चित्रपट कसा वाटला - ७

Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15

आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

मकबुल व हैदर पण नक्की बघा. ओंकारा मध्ये अजय देवगण कंक्णा सेन, सैफ, करीना रोल्स चांगले लिहिलेले आहे. खरे तर मध्य भारत उत्तर
प्रदेशातील अ‍ॅस्थेटिक ह्या चित्रपटा त चांगले दाखवले आहे पुढे ही एक ट्रेंड्च झाली. मकबुल मध्ये इरफा न व तब्बू ग्रेट काम.

हॅरी पॉटर वाचना साठी उपयुक्त असे ट्विटर वर खूप अकाउं ट्स आहेत. अजुन तरी फेक नाहीत. पॉटर हेड हे एक डेली हॅरी पॉटर हे अजून एक.

एक्स्पे क्टो पॅट्रोनेम चे विडंबन एक्स्पेन्सिव्ह पेट्रोलिअम असे केले आहे. बारक्या बारक्या गंमती खूप आहेत हॅरी पॉटर इंग्रजी पुस्तकात.

१९८५ साली आलेला सनी चा अर्जुन मुवि कुठे पाहता येईल. मुम्बई पुण्यात कोणाकडे डी वी डी, वी एच एस असेल तर मी कॉपी बनवून परत देईन.

सनी चा अर्जुन मुवि >> हा मी चित्रपट गृहात पाहिला आहे. छान सिनेमा. सनीने मध्यम वर्गीय मुलाची घुसमट चांगली दाखवली आहे. ममय्या केरो केरो केरो मामा गाणॅ जबरदस्त. तुम्हाला बघायला मिळो हीच सदिच्छा.

मला पण ७० च्या दशकात अलका मध्ये बघितलेला ट्रबल इन इस्तंबूल सिनेमा परत बघायचा आहे. त्यातील एक ट्युन फार जबरदस्त आहे. व सामुद्र धुनीत फिरणारे पांढरे पक्षी. हा एकच भाग आठवतो. अमेरि कन काँमेडि जोडीचा होता बहुतेक. बड स्पेन्सर व अजुन एक.

माबोच्या प्रताधिकार धोरणात अनधिकृत लिंक्स बसत नाहीत.
घायल काहीच दिवसांपूर्वी पर्यंत प्राईमवर होता. तेव्हा पूर्ण बघायचा कंटाळा केला. आता गेला झी ५ वर. युट्यूबवरून डालो केलाय. या चित्रावरून हिंट मिळाली तर शोधून डालो करून पहा कुणाचा राहिला असेल तर. शेमारू वर पण मिळतात काही जुने सिनेमे. हुलूवर पण आहेत. पण ते बहुतेक आपल्याकडे दिसत नाही.
ghayal.jpg

सोचना क्या जोभी होगा देखा जायेगा वाजायला लागलं डोक्यात. >> Lol

नेफ्लिवर "मोनिका माय डार्लिंग" रिलीज झाला आहे. अकरा मिनिटे पाहून पॉज केलाय. ल्युडो प्रमाणे रेट्रो-ट्रीटमेंट आहे, पण तसा नाही. इंटरेस्टिंग वाटतोय.

ओंकारा बघितला आणि आवडला.
सुरवातीला डायलॉग नीट समजत नव्हते, काही वेळेस मागे जाऊन परत ऐकले, पण नंतर मात्र कळु लागले.
टायटल सॉंग वगळता इतर गाणी चांगली ते ठीक वाटली. (बिडी जलाई ले हे गाणं यात आहे हे मला माहित नव्हते)
शेवट जसा केला तसा आवडला. उगाच डॉली जिवंतच आहे वगैरे दाखवले असते मजा गेली असती चित्रपटाची (जशी दोबाराची गेली आहे असे मला वाटते).
भारतीयकरण खरेच चांगले केले आहे. मकबूल आणि हैदर उद्या परवाच बघण्याचा विचार आहे.

Beedi and juban pe laga laga re namak isk ka are always in my playlist. Bipasha is really too sophisticated for that role. And looks fabulous in that gharane ki izzat belt. You feel sad for all. Great tragedy by boss

ओकारा जबरदस्तच आहे, सगळ्यात मोठ्ठ सरप्राइझ सैफ अलि खान होता, त्या आधीची त्याची चॉकोलेट हिरो टाइप इमेज, नेपो किड म्हणुन आलाय फार काही करु शाक्णार नाही असच वाटायाला लावणारी होती, यात त्याने जो लन्गडा त्यागी केलाय त्याला तोड नाहि.
तसही सैफ फार अन्डररेटेड आहे अस मला वाटत.

ओंकारा मधली सगळीच गाणी आवडतात. नैना ठग लेंगे, लकड जलके कोयला हो जाए, ओ साथी रे दिन डुबे ना.. इव्हन वाडकरांच्या आवाजातलं जग जा रे गुडीया ऐकलं की मेलेली करीना तिचे उडणारे केस आणि अजय देवगण तिच्या डोक्याशी बसुन केसातुन हात फिरवतोय हे दिसू लागतं.
नैना ठग लेंगे तर आत पर्यंत पोहोचतं. एकदम आवडता पिक्चर आणि गाणी आहेत. लांबच्या ट्रीप मध्ये एकदा तरी ऐकतोच. नैना दोन -तीनदा रिपीट.

ओंकार पाहीन आता पुन्हा. मला समजत नव्हता.
गाणी आवडती आहेत.
काल हिट पाहिला. शेवट पटला नाही. आरोपींची आर्थिक पार्श्वभूमी, गुन्हा करण्यासाठी लागणारा खर्चिक बंदोबस्त आणि मोटिव्ह यांचा ताळमेळ बसत नाही. (कार गायब होण्याचे उत्तर म्हणून ठीक. पण वेगळा विचार करता आला असता).

ऍक्शन ,गाड्यांचा थरारक पाठलाग अवडणाऱ्यानी Netflix वर लॉस्ट बुलेट १ ,२ अवश्य पहावा .
फ्रेंचांनी बनवलाय पण उसगाववाल्यांच्या तोडीचा आहे .

मकबुल, ओंकारा व हैदर ही त्रयी खुप भारी आहे. अनुक्रमे शेक्स्पेअर च्या मैकबेथ, ओथेल्लो आणि हम्लेट वर आधारीत. मकबुल मधे पन्कज कपूर आनि इर्फान खान ने अफलातुन काम केलय. ओम पुरि आणी नसीर ची जोडी पण खासच. ओम्कारा मधे मेन स्टिम बोलिवुड मधील कलाकार घेउन सुद्धा मजा आणलिए विशाल ने. दीपक दोब्राय्ल चा काम पण खतर्नाक.

नैना ठग लेंगे तर आत पर्यंत पोहोचतं.
>>>>>
अगदी अगदी अमितव.. मी तर म्हणतो गाणे आतपर्यंत जात नाही तर आपण गाण्यात जातो. एक वातावरण तयार होते ज्यात आपण ओढले जातो. जेव्हा जेव्हा हे गाणे ऐकतो तेव्हा तेव्हा मी हे जो सोबत असेल त्याला एकदा बोलून दाखवतोच की काय गाणे आहे यार हरवून जायला होते.. मी वरचेवर ऐकून याची मजा घालवत नाही. चारसहा महिन्यातून एकदा रिपीट मोडवर ऐकतो. आणि मग सोबत ओ साथी रे दिन डुबे ना एकदा ऐकून घेतो. त्याने भारावलेले वातावरण तसेच राहते.

मोनिका ओ माय डार्लिग...अंधादुन चि आठ्वण आलि. छान आहे मुव्हि.. नक्कि पहा ३ १/२ स्टार माझ्याकडुन.

मोनिका ओ माय डार्लिंग .... निव्वळ भन्नाट आहे.
मनोरंजक रहस्य थरार या उद्दीष्टात शंभर टक्के यशस्वी झाला आहे. रेट्रो ट्रीटमेंट साठी ७० च्या दशकातले पार्श्वसंगीत दिले आहे. मोनिका ओ माय डार्लिंग या गाण्याचा नेमक्या क्षणी केलेला वापर मस्तच. तरी तो लॉजिक सोडत नाही आणि कुठेच क्राईम पॅट्रोल सारखा शो सुद्धा बनत नाही. अंधाधुन मधे धक्के देणे इतकेच उद्दीष्ट आहे का असे वाटले होते. त्यापेक्षा थोडी सफाई जास्त आहे.
आपला संशय बरोबर निघाला हे अनेकदा वाटतानाच पुढच्या क्षणी धक्का बसत जातो. शेवट काहीसा अपेक्षित आणि बराचसा अनपेक्षित !

राजकुमार राव, हुमा कुरेशी, राधिका आपटे तिघांचेही काम मस्त झालेय. इतरांनीही त्यांना उत्तम साथ दिली आहे. चित्रपटाची नायक कथा/पटकथा आहे. टोटल एंटरटेनमेंट !

मनोरंजन म्हणून आता रहस्यपट बनवूच नयेत असे मत झाले होते. क्राईम पॅट्रोल सारख्या शोज ने तर इतका तपशीलवार तपास दाखवला कि चित्रपटात रहस्य आणखी काय दाखवणार हा प्रश्नच होता. पण पोलीस तपास आणि उत्तम रहस्यपट यातला फरक ओ माय डार्लिंगने दाखवला.

अरे वा! थँक्स फॉर रिव्हू. अंधा-धुन एकदम आवडलेला. हा बघतोच या विकेंडला. स्पॉयलर नकाच लिहू कोणी आणि लिहिलेत तर वॉर्निंग द्या रे.

मीही नुकताच संपवला
भिरभिर झालं, बऱ्यापैकी प्रेडिकेबल होता
पण फारच वरवर घेतलाय
डार्क कॉमेडी म्हणता येईल असा
वेगवान मांडणी असल्याने पहिल्यांदाच एका बैठकीत बघून झाला
हुमा कुरेशी लाजबाब, राधिका आपटे पण
राजकुमार राव चा प्रश्नच नाही पण सगळ्या बिझनेस मिटिंग ला तो असले कॉलेज युवकाचे कपडे घालतो ते खटकलं
आणि इतक्या मर्डर चा तपास एकच पोलीस जोडी करते
आणि योगायोग किती जुळवाजुळव करावी याला सीमा नाही
फार आवर्जून बघावा असा नाही

२००९ सालचा बारह आणा हा विजय राज, नसरूद्दीन शहा ह्यांचा सिनेमा पाहीला. एंड समजला नाही. कुणी पाहीला असेल नी एंड समजला असेल तर समजवा.

>> https://www.youtube.com/watch?v=5N2ci1D4XPc

हि लिन्क अनधिक्रुत वाटत नाहीय कारण पैसे मागताय्त बघायला. पण पैसे कसे द्याय्चे तेच सान्गत नाहीयत Happy

हि लिन्क अनधिक्रुत वाटत नाहीय कारण पैसे मागताय्त बघायला. पण पैसे कसे द्याय्चे तेच सान्गत नाहीयत >> कदाचित लॅप टॉप / पीसी वर व्हायरस डाउन लोड करत असेल ही साइट. काळजी घ्या सिस्टिम रिस्टोअर सीडी शोधुन ठेवा. प्रोसिजर गुगल करुन ठेवा.

आशुचँप +१
मलाही खूप भारी नाही वाटला. काही धक्के आहेत, काही ठिकाणी प्रेडिक्टेबल आहे. पण बघायला मजा आली.
कॉलेज युवकाचे कपडे - तो गीक दाखवलाय. तरुण, संशोधक टाईप. त्यामुळे ठीक आहे.
विनोदाची पेरणी मात्र मस्त जमलीय. अभिनयही सगळ्यांचे मस्तच.

मुद्दामून पिक्चर बघणार्‍यातला मी नाही. या धाग्यावरचे वाचून बघतोय आपलं. काही काही बघितले पण नसते. ब्रह्मास्त्र काय पूर्ण व्हायला तयार नाही. रात्री लागोपाठ दोन रिव्ह्यू बरे आणि ट्रेलर पण उत्कंठावर्धक म्हणून बघावा म्हटलं तर झोप लागली. सकाळी उठून आत्ता संपवला मोनिका.

मोनिकाचा युएसपी मनोरंजन आहे. जे पिक्चर्स लॉजिकल असल्याचा दावा करतात किंवा आव आणतात, त्यांच्याकडून बिनचूक असण्याची अपेक्षा प्रेक्षक करतो. मोनिका एंटरटेनमेंट करतो. त्याला रहस्य, किंचित विनोद यांची झालर दिली आहे. आपण त्याच्या चुका माफ करतो. म्हणूनच सायकल चोरीला जाणे, ऑफीस मधे व्हॉईस कमांडससहीत ऑटोमेशन यंत्रणा बसवणे, टेंपो घेऊन जात असताना दोघांनी अडवणे, पाहणे आयडेंटीफाय करणे आणि मोटरसायकल चोरणे या गोष्टींची पुढे काहीच लिंक नाही. त्यामुळे याला रहस्यपट म्हणता येणार नाही. पोलिसी चातुर्यकथा किंवा तपास हा त्याचा युएसपीच नाही. शेवटचा धक्का पण अनावश्यक पण बिघडत नाही त्याने. अंधाधुन मधे पण असेच आहे. धक्के देण्याचा मोह दिग्दर्शकाला आवरत नाही. सुरूवातीपासून शेवटापर्यंत खिळवून ठेवणे हे जर करमणुकीत बसत असेल तर उद्देश यशस्वी झाला आहे.

वर म्हटल्याप्रमाणे रेट्रो लुक दिला आहे. विजय आनंद या दिग्दर्शकाच्या जातकुळीतला चित्रपट वाटतो . पण अंधाधुन, मोनिका चा जॉनरच वेगळा आहे. कुठल्या तरी इंग्रजी कादंबरीवरून बेतलाय असे ऐकलेय. कुणीतरी सांगेलच ते.

मिक्स्ड रिव्ह्यूज बघता वेगळा धागा पाहीजे का या पिक्चर साठी ?

रंगून सुद्धा casablanca वर आधारित आहे असे कुठेतरी ऐकल्यासारखे वाटते.
भारद्वाजचा कमीने पण चांगला आहे म्हणे.

Pages