आरसागृह

Submitted by रघू87 on 14 September, 2022 - 02:21

आरसागृह

या आरसागृहात आहेत,
स्वच्छ गुळगुळीत
लखलखीत आरसे,
आजूलाबाजूला
मागेपुढे
वरखाली,
आणि उभ्या आहेत त्याआत
माझ्या अगणित प्रतिमा
ज्या हलतात माझ्या प्रत्येक
सूक्ष्म हालचालीसोबत
काहीकाळ...

या आरसागृहात,
बराच काळ वावरणाऱ्या
प्रत्येकाचा, हाच अनुभव
आहे का?
सुरुवातीला, आपल्या हालचालींवर
हलणाऱ्या ह्या प्रतिमा
कालांतराने,
नाचवू लागतात आपल्याला
त्यांच्याच तालावर???

Group content visibility: 
Public - accessible to all site users