माणसे

Submitted by रघू87 on 9 September, 2022 - 15:34

माणसे

माणसे
जी रोज भेटतात,
बोलतात
हसतात, रडतात
हसवतात, रडवतात
चिडतात,भांडतात
समजून घेतात
समजावतात
मैत्री करतात
प्रेम करतात
सर्वस्व देतात
सर्वस्व घेतात
धोका देतात
घात करतात
आठवतात
विसरतात
जगतात, मरतात
जगून मरतात
मरून जगतात
तीच सारी,
सारी सारी
माणसे,
जरा कधी
खरवडून बघता
स्वतःसारखीच
का वाटतात??

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कविता चांगली आहे.
(पण सध्या मायबोलीवरचे शशक खेळ इ बघता आणि आपला आयडी बघता हसू आवरले नाही. Happy )

कविता चांगली आहे..
एवढी आठवण काढल्यावर उचक्या लागून आले असतील. Light 1