पारावरल्या गझाली

Submitted by ashokkabade67@g... on 30 October, 2022 - 05:20

तस म्हनल त आमच गाव काय लय मोठ्ठ नाय ईनमिन चार गल्लयांच गाव शेती ह्योच एकुलता एक उद्योग चारसा महिन धावाधाव केली की बाकी मंग फुरसतच फुरसतच फुरसत भलेही आमच्या गावामंधी समद्या गोष्टींची कमतरता आसल पर एक गोठ मातुर भरमसाठ हाय नी ती म्हंजी येळ पर व्हत काय की येळ लय मुबलक असल्यान त्यो घालवावा कसा हीच समद्या गावकऱ्यांची पंचाईत व्हती,तस समद्या बाबतीत गाव मागासलेल आस्ल तरीभी राजकारनात मातूर लयच पुढ हाय चार गल्ल्या पर भेदभाव आसा नाय समद्या राजकीय पक्षाले आमच्या इथ थारा हाय काँग्रेस राष्ट्रवादी ची एक गल्ली एक गल्ली शिवसेनेची चार घर भाजपची नी मंग उरलेल्या घरांत दोन चार अपक्ष नी बाकिचे पक्ष येळ आसल्यान समदेच मारूती म्होरल्या पिपळाच्या पारावर समद्यांची बैठक बर झाल आमच्या कुना बापदाद्यान तिथ पिपळाच झाड लावल नायत लयच बसायची मारामार झाली आस्ती सकाळी एसटी सोबतच गावात पेपर येतो नी पाराच्या मालकीचा व्हतो तस पेपराचां समदा खर्च ईमानान गावकरी आज ह्यो त उद्या दुसरा आस आळीपाळीन भरतोच तस गाव लय ईमानदार कुनाच कधी पाच पैसभी डुबवल नाय गावान जावू दे नाय त नमनालेच घडाभर तेल जाळल की म्या राव नी मेन बात त सांगायचीच राह्यली .
त्याच आस झाल सकाळी सकाळी पारावर पेपर आला नी गन्याच्या हाती पडला तवा पारावरली समदी मंडळी आजुन शेकोटीले बारक्या पोरायले सासु आनायलेच सांगत व्हती तवरत गन्यान पयल पान वाचूनभि टाकलनी नामा तात्याले म्हनल तात्या या शिंदे सरकारच कायभी खर दिसत नाय ब्वा आधिच त तात्याले ऐकु येइनास झालत नी त्याले पडली व्हती म्हैस धुतांना म्हशिम्होर काय ठिवाव याची फिकीर आजून वान्यान दुकानात ढेप आनलिच नव्हती तवा म्हैस दुध दिल का नाय या फिकरीतच तो म्हनला आर आपल्या गावात ढेप भेटत नाय तवा सरकी कुठ भेटल र नी भेटलीभी चुकुनमाकुन त परवडायला नग नाय नाय म्या सरकी नाय त सरकारच म्हनत व्हतो नाम्या जोरात म्हनला पर तात्याच्या डोइत सरकीच बसली व्हती तवा तात्या म्हनला खर हाय बाबा तुह सरकी आमचा बा ठिवायचा म्हशिपुढ तवा दुधभी लय निघायच नि घट्टभि आसकी बोटावरला थेंब नाय पडायचा खाली तवा या तात्याले त्ये ऐकु यायच मशिन घिवुन द्याव लागल वरगनी करून म्हनत तात्याचा नाद सोडला नी चांगल्या धडाडलेल्या शेकटीम्होर शेकत बसलेल्या पाटीलदादा म्होर पुढे पर टाकत ईचारल दादा तुमाले काय वाटत ती बच्चु कडू नी रानाच्या भानगडी बद्द्ल आरे मले त्या दोहांची भानगड काय हाय त्येच मालुम नाय तवा म्या काय सांगु पयले भानगड त वाचुन दाव मंग समदे सांगतीलच की आतातरी वाचन्यापत शिकलेल पारावर कुनीच नव्हत तवा बच्चु कडू काय म्हनला नी नी त्ये रानान काय म्हनल ह्ये समद गन्यान शेकोटी मंडळाले वाचून दावल नी मंग काय समदा कालवाच उठला की तवा पाटील दादा जरा जोरातच वरडले आर ही काय ईधिनसभा हाय का गपा एकेकाले संधी भेटलच की बोलायले आस झापडत सोताच समदी सुत्र हाती घेत म्हनल गन्या तुहा सवाल बराबर हाय आता तुच ईचार कर की आपल्याले सरपंच बनवायले एक मत कमी पडत व्हत तवा आपुन काय केल त्या खालच्या आळीतल्या मंजुळा ताईले सांगितल की तुले उपसरपंच करतो पर तु आमच्या पारटीत ये तवा आपुन मंजुळाताईले उपसरपंच केल नी आपला सरपंच बनला तसच आसल ह्ये भि आते आस बघ पक्षातुन फुटायच म्हनल त नाना भानगडी नी त्यात पक्षान हाकलल त आमदारपदभी धोक्यात जातच की तवा तुम्हाले सांगतोय की त्यो राना खर बोलत आसला तरीभी बच्चु कडुचच खर ठरल कारन रातच्या अंधारात बंद दाराआड खोक दिल भि आसल तरी त्याले पुरावा काय हाय ज्याले खोक भेटल त्योत नायच म्हननार नी देनाऱ्याले खुर्ची जायचि भिती आसल्यान त्यो कशाले आपल त्वांड उघडल तवा तुले वाटत त्ये खर हाय पर आपल्याकड पुरावा हाय का पर दादा यात समद्या चाळीस आमदारांची नी शिंदेसकट फडनयीसांचीभी बदनामी हायतच च की तवर तुका काकाले कंठ फुटला आर तुका तुहभी खर हाय पर जन्तेम्होर ना शिंदे बोलनार ना फडनयीस समदेच बघा बदनामीच्या धाकान ह्ये पायजेल त बच्चु भाऊले नी रानाले पयले दमात घेवुन पायतील नि नाय ऐकल त मंत्रीसंत्रीभी करत्याल नाय त बंद दाराआड कायबाय देवून दोघायलेभी गप करत्याल तवर आपुन मजा बघायची पर मंग दादा आपुनभी जाव की यायच्याकड नी मांगुन पाव्ह काय भेटत का त्ये म्हंजी गावातल मंदिर नी तालिमभि पडायले आली म्हनून म्या सांगतो बाकि काय नाय लगेच तालमित घुमनाऱ्या सोपानान मधी त्वांड खुपसल परत कालवा उठला पर तवर नामातात्याच्या लेकिन दुधाच्या रतिबाची बादली पारा म्होरल्या बंड्याच्या टपरीवजा हाटेलमधी पोहोचवली नी बंड्यांन हाळी दिली शेकोटी मंडळ किती हाप बनवायची तस समद मंडळच वाद ईसरुन बंड्यांन म़ाडलेल्या बाकड्यावर जावून बसल नी मंग इषय तसाच राह्यला ।

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults