कथाशंभरी - जिद्द - निकु

Submitted by निकु on 8 September, 2022 - 07:36

बऱ्याच दिवसांनी दोघींना मोकळावेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे तिकडे लक्ष गेले. अरे हे काय ..

"इथे सायकल ट्रॅक झालाय की. पुर्वी असेच रस्त्यातून जिथे मिळेल तिथे आपण सायकल चालवत असू नाही." पहिली म्हणाली.
"हो ना.. आणि किती खेळ खेळत असू या बागेत. तु तर शाळेतपण खेळात अव्वल होतीस आणि तो अपघात. " दुसरीने खिन्नपणे मान हलवली.

ए ती बघ पॅरालिम्पिक चॅम्पियन ! चल आपण सेल्फी घेऊया ! बागेत आलेला मुलांचा घोळका पहिलीच्या भोवती जमला.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद कविन आणि मामी !
तुमच्या सारख्या पट्टीच्या लेखकांचे प्रतिसाद आले की अंगावर मुठभर मास चढतं !

छान.

छान.

मस्त, जमलीय
पॉजिटीव्ह नोट वर शेवट आहे Happy