Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15
आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
वाळवी सिनेमा छान आहे.
वाळवी सिनेमा छान आहे.
खुप दीवसानी मराठीत एका वेगळ्या धाटणीचा चित्रपट बघायला मिळाला.
अप्रतिम कथा, अफलातून अभिनय, डार्क कॉमेडीचे उत्तम उदाहरण
परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांच विशेष अभिनंदन आणि सलाम
वाळवी आयपीटीव्ही वर आला आहे..
वाळवी आयपीटीव्ही वर आला आहे... भारतबाहेरील जनतेने आनंद घ्या... भारतातील लोक प्लिज थेट्रातच बघा.. छान आहे चित्रपट...
आयपीटीव्ही चे सबस्क्रिप्शन
आयपीटीव्ही चे सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल ना तेवढ्यासाठी?
प्राईमवर दृश्यम २ हिंदी आलेला आहे. इच्छुकांनी लाभ घ्यावा.
चक्क हिंदी सिनेमा सर्च केल्यावर पहिल्या नंबरला दिसतोय.
काल अवतार २ पाहिला एकदाचा.
काल अवतार २ पाहिला एकदाचा. इथे चर्चा झाली असेलच आला तेव्हा, पण मी इथे नव्हते म्हणून आत्ता उडी मारणार मधेच.
जबरदस्त आहे. कथा बिथा ठिकठाक पण निळी माणसं, युद्ध, मासे, दुसरी नवी माणसं हे सगळे स्पेशल ईफेक्ट्स अफलातुन. डॉल्बीमधे पाहिला काल. आता पुन्हा ३डी मधे पाहीन. मुळात निळी माणसं व ते चेहरे इतकी डौलदार आहेत की निम्मे काम तिथेच यशस्वी होतं. मी भाग १ मागच्या वर्षी पुन्हा ३डी मधे आला तेव्हा पहिल्यांदा पाहिला होता. तेव्हापासुन २ ची वाट पहात होते पण सुट्टीवर असल्याने हा लगेच पहाता नाही आला. आता आत्मा शांत झाला.
प्राईम वर दृश्यम 2 रेंटने आहे
प्राईम वर दृश्यम 2 रेंटने आहे.
नवऱ्याने दोन दिवस thank god पिक्चर लावलेला काहीही होता, अर्थात tp होता. मी येता जाता बघते असले पिक्चर्स. अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा आवडले. नायिका छान होती, फार कमी काम आहे तिला.
दृष्यंम २ आम्ही फ्री मध्ये
दृष्यंम २ आम्ही फ्री मध्ये बघितला कुठे आठवत नाही.
प्राईमवर पैसे दिसले नाहीत
प्राईमवर पैसे दिसले नाहीत दृश्यम करता.
<<प्राईम वर दृश्यम 2 रेंटने
<<प्राईम वर दृश्यम 2 रेंटने आहे.>> इथे भारतात पण फ्री आहे, परवा की तेरवा पाहिला.
जरा ओढुन ताणुन बनवलाय भाग -२ असे वाटले.
आधी रेंट वर होता आता फ्री आहे
आधी रेंट वर होता आता फ्री आहे प्राईम वर
धन्यवाद सर्वांना, आत्ता जाऊन
धन्यवाद सर्वांना, आत्ता जाऊन बघितलं तर फ्री आहे, मागे रेंटवर होता ते बघितलं होतं म्हणून लिहिलं. बघायला हवा आता .
मजा नाही दृश्यम २
मजा नाही दृश्यम २
मूळ कथेला एक अर्ध्या पाऊण तासाचे ठिगळ जोडलेय खेचून ताणून
मी बघायला घेतला दृश्यम् २, पण
मी बघायला घेतला दृश्यम् २, पण मुळात दृश्यम् १ ची ष्टोरीच नीट आठवेना. फार वर्षं झाली तो बघून. त्यामुळे सारखा प्रश्न पडायचा, अजय देवगण त्यात पोलीस असतो की केबल ऑपरेटर की सिनेमावाला माणूस? तो २-३ ऑक्टोंबरचा (हा ऑक्टोबरचा मराठी उच्चार आहे, जसा सप्टेंबरचा मराठी उच्चार सप्टेबर आहे ... एकूण नंबर ऑफ अनुस्वार्स आर कॉन्झर्व्ह्ड) घोळ तर सोडूनच द्या.
तो केबल ऑपरेटर असतो
तो केबल ऑपरेटर असतो
मग 7 वर्षात श्रीमंत बनून(हे कसं करतात माहिती नाही) सिनेमा थिएटर मालक बनतो.
जमीन विकून थिएटर बांधतो असे
जमीन विकून थिएटर बांधतो असे सांगितले आहे त्यात.
रघू आचार्य उरलेले पैसे देतात त्याचा उल्लेख केलेला नाही.
दृश्यम 1 जास्त चांगला होता.
दृश्यम 1 जास्त चांगला होता.
दृश्यम 2 मध्ये योगायोग जरा जास्त वाटले.
जास्त लिहिलं तर spolier होईल.
तो काही जागा विकतो आणि थिएटर मल्टिप्लेक्स बांधतो असा उल्लेख आहे.
बाकी त्याच्या घरचे इतक्या वर्षांनी देखील येडे सारखे वागतात हे खटकलं. विशेषतः त्याची बायको शेजारणीसोबत बॉडी कुठे चर्चा वै आणि घाबरणे, IG घरात आलाय आणि तुझ्या नवऱ्याला भेटायचं आहे म्हणतोय तर त्याच्यासमोर नवरोबाला फोन करायला घाबरणे वै.
त्या मुलीचं समजू शकतो.
इतका श्रीमंत माणूस त्याला अटक होताना सगळ्या फॅमिलीला घेऊन जाताना अथवा इन्ट्रोग्रेशन वेळी वकील नाही हेही खटकलं.
हो अगदीच.
हो अगदीच.
वेड बघितला आज. रितेश फारसा
वेड बघितला आज. रितेश फारसा नाही आवडला. जेनेलियाचा वावर, एक्स्प्रेशन्स खूप छान आहेत. स्टोरी पण बरी आहे. पण त्या दोघांचे 'नॉट सो मराठी' डायलॉग्ज नाही ऐकवत. जाम खटकतात. ओढूनताणून मराठी बोललं की डायलॉग आणि त्यामागच्या भावना पूर्णपणे वेगवेगळ्या होतात आणि पार विचका करून टाकतात.
दृश्यम 2 काही जणांना आवडला,
दृश्यम 2 काही जणांना आवडला, काहीजणांना नाही आवडला असं दिसतंय एकंदरीत, म्हणून मी रेंट वर नाही बघत. तसं प्राईम साठी पैसे भरलेलेच असतात, मग परत कशाला खर्च करायचे. हम दिल दे चुके, रेनकोट नंतर देवगण आवडायला लागलाय, त्या पिक्चर मध्ये एक सासरचे नातेवाईक ही आहेत म्हणून मला आणि नवऱ्याला बघायचा आहे, ते दृश्यम 1 मध्येही होते.
आत्ता लक्षात आलं. द्दृश्यम २
आत्ता लक्षात आलं. द्दृश्यम २ पहिल्यांदा (मल्याळम मधे का होईना) पाहिला तेव्हां का नाही आवडला ते. दुसर्या भागाची तुलना पहिल्याशी झाली तर नावडणे नैसर्गिक आहे. दुसर्या भागाचा पट पहिल्यांदा अपील झाला नाही. दुसर्या वेळी हिंदीत पाहिला तेव्हां कथानक ओळखीचे झालेले होते. त्यामुळे पहिल्या भागाची तुलना डोक्यात नव्हती.
खरे तर दृश्यम या नावाचा पहिल्या भागात सुरेख उपयोग केलेला आहे. दुसर्या भागात नजरेचा धोका म्हणतात तसे काहीही नाही. खूपच आधी अशा अशा पद्धतीने पुढच्या घटना घडतील असा अंदाज बांधून आधीच केलेल्या उपाययोजना हे मल्याळम मधे पाहताना खटकले होते. अगदी याच्या कल्पनेप्रमाणेच पोलीस तपास चालतो हे पचवणे पहिल्यांदा जडच गेले.
हपा, तुम्हाला लेडी सितारिष्ट
हपा, तुम्हाला लेडी सितारिष्ट नाही आठवली का ‘कला’ पाहताना?
स्वाती_आंबोळे, अगदी अगदी!
स्वाती_आंबोळे, अगदी अगदी! त्याचा ट्रेलर बघूनच बायकोला म्हणालो होतो, ते पहा लेडी शितारिष्ट.
फारच कमी सिक्वल जमुन येतात
फारच कमी सिक्वल जमुन येतात नाहितर पहिला इतका भारी जमलेला असतो की दुसरा ओढुनताणूनच वाटत राहतो
Money heist च्या पुढच्या
Money heist च्या पुढच्या भागात दृष्यंम चा हिरो ला घ्यायला हवे.. पोलिस काय करतील हे सगळं ठाव असणार त्याला. एकदम भारी चोरी होऊन जाईल ती
आज झी टॉकीजवर 'राक्षस' नावाचा
आज झी टॉकीजवर 'राक्षस' नावाचा चित्रपट बघितला. आवडला. सई ताम्हणकरची प्रमुख भूमिका आहे. शरद केळकर आहे, पण त्याचं काम तसं कमी आहे. सस्पेन्स चांगला आहे, सई ताम्हणकरचा अभिनय मस्त. आदिवासी भागात प्रोजेक्ट उभारणाऱ्या कंपनीविरुद्ध आदिवासींचं आंदोलन, त्यात नक्षलवाद्यांचा हात, भ्रष्ट पोलीस ही सगळी गुंतागुंत चांगली दाखवली आहे.
आज झी टॉकीजवर 'राक्षस' नावाचा
आज झी टॉकीजवर 'राक्षस' नावाचा चित्रपट बघितला. आवडला.
>>>>
मलाही आवडला. कथा नवी नाही. पण ट्रीटमेंट चांगली आहे. मला त्या लहान मुलीचं काम आवडलं आणि एका क्षणी भितीही वाटत होती. बहुतेक साउथ इंडीयन पिक्चरचा रिमेक आहे.
वेड पाहिला... वन टाईम watch
वेड पाहिला... वन टाईम watch आहे... बेसुरी गाणे कॉम्पोसिशन अप्रतिम आहे पण सिंगर ने इतकी बेसुरी गायलंय.. कि मुद्दामच अशी सिंगर घेतली कि गाणे बेसूर वाटावे?
मिशन मजनू रॉ च्या एका मिशन
मिशन मजनू रॉ च्या एका मिशन वर आहे. राझी सारखाच आहे. एकदा पाहण्यासारखा आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि रश्मिका मंदाना दोघांचेही काम आवडले. अक्षयकुमारच्या हेररखात्यातला स्टाफ यातही आहे. पहिल्यांदाच नावात बदल न करता बेधडक वापरली गेली आहेत. रामनाथ काव, इंदिरा गांधी, जनरल झिया ऊल हक, अब्दुल कादीर खान इत्यादी. या आधी नावे का बदलायचे कळत नाही.
गेल्या वर्षी योगायोगाने याच विषयावरच्या जुन्या पुराण्या बातम्या मिळाल्या होत्या. त्यामुळं पूर्ण काल्पनिक कथा नसावी असे वाटते. भारतात बनणार्या हेरकथेत देशभक्ती वगैरे भावनिक मालमसाला आपोआप येतो.
Aaj वाळवी पाहिला. आत्ता काहीच
आज वाळवी पाहिला. आत्ता काहीच लिहीत नाही, बाकी अजून मंडळींनी पाहिल्यावर चर्चा करूया.
कीड लागल्यानंतर बघेन म्हणतोय.
कीड लागल्यानंतर बघेन म्हणतोय.
दृश्यम 2 बघितला, मला आवडला.
दृश्यम 2 बघितला, मला आवडला. शेवटी 20 मिनिटं भारी आहेत, इतक्या कमी वेळेत हा विजय कसा सुटणार हा प्रश्न सतावत होता, कसली कलाटणी होती.
आधी स्लो, स्लो आहे असं वाटत असताना त्या प्रत्येक गोष्टीचा संबंध शेवटी जाणारा होता, प्रत्येक फ्रेम महत्वाची होती. जबरदस्त planning इतक्या वर्षात केलेलं, शेवटी अक्षय खन्नाचा आणि तब्बूचा कसला पचका होतो. तब्बूने मुलगा गमावला ही दु:खद गोष्ट नक्कीच पण तो कसा होता आणि का गेला हेही लक्षात घ्यायला हवं.
विजय जेवढा हुशार तेवढी बायको मुर्ख दाखवली आहे.
मराठी कलाकारांना तसं खूप काम होतं. सिद्धार्थ बोडके (हा सुरुवातीला खून करणारा आणि देवगणला पोलीस स्टेशनमधून फावडे घेऊन बाहेर पडताना बघणारा ऍक्टर, हा सध्या गुम है किसिके प्यार मे मध्ये काम करतो), नेहा जोशी, योगेश सोमण, कमलेश सावंत हे ओळखीचे चेहेरे. सोमण, सावंत भाग एक मध्येही होते.
शेवटचा 20 मिनिटांचा भाग मी परत बघेन, मला जाम आवडला. अजय देवगण कुल एकदम.
Pages