते.
४. वरीलपैकी कोणताही पर्याय जमत नसल्यास (एखादी व्यक्ती टेक्नोसॅॅव्ही नसल्यास) आपले सिम कार्ड ज्या कंपनीचे आहे त्या कंपनीच्या कस्टमर केअरला कॉल करून वा त्यांच्या गॅॅलरीत जाऊन तेथील कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष बोलूनही DND सुरु करता येते.

महत्वाचे - १. वरीलपैकी कोणत्याही मार्गाचा अवलंब केला तरी DND सुरु होण्यास ७ दिवसांचा कालावधी लागतो.
२. जर आपल्या फोनमध्ये दोन सिमकार्ड असतील तर वरील प्रक्रिया दोन्ही सिम कार्डसाठी वेगवेगळी करणे आवश्यक आहे.

जर DND केलं तर आपल्या बँकेचे OTP, Account Transactions, Balance हे पण बंद होतात का..?
की sensibly फक्त मार्केटिंग काॅल्स थांबतात ?

तर कंप्लेंट कुठे करायची अशी विचारणा आहे. हल्ली LIC deposits बद्दल कॉल्स येतात. पण थांबवायला काय करावे माहिती नाही.

जर DND केलं तर आपल्या बँकेचे OTP, Account Transactions, Balance हे पण बंद होतात का..?
की sensibly फक्त मार्केटिंग काॅल्स थांबतात ?...

आपल्या बँकेचे OTP, Account Transactions, Balance बंद होत नाहीत. कायदेशीर पद्धतीने केलेले मार्केटिंग calls पूर्णपणे थांबतात, बेकायदेशीर पद्धतीने केलेले मार्केटिंग calls थांबत नाहीत. (कारण सर्वरला ते मार्केटिंग call आहेत हेच मुळी कळायला मार्ग नसतो,) त्यांना तक्रार करून रट्टे देऊनच बंद करावे लागतात, आपला धाक निर्माण करावा लागतो. (कायदेशीर - बेकायदेशीर टेलीमार्केटिंग म्हणजे काय ते मी वरच्या प्रतिसादात दिले आहे.)

माझा मोबाईल क्रमांक आधी रिलायन्सचा होता (अनिल अंबानीची Reliance Communication) तेव्हाही २०११ पासून DND मध्ये होता. मग ती कंपनी बंद पडल्यावर जिओमध्ये port केला तेव्हा २०१७ पासून DND मध्ये आहे. तात्पर्य, OTP, Account Transactions, Balance किंवा Amazon / Flipkart order details/updates व्यवस्थित येतात. 140 क्रमांकाने सुरु होणारा एकही (कायदेशीर) मार्केटिंग कॉल येत नाही. Personal number (10 digit) वरून येणारे (बेकायदेशीर) मार्केटिंग कॉल्स येतात अधूनमधून, मग देतो त्यांना रट्टे!!!

तर कंप्लेंट कुठे करायची अशी विचारणा आहे. हल्ली LIC deposits बद्दल कॉल्स येतात. पण थांबवायला काय करावे माहिती नाही.
Submitted by Srd on 1 November, 2022 - 19:44

थोडी उसंत द्या. सगळ्यांनाच उत्तरे देतो आहे!!!
(थोडे रात्री उत्तर देईन, आता जरा देवळात जातो आहे!)

Bajaj Finserv कडून फसवणूक झाली आहे का कुणाची?
Submitted by रानभुली on 1 November, 2022 - 13:40

फसवणूक नाही, पण त्यांचे WhatsApp वर त्यांचे मेसेजस यायचे. दुर्दैवाने सध्यातरी WhatsApp TRAI च्या कक्षेत येत नाही. त्यामुळे मग थोडे out of the way जाऊन twitter वर सुनावले. सध्यातरी बंद झाले आहेत.
Bajaj Finance_0.png

कोणी म्हणेल की जर WhatsApp वर येत होते तर इतके सगळे करण्यापेक्षा त्या contact ला block करायचे ना. पण माझी विचारसरणी वेगळी आहे, ते चुकत आहेत तर मी त्यांना नमवणार, त्यांना झुकवणार, त्यांना माघार घ्यायला लावणार.

Light bill संदर्भात मलाही असे मेसेजेस येऊन गेलेत.
महावितरण वर भरवसा असल्याने मी दुर्लक्ष केले. Happy

Credit card पॉईंट संदर्भात आलेला मेसेज. HDFC चेच होते.
दुसऱ्या दिवशी बिल चेक केले. त्यात laps होणारे point अशा tab मध्ये काहीच दिसत नव्हते. मग लक्षात आले काहीतरी फसवणूक असेल.
एकदा असाच खऱ्या खुऱ्या बँकेकडून मेसेज आलेला.
तुम्हाला फ्लिपकार्ट व्हाउचर म्हणून. मी क्लिक केलेच नाही. वेळ मिळाल्यावर, बँकेच्या कस्टमर केअर ला फोन करून विचारले. असे काही तुम्ही दिलंय का? त्यांनी होकार दिल्यावर मगच पुढे प्रोसेस केले.

माझं SBI मध्ये अकाउंट नसताना देखील KYC साठी खूप वेळा मेसेज आणि 2 वेळा फोन आलेला. बंद करा अकाउंट असं सांगितलं. Proud

माझं SBI ATM बंद होणार हा कॉल आला तेव्हा म्हटलं की जातो बँकेत,बाजूलाच आहे. तर तिथे होणार नाही म्हणाला. गडबडला.

<< WhatsApp वर येत होते >>
साखरेचं खाणार त्याला देव देणार, या चालीवर "WhatsApp वापरणार त्याला जाहिराती येणार" Lol

<, ते चुकत आहेत तर मी त्यांना नमवणार, त्यांना झुकवणार, त्यांना माघार घ्यायला लावणार.>>
चांगले धोरण विमु.

माझं SBI ATM बंद होणार हा कॉल आला तेव्हा म्हटलं की जातो बँकेत,बाजूलाच आहे. तर तिथे होणार नाही म्हणाला. गडबडला.>>> एस बी आय योनो ॲप वापरता का, त्याचे kyc राहिले आहे ते ऑनलाईन करावे लागेल असा फोन आला होता. मी बँकेत जावून करेन म्हणाले तर हे फक्त ऑनलाईन होते, आत्ता केले नाही तर ॲप आणि आयडी बंद होईल म्हणून सांगितले.
बंद झाले तरी हरकत नाही, मी प्रत्यक्षच kyc करेन असे म्हणाल्यावर फोन बंद झाला. मग एस एम एस आला तुमचे योनो अकाऊंट बंद झाले आहे, actívate करण्यासाठी एक लिंक दिली होती. लिंक आम्ही उघडून बघितली नाही.
इलेक्ट्रिसिटी बिलाबाबत २-४ एसएमएस आणि व्हॉट्स ॲप मेसेज येवून गेलेत. पहिल्यांदा मेसेज आला त्यावेळी क्षणभर कन्फ्युज झाले होते. माझ्या नंबर वरून मी तीन ठिकाणचे बील भरते दिल्लीत. एखादे राहिले की काय असे वाटले खरे. पण बिला संदर्भात किंवा इतरही मेसेज bypl लिहिलेल्या नंबर वरून येतात, अनोळखी नाही हे लक्षात आले. शिवाय एखाद्या महिन्याचे बिल नाही भरले तर लगेच वीज कापली जात नाही हे ही माहित होते.
ओळखीत एका सिनियर सिटिझन जोडप्याला mseb च्या नावाच्या मेसेज मूळे फटका बसल्याचे नंतर कळले.

मला आज लंच टाईमला व्हाट्सअँपवर मेसेज आला JIO डीपी होता त्या मेसेज होल्डर चा
Dear Customer Your SIM documents has been pending Please call customer care no.8777410063 immediately. Your SIM will deactivated 24 hrs.

मी वाचताच भडकले आणि त्याला रिव्हर्ट केले कि माझे सिम एरटेल चे आहे मग jio का माझे सिम ब्लॉक करणार। रिपोर्ट करून नंबर ब्लॉक केला। सहज त्या नम्बरवर landline वरून कॉल केले तर चक्क त्यावर बंगाली मध्ये तो नंबर बिझी आहे थोड्यावेळाने कॉल करा असा मेसेज आला मी पुन्हा ट्राय केल्यावर एकदम शांत आवाजात एका यंग मुलाचा आवाजात हॅलो आला (हा कॉलसेंटर किंवा ऑफिसमध्ये न्हवता बसलेला कारण पाठीमागे एकदम शांतता होती) त्याला मी सांगितले कि मला मेसेज का पाठवला तर तो लागला त्याचे जाळे विणायला कि तुझा नंबर बंद होईल DOCUMENTS द्यावे लागतील व्हाट्सअँपवर. सगळे ऐकून घेतले आणि मग मी त्याची चांगलीच शाळा घेतली कि मी का देऊ माझे तर सिम एरटेल चे आहे आणि jio का माझ्याकढे DOCUMENTS मागेल तू FRAUD आहेस वैग्रे व मी हा कॉल रेकॉर्ड करत आहे त्याने कॉल कट केला .

अरर, अजिबात भडकू नका. फक्त दुर्लक्ष करा.
ते असे मेसेजेस हजारो लाखो लोकांना पाठवतात. ज्या नंबर वरून पाठवतात ते नंबर ब्लॉक करू शकता पण नव्या नंबर वरून येत रहातात. त्यांच्याही बोलून, फ्रॉड आहेस कम्प्लेट करणार पोलिसांत इत्यादि सांगुन काहीही फरक पडत नाही.
तुम्ही रिस्पॉन्ड करताय याचा अर्थ तुम्ही योग्य रीतीने मेसेज केला तर अडकू शकता असे त्यांना वाटेल. जसे त्यांना आता माहिती मिळाली की तुमचा सिम एअरटेलचा आहे, ही फार मोठी माहिती नाही पण अशी अजुन माहिती निघू शकते.
एअरटेलचा dp/logo असता तर तुम्ही documents पाठवले असते का?

मला एकदा असाच फोन आला होता. संशयास्पद वाटल्याने मी त्याला उलट काही प्रश्न विचारले असत त्याने मला अतिशय उर्मट बोलायला सुरवात केली. बिचारा सकाळपसून कोणी गळाला लागलं नाही म्हणून वैतागला होता बहुतेक. मग काय? आमच्यात बा चा बा ची होऊन ते प्रेमळ संभाषण संपले Lol
------------------------
हे बघा आत्ताच फ्रॉड मेसेज आला:
Dear customer your SBI YONO account has been blocked Today please Update Your PAN CARD Click here
https : // tinyurl.com / 5t2sada9

SBI YONO काय असतं मला माहित देखील नाही Lol

Pages