
‘शाम सवेरा ‘ - पालक पनीरचे कोफ्ते असलेली हि एक नॅार्थ इंडियन स्टाईलची शाही डिश. तसं तर पालक न घालता नुसतेच पनीरचे कोफ्ते बनवून जास्तीचा त्रास टाळत नेहमीची कोफ्ता रेसिपी बनवता येते. पण जेव्हा फ्रिजमधे कॅास्टोतला ढिगभर पालक लोळत असतो तेव्हा तो शक्य तीथे घुसवायचा असतो, शास्त्र असतं ते.
तर आता जास्त पाल्हाळ न लावता स्पर्धेची मुदत संपत आली असल्या कारणाने थेट रेसिपीकडेच वळणार आहे. साहित्य आणि कृती तीन भागांत विभागून देत आहे म्हणजे रेसिपी समजायला आणि बनवायला सोप्पी जाईल.
रेसिपीचे तीन भाग-
1. कोफ्त्यांचं कव्हरींग
2. कोफ्त्यातलं स्टफिंग
3. ग्रेव्ही
1. कोफ्त्यांचं कव्हरींग -
साहित्य -
१ वाटी पालक प्यूरे
१/२ वाटी काजू पावडर
१/२ वाटी बेसण
१ चमचा काळं मिठ
१ चमचा जीरा पावडर
१ चमचा धणा पावडर
दोन चमचे तेल

कृती-
सर्वप्रथम गरम पाण्यात ३-४ मिनिटे उकळलेला पालक मिक्सरमधे वाटून घ्यावा. तेल गरम झालं की पालक प्यूरे ओतून त्यात जीरा पावडर, धणा पावडर आणि मीठ घालून दोन मिनिटं शिजवून घ्यावा. त्यानंतर घट्टपणा येण्यासाठी आधी काजूची पावडर आणि नंतर बेसण घालून एकजीव करून घ्यावं. घट्ट झालेलं मिश्रण एका प्लेटमधे घेत पूर्ण थंड होऊ द्यावं. ते थंड होईपर्यंत दुसरीकडे स्टफिंग बनवायला घ्यावं.


स्टफिंगचं साहित्य-
१ वाटी किसलेलं पनीर
१ चमचा वेलची पूड
१ चमचा आमचूर पावडर
१ चमचा काळं मिठ
१ चमचा जीरा पावडर
२ मोठे चमचे कॅार्न स्टार्च

कृती -
स्टफिंगच्या साहित्यात दिलेल्या गोष्टी एकत्र मिक्स करून त्याचे समान आकाराचे गोळे करून घ्यावे. साधारण १३ होतात. त्यानंतर थंड झालेलं पालकच्या मिश्रणाचेही समान भाग करून घ्यायचे. हातावर एक भाग घेत फोटोत दाखवल्याप्रमाणे तळहातावर थापत त्यात पनीरचा गोळा ठेवून बंद करावा. हे जरासं वेळखाऊ आहे.


त्यानंतर वाटीत थोडं कॅार्नस्टार्च घेत प्रत्येक गोळा त्यात घोळवून गरम तेलात खरपूस तळून घ्यायचा. एअरफ्रायरही वापरू शकता किंवा बेक करूनही चांगलेच लागतील. तयार झालेले कोफ्ते थंड होऊ द्यायचे.
ग्रेव्हीचं साहित्य -
१ कांदा
३ टोमॅटो
अर्धा इंच आलं
१,२ लसूण पाकळ्या
२ मोठे चमचे बटर
१/४ वाटी काजू
२ कश्मिरी मिरच्या
१ चमचा जीरा पावडर
१ चमचा गरम मसाला
दोन चमचे मध
चार चमचे क्रिम
मीठ

एका पातेल्यात बटर घेऊन त्यात ओबडधोबड चिरलेला कांदा, टोमॅटो,आलं लसूण, लाल मिरच्या, जीरे, काजू परतून घ्यावा. थोडंसं पाणी ओतून झाकण ठेऊन दहा मिनिटे मस्त शिजू द्यायचं आणि पूर्ण थंड करूनच मिक्सरला फिरवायचं. एका चाळणीच्या हे मिश्रण गाळून घ्यावं. आता पातेल्यात पुन्हा एकदा बटर टाकून त्यात गाळलेली प्यूरे ओतावी आणी जीरा पावडर, गरम मसाला, मीठ घालून दहा एक मिनिटं मंद आचेवर शिजवावं. शेवटी मध आणि क्रिम घालून पाच मिनीटं पुन्हा शिजवून त्यावर कसूरी मेथी घालावी.
आता एका पसरट भांड्यात ग्रेव्ही ओतायची. थंड झालेले कोफ्ते मधोमध कापायचे आणि ग्रेव्हीमधे टाकायचे. क्रिमप्रेमींनी हवं असेल तर पुन्हा एकदा चमचाभर क्रिम शिंपडावं.


अशा कोफ्त्याच्या ग्रेव्हीबरोबर लच्छा पराठा, नान किंवा कणकेचा खरपूस भाजलेला पराठा इज मस्ट. ते नसेल तर चपाती किंवा जीरा राईसबरोबरही हि ग्रेव्ही चांगली लागेल.
(खरं तर हे खाऊन घरचे सगळे वेडे होतील अशी कोफ्ता ग्रेव्ही बनवायची होती.. पण तसं काही झालं नाही..खाणारे सगळे नीट आहेत :))
म्हाळसा _/\_ रिस्पेक्ट!
म्हाळसा _/\_ रिस्पेक्ट!
प्रतिसादांसाठी सर्वांचे
प्रतिसादांसाठी सर्वांचे धन्यवाद.
मी ह्याआधी रेस्ट्रॅांटमधे जाऊन कधी हा प्रकार खाल्ला अथवा बघितला नव्हता. कारण व्हेज मागवायचं झाल्यास माझा अशा क्रिमवाल्या ग्रेव्हीजला पास असतो. म्हणून मी घरी बनवताना नावासाठी क्रिमचा वापर केलाय त्यामुळे मला हा प्रकार आवडला.. ज्यांना असले प्रयोग करायला आवडतात त्यांनी ट्राय मारायला हरकत नाही.
मस्त ... भारी दिसतेय.. मलाही
मस्त ... भारी दिसतेय.. मलाही हे प्रकरण बाहेरच खायला आवडेल.
एवढी मेहेनत खटाटोप करून केलं तर घरची मंडळी नेहमीची पनीर माखनी किंवा बटर मसालाच बरं लागतं असं म्हणून ढिस्स करण्याची दाट शक्यता आहे.
ही ऑल टाइम विनर रेसीपी आहे.
ही ऑल टाइम विनर रेसीपी आहे. स्रोतः संजीव कपूर खाना खजाना. बॅक इन द एटीज. >>> +१ संजीव कपूर खाना खजानाची सुरूवात इथे वर्णन करतो. मजेदार गोष्ट आहे - https://youtu.be/gz9DvOAPhgQ?t=2035
म्हा़ळसा, सही जमले आहे!!
सी, या रेसिपी मागचा इतका
सी, या रेसिपी मागचा इतका इतिहास मलाही माहित नव्हता. लिंक शेअर केल्याबद्द्ल धन्यवाद.
घरची मंडळी नेहमीची पनीर माखनी किंवा बटर मसालाच बरं लागतं असं म्हणून ढिस्स करण्याची दाट शक्यता आहे >> पण ते कोफ्ते फार यम्मी लागले.. ग्रेव्ही वगैरे बनवून त्यात नाही सोडले तरी स्टार्टर म्हणून पालक पनीर कोफ्ते हा छान ॲाप्शन आहे.
पालक पनीर कोफ्ते हा छान
पालक पनीर कोफ्ते हा छान ॲाप्शन आहे.>>>>> येस्स नक्कीच.
पुढच्या गणेशोत्सवात सुद्धा
पुढच्या गणेशोत्सवात सुद्धा असेच उत्साहाने सहभागी व्हा !
तुमचे प्रशस्तीपत्र खालीलप्रमाणे.
हार्दिक अभिनंदन
हार्दिक अभिनंदन
अभिनंदन!
अभिनंदन!
Pages