कुणा न कळता भेटत होतो तेव्हा आपण.

Submitted by deepak_pawar on 16 October, 2022 - 00:48

कुणा न कळता भेटत होतो तेव्हा आपण
शब्दा वाचुनी जाणत होतो तेव्हा आपण.

नुकता वसंत आला झाड झाड मोहरले
नुकते हृदयी आपुल्या प्रीत झरे पाझरले
नवे फुलोरे झेलत होतो तेव्हा आपण.

भिडता डोळ्यास डोळे हृदयी अनामिक सूर
पळभर दूर होता का उठते मनी काहूर
मनो मनी का झुरत होतो तेव्हा आपण.

तुझ्या आसपास माझे उगाच घुटमळने
नजरेच्या कोनातून हळूच तुझे बघणे
जरा आगळे वागत होतो तेव्हा आपण.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे.
>>>> जिनके सर हो इष्क की चादर
पांवोंके नीचे जन्नत होगी|

सामो, चुकीची ऐकू आलेली गाणी धाग्यावर अजून एक भर Happy
डोळ्यासमोर डोक्यावर पागोटे म्हणून चादर गुंडाळलेली लोकं आली.

छान आहे.
> >>> शीर्षक वाचून फडणवीस आणि शिंदेंवर लिहिली की काय असे वाटले.>>>> Rofl

ऑर्किड, दत्तात्रय साळुंके,केशवकूल मनःपूर्वक धन्यवाद.
> >>> शीर्षक वाचून फडणवीस आणि शिंदेंवर लिहिली की काय असे वाटले.>>>>
नाही, ही कविता खूप पूर्वी लिहीली होती.

deepak_pawar
कविता आवडली हे लिहायचे विसरूनच गेलो की.
कविता आवडली.

छान आहे.
कवी मध्ये अजून पोटेंशियल आहे, अजून छान व्यक्त होण्यास स्कोप आहे असे मात्र वाटले.

deepak_pawar
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!