कथाशंभरी - २ - नवयौवना - वीरु

Submitted by वीरु on 8 September, 2022 - 13:11

अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि अंगणात उभी नवयौवना पाहुन मोहरणे, बहरणे अशा नानाविध भावना त्याच्या कोमल अंतकरणात दाटुन आल्या. गेली बारा वर्षे वधुसंशोधनात झालेली वणवण डोळ्यासमोर तरळली, वनवासच जणु..
"कॉलेजला जाण्याऐवजी घरकाम करते वाटतं, बिचारी. राणीसारखं ठेऊ तिला. सगळ्या गावाला निमंत्रण देऊ लग्नाचं. मला पोपटलाल म्हणता काय." रघू मोठ्या उत्साहात तिच्याशी ओळख करायला निघाला.
"मम्मी.. हा घे तुझा संतुर." कुठुनतरी एक चिमुरडी नवयौवनेकडे धावत गेली.
"नमस्कार, मी अमित. कालच राहायला आलो. ही माझी फॅमिली, पत्नी अन मुलगी." मागुन आलेला एकजण ओळख करुन घेत होता. रघुच्या कानात रेंगाळणारे शहनाईचे सुर मात्र हरवले होते.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Lol