पाककृती स्पर्धा-२ - अख्खा मसूर कटलेट/कबाब/पॅटिस - स्मिता श्रीपाद

Submitted by स्मिता श्रीपाद on 12 September, 2022 - 01:16
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

1 वाटी अख्ख्या मसूर रात्री भिजवून सकाळी पाणी उपसून निथळून ठेवणे
1 कांदा बारीक चिरून
2 हिरव्या मिरच्या
1/2 इंच आले
6-7 लसूण पाकळ्या
1/2 टी स्पून गरम मसाला
1 टी स्पून चाट मसाला
1 टेबलस्पून डाळीचे पीठ
मीठ
( भरपुर कोथिंबीर पण यात छान लागते पण माझ्याकडे नव्हती म्हणुन मी नाही घातली )

क्रमवार पाककृती: 

20220912_081657.jpg
१. मसूर, आले लसूण मिरची, मीठ मसाले (कांदा सोडून) सर्व अजिबात पाणी न घालता मिक्सरवर वाटून घेणे.मसूर व्यवस्थित निथळलेले हवेत.
२. या वाटणात बारीक चिरलेला कांदा, गरजेपुरते डाळीचे पीठ घालणे. मसुरामधून पाणी पूर्ण निथळले गेले असेल तर डाळीचे पीठ अतिशय कमी किंवा नाही घातले तरी चालते.
20220912_082246.jpg
३. या सारणाचे छोटे छोटे कबाब करून तव्यावर शॅलो फ्राय करून घेणे.
20220912_082503.jpg
४. चिंचेची चटणी किंवा सॉस सोबत गरमागरम खाऊन घेणे.

20220912_084443.jpg

वाढणी/प्रमाण: 
८-१० कबाब्/कटलेट तयार होतील.
अधिक टिपा: 

प्रोटीनयुक्त आणि अजिबात कार्ब्स नसलेला असा हा पदार्थ मस्त लागतो.जरा झणझणीतच चांगला लागतो.
बारीक चिरलेला कांद्यामुळे नीट आतपर्यंत व्यवस्थित शिजला जातो.

ता.क. - स्पर्धेची वेळ आता संपली असेल तर पाककॄती बाद केली तरी चालेल.
शेवटच्या क्षणी धावत पळत का होईना सहभाग घ्यायचा हा प्रयत्न Happy

माहितीचा स्रोत: 
डॉ.प्रमोद त्रिपाठी यांच्या "फ्रीडम फ्रॉम डायबेटीस" या प्रोग्राम अंतर्गत एक कुकिंग क्लास केला होता त्यामधली ही रेसिपी आहे.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान, प्रोटीनयुक्त.

हरभराडाळीचे/चण्याचे कबाब खाल्ले आहेत, मसुराचा कोणताच प्रकार कुणास ठाऊक का चाळिशीपर्यंत कधी खाण्यात आला नाही. हे पण छानच लागत असणार.

तुमच्या फ्रीडम फ्रॉम डायबेटीस / हेल्दी डाएटच्या आणखी रेसेपी येऊद्यात.

धन्यवाद सर्वांना.खरंच कमीत कमी साहित्य आणि कमीत कमी वेळेत होतो हा पदार्थ. म्हणूनच आज शेवटच्या दिवशी करायचं धाडस केले Wink

<<आख्खा मसूरैवजी आणि कुठले कडधान्ये चालतील>>
मी छोले,/ मूग / हरभरे वापरून करते.
आणि आप्पे पात्रात करते. 2 चमचे तेलात 7 आप्पे तयार.

रेसिपी छान आहे..

आजच करून पाहिली ही रेसिपी.
छान आणि सुटसुटीत आहे एकदम.>> अरे वा....कोणी करुन पाहिली की खरच बरं वाटतं .. धन्यवाद आवर्जुन कळवल्याबद्दल.