कथाशंभरी २ नजरभेट आशिका

Submitted by आशिका on 9 September, 2022 - 08:28

अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि .....
तिच्याशी नजरभेट झालीच. ती गोरी, घारी आकर्षक नवयौवना बघताक्षणी भुरळ पडेल अशी. रघुच्या तारुण्यसुलभ भावना तिला बघून उफाळून येत. तिला पटवावं , तिच्यामार्फत या शेजारच्या घरात प्रवेश मिळवावा आणि तिच्यासह सुखेनैव जीवन व्यतीत करावं हे उरी बाळगलेलं स्वप्न रघूचं.
त्या दिवशी 'ती' देखील रघूला लाडीक प्रतिसाद देत होती. त्याच उन्मादात रघू निघाला, तिच्या दिशेने.... कुंपणावरुन उडी टाकत तिच्यापर्यंत तो आता पोहोचणारच होता , इतक्यात....

भो... भो... भो....
अरेच्या, हा अल्सेशियन राहतो इथे? विचार करेपर्यंत तो कुत्रा रघूवर झेपावलाच. जीवाच्या आकांताने तिथून काढता पाय घेत रघू झपाझप समोरच्या झाडावर चढला.
ईमानी कुत्र्याने घरच्या कोवळ्या मांजरीला लबाड रघू बोक्याच्या तावडीतून वाचवले होते.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सही Lol

Lol

..


मस्तच जमली आहे...!!

रघूचा बाकीचे दशावतार झाले... हाच अवतार बाकी होता..
Wink

मस्त!!!

रूपक कथा म्हणून पण चालून जाईल. >>> +१२३