आर आर आर चित्रपट त्यावरची चर्चा ऐकून पाहिला. अपेक्षा बाहुबलीच्या होत्या. पण बघितल्यावर आरारारा का बघितला असे झाले.
केजीएफबाबत सावध भुमिका घेतली आणि थोडक्यातच तो चित्रपट काय कॅटेगरीचा आहे हे ओळखत वेळ आणि मनस्ताप दोन्ही वाचवले.
पुष्पा मात्र पुर्ण बघितला. अल्लू अर्जुन नाव ऐकून होतो. त्याचा स्वॅग आवडला. पुर्ण चित्रपटाचा डोलारा त्यावरच होता. बाकी चित्रपट म्हणून कलाकृती सामान्य वाटली.
आता कांतारा आलाय. काही लोकं याची तुलना तुंबाडशी करायचा चावटपणा करत आहेत. तुंबाड क्लासिक होता. हा ट्रेलरवरून काहीतरी भडक भयानक प्रकार दिसतोय. याचे कौतुक करणारे तेच लोकं आहेत ज्यांना वर उल्लेख केलेले तीन चित्रपट आवडलेले आहेत. त्यामुळे मी माझ्यापुरते तरी याच्या नादाला न लागायचे ठरवले आहे.
असो,
ईथे हे चित्रपट आवडणार्यांच्या अभिरुचीला बिलकुल नावे ठेवायची नाहीयेत.
पण हे चित्रपट ज्या कॅटेगरीचे आहेत त्या चित्रपटांना आपल्याकडची पब्लिक कधी डोक्यावर उचलून घ्यायची नाही.
हल्ली आपण शाहरूखच्या रोमांटीक चित्रपटांना, चोप्रा जोहर यांच्या पंजाबी चित्रपटांना, बॉलीवूडच्या नेपोटीजमला नावे ठेवू लागलो होतो. बॉयकॉट बॉलीवूड म्हणून ट्रेंडही सुरू झालाय. बरेच चित्रपटांना याचा फटकाही बसलाय.
हरकत नाही !
पण पर्याय म्हणून आपण काय उभे करत आहोत? तर हे भडक बटबटीत सो कॉल्लड लार्जर दॅन सुपरमॅन साऊथ ईंडियन सिनेमे डोक्यावर घेत आहोत?
त्यामुळे यांना टक्कर द्यायला बॉलीवूडही आता काय करतेय, तर ब्रह्मास्त्र मैदानात उतरवतेय..
काहीतरी चुकतेय...
आपल्या येत्या पिढीतील प्रेक्षकवर्ग प्रामुख्याने याच चित्रपटांवर पोसला जाणार आहे जो ट्रेंड बॉक्स ऑफिसवर आज आपण सेट करत आहोत.
कितीही नावे ठेवली तरी यापेक्षा ते शाहरूखचे रोमांटीक चित्रपट कैक पटीने सरस होते ज्यांना बघत आमची नव्वदीची पिढी लहानाची मोठी झाली.
आज चांगले आशयघन चित्रपट आले तरी ते ओटीटीपुरतेच मर्यादीत राहणार आहेत. आणि थिएटरला पब्लिक खेचायला असेच स्पेशल ईफेक्टचा मारा असलेले भडक बटबटीत चित्रपट बनवले जाणार आहेत. आणि ते चालणार सुद्धा आहेत. त्यांचीच जनमाणसात हवा होणार आहे.
हा जो नवा ट्रेंड सेट होतोय तो एक प्रेक्षक म्हणून आपल्याला आणि भारतीय चित्रपटसृष्टीला कुठे घेऊन जाणार आहे यावर चर्चा करायला हा धागा.
कोणाला अमिताभ ऋषी डिंपल
कोणाला अमिताभ ऋषी डिंपल सोनमचा अजूबा चित्रपट आठवतोय का?
त्या चित्रपटाचा दर्जाही या आर आर आर पेक्षा चांगला होता. पण माझ्या बालपणीच्या आठवणींनुसार तो फ्लॉप झाल्याचे आठवतेय. काहीतरी भव्यदिव्य दाखवलेय एवढ्यासाठीच म्हणून पटकथा, मांडणी आणि तर्कात गंडलेले अचाट चित्रपट आपण तेव्हाही उचलून घेतले नव्हते.
अरे अजूबा माझा ऑटाफे पिक्चर
अरे अजूबा माझा ऑटाफे पिक्चर आहे. नेहमीचीच स्टोरी असली तरी त्याकाळातले फार भारी इफेक्ट्स होते. क्लेमेशन ने उभा केलेला सैतान भारी होता.
आर आर आर, पुष्पा, केजीएफ हे
आर आर आर, पुष्पा, केजीएफ हे या चढत्या क्रमाने पकाऊ आहेत. >> +१००%
काहीतरी भव्यदिव्य दाखवलेय
काहीतरी भव्यदिव्य दाखवलेय एवढ्यासाठीच म्हणून पटकथा, मांडणी आणि तर्कात गंडलेले अचाट चित्रपट आपण तेव्हाही उचलून घेतले नव्हते. >> बरोबर.
आहेच तो तसा Happy बहुधा
आहेच तो तसा Happy बहुधा चित्रपटांच्या मुख्य धाग्यांवर झाली होती चर्चा. मीही हेच लिहीले होते.
आर आर आर, पुष्पा, केजीएफ हे या चढत्या क्रमाने पकाऊ आहेत.
नवीन Submitted by फारएण्ड on 28 October, 2022 - 11:52

>> आपण ज्या चित्रपटंची थट्टा करायचो ते सडनली पब्लिकला आवडायला लागले. जनतेची टेस्ट बदलायला लागली का आपण आता.....
आर आर आर, पुष्पा, केजीएफ हे
आर आर आर, पुष्पा, केजीएफ हे या चढत्या क्रमाने पकाऊ आहेत.
सहमत !
आर आर आर, पुष्पा, केजीएफ हे
आर आर आर, पुष्पा, केजीएफ हे या चढत्या क्रमाने पकाऊ आहेत. >> +७८६%
आर आर आर, पुष्पा, केजीएफ हे
आर आर आर, पुष्पा, केजीएफ हे या चढत्या क्रमाने पकाऊ आहेत>>>> १००% असहमत
मी सहमत पण माझा चढता क्रम
मी सहमत पण माझा चढता क्रम वेगळा
पुष्पा, आर आर आर, के जी एफ
(के जी एफ १५ मिनिटेच सहन झाला. मी जो भाग पाहिला त्याव्यतिरीक्त मनोरंजक असेल तर दाक्षिणात्य चित्रपटप्रेमींनो माफ करा)
पुष्पा मी पाहु शकलो शेवट
पुष्पा मी पाहु शकलो शेवट पर्यंत पण टाईमपास साठी, म्हणजे इतर काम सुरू असताना अधुन मधुन, त्यात मध्ये फोन आला, कोणी आलं तर पॉज न करता म्युट करून वगैरे.
KGF लावला होता पण नाही पाहू शकलो. RRR नाही पाहिला
तेव्हा क्रमातील KGF च्या स्थानाबद्दल अगदीच सहमत.
माझा क्रम आर आर आर, आर आर आर,
माझा क्रम आर आर आर, आर आर आर, आणि आर आर आर .....
पुष्पा पकाऊ वाटला नाही, अ आणि अ वाटला. केजिएफ नाही बघितला.
मी सहमत पण माझा चढता क्रम
मी सहमत पण माझा चढता क्रम वेगळा
पुष्पा, आर आर आर, के जी एफ >> १००%
मला rrr खूप आवडतो
मला rrr खूप आवडतो
त्याच्या पकाऊपणात पण (रामचरणचं) सौंदर्य आहे.
मला rrr खूप आवडतो
मला rrr खूप आवडतो
त्याच्या पकाऊपणात पण (रामचरणचं) सौंदर्य आहे.>>>
अगदी अगदी! हिरवळ!
हे उपरोधाने लिहिलेले आहे की
हे उपरोधाने लिहिलेले आहे की सिरीअसली? मी खरेच कन्फ्यूज आहे.
अय्यो! रामचरण बद्दल उपरोधाने
अय्यो! रामचरण बद्दल उपरोधाने का लिहितील मुली.
आय कॅंडी. मगधीरा :डोब:
ते शाहरुख बद्दल न लिहिल्याने
ते शाहरुख बद्दल न लिहिल्याने ऋन्मेश सरांचे पित्त खवळले वाटतं.
एक तर धागा पूर्णपणे दक्षिणेच्या सिनेमाविरुद्ध आहे .
जरी त्यांनी बजेट च्या दुप्पट तिप्पट बिझिनेस केला असेल तरी .....
अय्यो! रामचरण बद्दल उपरोधाने
अय्यो! रामचरण बद्दल उपरोधाने का लिहितील मुली.
>>>
हाव डू आई क्नो... जावे त्याचा वंशा तेव्हा कळे. मी जस्ट विचारले
Pages