कर्जवसूली साठी येणारे गूंड खिडकीत उभ राहून पहा.
बघ तूला घेतलेल्या ग्रुहकर्जाची आठवण येते का?
खिडकी बन्द करून घे. दिवे पंखे मालव.
सर्व नळ बंद करून टाक.
बघ तूला घेतलेल्या ग्रुहकर्जाची आठवण येते का?
थडथडणार काळीज जागेवर आणायचा प्रयत्न कर.
डोळे मीटून घे. देवाचा धावा कर. राम रक्षा म्हण.
नाहीच आठवल तर भीमरूपी महारुद्रा म्हण.
बघ तूला घेतलेल्या ग्रुहकर्जाची आठवण येते का?
मग हळूच मागच्या दाराने बाहेर पड.
चालत रहा भिती कमी होईपर्यंत.
ती कमी होणार नाहीच. मग घरी ये.
साडी बदलू नकोस. चपलाही काढू नकोस.
पून्हा त्याच खिडकीत ये. हळूच खात्री करून घे.
कर्जवसूलीचे गूंड गेलेले असतील.
बघ तूला घेतलेल्या ग्रुहकर्जाची आठवण येते का?
आता परत बेल वाजेल. धाडकरून दरवाजा उघड.
तूझा नवराच असेल. त्याच्या हातातली पिशवी-
खसकरून ओढून घे. चप्पल बहुदा तो स्वतःच काढेल.
तो विचारेल तूला तूझ्या रागवण्याच कारण.
मग म्हण नशीबच फूटलय.
चहा कर. त्याच्यासमोर आदळ.
तो टी व्ही वर आज तक लावेल. ते तू बदल.
कहानी घर घर की लाव.
बघ आता तरी त्याला बूडवलेल्या ग्रुहकर्जाची आठवण येते का?
(सौमीत्र ह्यांच्या 'बघ तूला माझी आठवण येते का' ह्या कवीतेच विडम्बन)
जमलं!
खरच सुंदर लिहलय. मजा आली.
मार्तंड.
ग्रहकर्र्झाची आठवण
मनी कन्न्टोल वर शेअर माक्रेट पाहिले
तर काय, एकच बातमी दिसतेय,
सर्व होम लोन बॅन्काचे शेअर्स घसरले
बघ कर्झाची आठ्वण येते का?
केदार
येवढ नाय जमल भाउ... विषय जरा घाबरवाणारा घेतला आहेस.
शेवटच कडव खमंग आहे पण....
आजकालच्या रियालीटी शोस च्या भाषेत सांगायच तर... विडंबनाला जरा विनोदाची झाक असवी कींवा तो एक विनोद असावा. इथे जरा कमी पडताय, तेवढ जरा बघा..
धन्यवाद
धन्यावाद रे सत्यजीत.
आज काल एवढ स्पष्ट पणे कोणी सांगत नाही.
खूप खूप आभार.
तूझेही मार्तंड.
Very Good !! I tried to
Very Good !!
I tried to write in marathi fonts but could not do it.
Please excuse me.
Regards,
Satish Keskar
धन्यवाद
धन्यवाद सतीश :))
केद्या जमेश रे !
केद्या जमेश तुला ! पण मला आधी एक सांग हे का बरं कुठेतरी वाचल्यासारखं वाटतय ? तुझ्या रंगिबेरंगी मधे आहे का ?
अरे तीच
अरे तीच आहे रे :))
आधी गूलमोहोर वर टाकलेली नंतर रंगीबेरंगी वर चिकटवली :))
केदार, विडं
केदार,
विडंबन बर्यापैकी जमलंय.
अवांतर मुद्दा: बरेच दिवस झाले आहेत इथे येऊन. थोडं शुद्धलेखनाचं मनावर घेता आलं तर?
धन्यवाद
धन्यवाद श्र
विडंबनाला
विडंबनाला जरा विनोदाची झाक असवी कींवा तो एक विनोद असावा.
>>>>>>>>>
'कारूण्यातला विनोद' म्हणूनही एक प्रकार असतो.. माहिती आहे ना?
अन हा त्यातला नसला, तरी जमलाय भारी. मुळ स्क्रिप्ट ज्याने ऐकलेय, त्याला ते बरोबर कळेल. त्याच तालात म्हणून बघितलं, तर त्यातला विनोदही कळेल.
भोत आवड्या रे..