कळले नाही

Submitted by अज्ञात on 2 June, 2009 - 23:55

कोण सुचवितो कळले नाही
कोण लिहवितो कळले नाही
विस्मय हा इतुकाच
खेळणे; युगे सरूनही गळले नाही

मी न मला आठवतो किंचित
कुणी तरी पण येतो अवचित

कोण कशास्तव धुक्यात फिरतो
ओळख अजून पटली नाही,....
अखंड हा झरस्त्रोत तरीही
नाळ गोत सापडले नाही,...
झिजून गेले खडक
तळाशी; कितीक उरले कळले नाही.......

................अज्ञात

गुलमोहर: 

अज्ञात, अभिनंदन! खूप सुंदर कविता. अगदी कमी शब्दांत वाचणार्‍याला अंतर्मुख करू शकणारी लेखणी आहे...
"झरस्त्रोत"... काय शब्दं आहे...

खुपच सुंदर कविता...भावार्थ मानला...

अभिनंदन. कविता छानच आहे.

गोदेय
पुन्हा जागा झाला

अभिनंदन...!मस्त आहे.....कविता

अखंड हा झरस्त्रोत तरीही
नाळ गोत सापडले नाही,...

मराठवाडा साहित्य संमेलन डीसेंबर मधे ईकदे मराठवाड्यात (मूरुड) लतूर जिल्ह्यात आहे...महिति असेल सर्वांना...कुनी आलं ईकडे तर्...जरूर सांगा..अम्ही ईकडे रहतो-१५ कि मी वर...

Pages