कथा शंभरी २ - त्या दोघी - बिपीन सांगळे

Submitted by बिपिनसांगळे on 11 September, 2022 - 09:19

कथा शंभरी २ - त्या दोघी - बिपीन सांगळे
-----------------------------------------------
अंगणात येऊन रघूने , गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिलं आणि ...
अचानक एकीचं लक्ष तिकडे गेलं , ‘अरे, हे काय ? ‘ ती बोलली.
‘ आलं हे येडं बाहेर ! ‘ दुसरी म्हणाली .
त्या दोघी मोकळ्याच होत्या . त्यांना वेळच वेळ होता .
पहिली म्हणाली , ‘ हे आधीच नादिष्ट ! त्यात माबोकरांनी याला घराकडे बघायची सवय लावलीये आणि हे बघतं पहिलीच्या पोरासारखं ! - रघू घर बघ. बूड खाजवायचं विसरेल पण घराकडे बघायचं नाही.
रघूचं त्यांच्याकडे लक्ष होतंच. त्याला वाटलं हे घर म्हणजे माबो गणेशोत्सव उपक्रम आहे . तीस खोल्यांचं. प्रत्येक खोलीमध्ये कित्येक निर्मिक वास करत आहेत . पण काही चुकचुकणाऱ्या वळचणीच्या पाली असतातच !
अन तो झाडू घेऊन त्या पालींच्या मागे लागला - च्या मारी !

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults